नागपूर : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मो. शरीफ शब्बीर अहमद याला बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ७ दिवसांची अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली आहे.
मो. शरीफ हा कुख्यात दहशतवादी अबू जुंदालचा साथीदार आहे. त्याला १४ वर्षांचा कारावास झाला आहे. सध्या तो अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. ८ मे २००६ रोजी महाराष्ट्र एटीएस पथकाने तीन दहशतवाद्यांना ३० किलो आरडीएक्स, १० एके-४७ रायफल्स व ३२०० बुलेटस्सह औरंगाबादजवळ अटक केली होती.