Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७

मारहाण करून जिवंतपणीच पेटवून दिले

नागपूर : लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय ३२) यांचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या करणाऱ्या  आरोपींचा अद्याप छडा लागलेला नाही. दुसरीकडे अपहरण केल्यानंतर आरोपींनी राहुलला बुटीबोरी जवळच्या रामा डॅमजवळ नेले आणि त्याला मारहाण करून जिवंतपणीच पेटवून दिले,अशी थरारक माहिती वैद्यकीय अहवालातून पुढे आली आहे. त्यामुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली असून, समाजमन सून्न झाले आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारोडकर चौकात आग्रेकर यांचे निवासस्थान आहे. नागपूर-विदर्भातील प्रमुख लॉटरी व्यावसायिक म्हणून आग्रेकर ओळखले जातात. सुरेश आग्रेकर यांना राहुल तसेच जयेश नामक मुले आहेत. मंगळवारी सकाळी राहुल घराबाहेर पडला. काही अंतरावरच आरोपी दुर्गेश आपल्या साथीदारांसह बोलेरोत बसून होता. त्याने राहुलला बोलेरोत बसवून घेतले. सकाळचे ११.३० झाले तरी राहुल घरी आला नाही म्हणून त्यांची पत्नी अर्पिता यांनी फोन केला. यावेळी त्यांनी दीडएक तासात येतो, असे तो म्हणाला. त्यानंतर २ वाजून ८ मिनिटांनी जयेश आग्रेकर यांच्या मोबाईलवर राहुलच्या क्रमांकावर फोन आला. फोन करणाराने आम्ही राहुलचे अपहरण केले. त्यांना सुखरूप अवस्थेत सोडवून घ्यायचे असेल तर एक कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगितले. दुसरीकडे अपहरण आणि खंडणीची वाच्यता केल्यास किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही आरोपींनी दिली. आग्रेकर कुटुंबीयांनी दुपारी ४ च्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्यात या संबंधाने माहिती दिली. पोलीस राहुल आणि अपहरणकर्त्यांचा शोध घेत असतानाच बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जळालेला मृतदेह नागरिकांना दिसला. त्यानुसार, बुटीबोरी पोलीस तेथे पोहचले. राहुल आग्रेकरचे अपहरण झाल्याची माहिती असल्याने बुटीबोरी पोलिसांनी या मृतदेहाची माहिती शहर पोलिसांना कळविली. त्यानंतर लकडगंज पोलीस तेथे पोहचले. मृतदेहाजवळ चावीचा गुच्छा आणि अन्य चिजवस्तू आढळल्याने तसेच घटनेच्या वेळी आरोपींचे मोबाईल लोकेशनही तिकडेच दिसत असल्याने तो मृतदेह राहुलचाच असल्याचे जवळपास स्पष्ट झाले. तशी माहिती लकडगंज पोलिसांकडून राहुलच्या कुटुंबीयांना देण्यात आली. मात्र, चेहरा ओळखू येत नसल्याने आग्रेकर कुटुंबीयांनी तो मृतदेह राहुलचा नसल्याचे सांगून तो ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यावरून या प्रकरणाची गुंतागुंत वाढली होती.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.