Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ३०, २०१७

पुढील तारखेला आणा जामीनदार

तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावीसह अशोक माडावारला न्यायालयाची सूचना

गडचिरोली -
देसाईगंज येथील पत्रकार डा विष्णु वैरागडे यांना बातमी प्रकाशित केल्याची सबब पूढे करून पदाचा गैरवापर करून कायदा हातात घेऊन मारहाण, शिवीगाळ तसेच जबरी मौल्यवान वस्तु पळवून नेल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा सत्र न्यायाधिश संजय मेहरे यांनी मामला क्रमांक ३५/२०१७ व ३६/२०१७ मध्ये  ता. २८ ला विष्णु वैरागडे विरुद्ध महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन विरुद्ध माधुरी मडावी या दोन प्रकणात जामिनावर सूटका करून घेण्यासाठी पुढील तारिख १६ डिसेंबर न्यायालयाने  दिली आहे.

देसाईगंज येथील नगर परिषदेच्या तत्कालीन मूख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या विरूद्ध नगरसेवक, पदाधिकारी तसेच पालिका कर्मचारी यांच्याशी हूकूमशाहीने व मनमानी वृत्तीने वागत वारंवार अट्रासिटीची धमकी देतात. नियमबाहय, आकसापोटी कारवाई करित असल्याने त्यांच्या कामकाजावर विश्वासच न राहिल्याने देसाईगंज नगर परिषदेच्या विशेष सभेत प्रस्ताव क्रमांक ५७१ व ५७२ अन्वये ८ जून २०१० एकमताने अविश्वास ठराव पारित करण्यात आले होते. याबाबत पत्रकार डॉ विष्णु वैरागडे यांनी आपल्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने या अविश्वास प्रस्तावाला केराची टोपली दाखविले होते. अखेर अविश्वास ठराव घेणाय्रा नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे दार ठोठावून रिठ याचिका क्रमांक २९७२ /२०१० अन्वये दाखल केली होती . यावर  उच्च न्यायालयाने २७ जूलै २०१० ला ८ आठवड्याच्या आत बदली संदर्भात निर्णय घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाला निर्देश देऊन प्रकरण निकाली काढले होते. या आठ आठवड्यात नगरविकास विभागाने तत्कालीन मूख्याधिकारी माधुरी मडावी हीची शासन आदेश क्रमांक एम सी ओ १२१०/प्र. क्र. १२६ /नवि १४ नुसार दि. २७ सप्टेंबर २०१० ला रामटेक येथील नगरपारिषदेत उचलबांगडी केली होती. या दरम्यान मूख्याधिकारी मडावी या वैद्यकीय रजेवर जाऊन या बदली आदेशाला मॅट मध्ये ३० सप्टेंबर २०१० ला आव्हान दिले होते, त्यात सदर याचिका मॅटने फेटाळून लावली होती . त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने दिलेल्या निर्देशाचे तंतोतंत पालन न करता आपल्याच बदलीआदेशाला स्थगीती दिली होती. त्यानंतर ती परत देसाईगंज नगर परिषदेत रूजू झाल्यावर नगर परिषद नगरसेवक व पदाधिकारी तसेच वास्तविक बातम्या प्रकाशित करणाय्रा पत्रकारांवर सूड भावनेतून आपल्या पदाचा गैरवापर करून बदला घेणे सूरू केले होते. दरम्यान अविश्वास ठरावासंदर्भात उच्च न्यायालय निर्णयाचे पालन न केल्याने अवमानना याचिका दाखल करून नगरविकास विभागाला नोटीस बजावण्यात आली. त्या नंतर तत्कालीन मूख्याधिकारी माधुरी मडावी यांची पुन्हा रामटेकलाच नगरपारिषदेत स्थानांतरण करण्यात आले होते. मात्र बदलीवर रामटेक ला जाण्यापूर्वि वादग्रस्त कार्यकाळ व बदली संदर्भात संपूर्ण प्रकरणाची सखोल बातमी प्रकाशित केल्याची सबब पूढे करून आपल्या पदाचा गैरवापर करून हेतूपूरस्पर कधी नगर परिषद गाळ्याचा विषय घेऊन, तर कधी पॅथालाजी संदर्भात देसाईगंज पोलीस स्टेशनने ५ सप्टेंबर १९९१च्या शासन परिपत्रकानूसार बोगस पॅथालाजी

धारकांच्या चौकशीचा अहवाल सादर करण्यासाठी दिलेल्या पत्र क्रमांक २०७ /१० तसेच १३१५ /१० मध्ये दिलेल्या संपूर्ण संदर्भिय पत्रात डॉ विष्णु वैरागडे यांच्या पॅथालाजीचा नावच नसतांना एनकेन प्रकारे त्रास देणे सूरू केले होते.मात्र नगरविकास विभागाने उच्च न्यायालय नागपुर येथिल निर्णयाचा संदर्भ देऊन केलेल्या बदली संदर्भात पत्रकार डॉ विष्णु वैरागडे यांनी बातमी प्रकाशित केल्याने अक्षरशः चिडून जाऊन रामटेक ला रूजू होण्यापूर्वी कसली ही पूर्व सूचना न देता आरोपी माधुरी मडावी व अशोक माडावार हे दोघेही डॉ विष्णु वैरागडे यांच्या कार्यालयात बेकायदेशीर व नियमबाहय घूसून तू माझ्या विरूद्ध बातम्या प्रकाशित करतोस, माझी बदली करतोस काय असे संबोधून, अश्लील शिवीगाळ, मारहाण करून कार्यालयातील मौल्यवान वस्तु जबरीने पळवून नेल्याप्रकरणी देसाईगंज येथील पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ००६७ /१० अंतर्गत २१ आक्टोंबर २०१० ला भारतीय दंड विधान २९४, ३९२, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केलेला होता. 

           गुन्हा दाखल झाल्यानंतर देसाईगंज पोलीस स्टेशनने आरोपी तत्कालीन मूख्याधिकारी माधुरी मडावी व आरोपी अशोक माडावार यांना अटक केली नव्हती. त्यानंतर डॉ विष्णु वैरागडे यांनी देसाईगंज येथील न्यायालयात  कलम १५६ (३) यासह कलम १९० क्रिमिनल प्रोसेक्यूशन कोड अंतर्गत फौजदारी मामला क्रमांक ९८९ /२०११ अन्वये देसाईगंज न्यायालयात दाखल केली होती. ही याचिकेवर मागील सहा वर्ष १० महिन्यांपासून सूनावणी सूरू आहे. सदर याचिका गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात पाठविण््यात आले.यात आता पर्यंंत याचिकाकर्ताकडून ४ तर बचाव पक्षाकडून पाच साक्षदारांनी साक्ष नोंदविले आहेत.याचिकाकर्त्याच्या वतीने अड संजय गुरू व मृनाल मेेेेञाम बघत आहेत.

माधुरी मडावी ह्या अद्याप ११.११.२००८ पासून परिविक्षाधीन कालावधी संपूष्ठात आलेला नसून रामटेक येथे कार्यरत असतांना त्यांचे विरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शि. व अ.) नियम १९७९ नियम ८ खाली प्रस्तावित केली असून सदर शिस्तभंग विषय कारवाई परिविक्षाधीन कालावधी दरम्यान असल्यामुळे कारवाई प्रलंबित असल्यास विभागीय चौकशी पूर्ण होई पर्यंत परिविक्षाधीन कालावधी वाढविण्यासाठी नगर विकास विभागाने राज्यपाल च्या आदेशानुसार ६ सप्टेंबर २०१६ ला काढलेला होता. ज्या ठिकाणी कार्यरत होत्या त्या ठिकाणी नेहमीच वादग्रस्त ठरल्या अाहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.