Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर २०, २०१७

शहरात धुमाकूळ घालणाऱ्या मंगळसूत्र चोरट्यांना अटक:रामनगर पोलिसांची कारवाई

चंद्रपूर/प्रतिनिधी:
भर रस्त्यावरून महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाईल हिसकून दुचाकीने पसार होणाऱ्या मंगळसूत्र चोरट्यांच्या टोळीला चंद्रपूर येथील रामनगर पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास अटक केली आहे

शनिवारी रात्री बाबुपेठ परिसरातील नेताजी चौकात मंगळसूत्र चोरीची एक घटना घडली होती. रात्री जेवण झाल्यानंतर एक महिला व एक युवती रस्त्याने शतपावली करत होत्या तितक्यात दोन युवक मागून गाडीवरून आले व या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी व मोबाईल घेऊन पसार झाले या घटनेची या महिलांनी चंद्रपूर शहर पुलिसात तक्रार दिली होती. ह्याच घटनेची दुसरी पुनरावृत्ति रामनगर पोलीस हद्दीतील महाकाली कॉलरी येथे झाल्याने  परिसरात चाललेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेचे गांभीर्य जाणून चंद्रपूर शहर पोलिसांनी व रामनगर पोलिसांनी दोघांनीही आप आपल्या हदीत या मंगळसूत्र चोरट्यांचा शोध सुरू केला. मात्र हे चोरटे रविवारच्या रात्रीला रामनगर पोलिसांच्या हाती सापडले.

शॉर्टनर बघणाऱ्यांच्या नजरेतून त्यांच्या गाडीवर नंबरप्लेट नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या सर्व घटनांचा तपास करत असताना रामनगर पोलिसांनी या टोळीतील तीन युवकांना अटक केली आहे. या टोळीने तीन घटना शहर ठाण्याच्या हद्दीत केल्या असल्याने या आरोपीना पुढील तपासा करिता शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. यात या आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर यांच्याकडून गुन्ह्यांचा खुलासा झाला आहे, रंजित लोखंडे, सरताज फिरोज शेख, आणि दुर्गेश असे या आरोपींचे नावे असून हे सर्व आरोपी महाकाली कॉलरी परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांकड़ून सांगण्यात येत आहे


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.