Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २२, २०१७

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पाच लाखांची मागणी

दोन महिलांसह पाच आरोपींना अटक 


चंद्रपूर-  नागपूर येथे काम असल्याचे सांगून अल्पवयीन युवतीला हिंगणघाट येेथे आणून बलात्कार करण्यात आला. यानंतर पाच लाख रूपयांची मागणी केली. अन्यथा बदनाम करू, अशी धमकी दिली.  देत बलात्कार करणाऱ्या आरोपीकडून . यावेळी आरोपींमध्ये बाचाबाची झाल्याने व  पिडीत मुलीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन महिलांसह पाच आरोपींना अटक केली. हि घटना आज २२ नोव्हेंबर रोजी घडली आहे. 
पंजाब तानबा येरेकर  (६१) रा. जटपूरा गेट चंद्रपूर, प्रशांत बबनराव सत्रमवार रा.
शिवाजीनगर भद्रावती, गायत्री गजानन तांबोळी (३२) , रामकली रामकिशोर रामटेके (४४) रा. रय्यतवारी चंद्रपूर, प्रविण भक्तदास बतरा रा. इंदिरानगर चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
शेजारी राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीला विश्वासात घेवून कामासाठी नागपूर येथे जाण्यास भाग पाडून हिंगणघाट येथे घेवून गेले. यानंतर तिच्यावर पंजाब तानबा येरेकर याच्या कडून बलात्कार करण्यास भाग पाडले. यानंतर  आरोपी इसमास कुठेही वाच्यता होवू नये यासाठी चक्क पाच लाखांची मागणी केली. मात्र यात तो असमर्थ ठरल्याने शेवटी आपसात वाद झाल्याने प्रकरण चिघळले. पिडीत मुलीने घटनेची तक्रार देण्यासाठी हिंगणघाट पोलिस ठाणे गाठले. यावेळी तपास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बारकाईने पिडीत मुलीला विचारपूस केल्यानंतर सर्व घटनाक्रम उजेडात आला. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरूध्द दोन महिलांसह पाच आरोपींविरूध्द कलम ३७६ , ३६६ , ३४२ , ३६३ , १२० , १२ , १७ , २१ अन्वये गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली आहे.
चंद्रपूर येथे म्हाडा काॅलनी परिसरात राहणारी महिला गायत्री गजानन तांबोळी (३२) हिने रय्यत काॅलनी चंद्रपूर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस कामाची बतावणी करून विश्वासात घेतले. तिला काल २१ नोव्हेंबर रोजी नागपूर ऐवजी
हिंगणघाट येथील मुख्य मार्गावरील एल .एल. मेहर गेस्ट येथे आणले. या ठिकाणी त्यांनी १०५
व १०६ क्रमांकाची खोली बुक केली. यावेळी सदर मुलीला औषधी घेवून येत असल्याचे सांगून गायत्री बाहेर निघून गेली. यावेळी पिडीत मुलगी असलेल्या खोलीत पंजाब तानबा येरेकर  (६१) रा. जटपूरा गेट चंद्रपूर हा होता. आरोपी पंजाब येरेकर याने मुलीवर बलात्कार केला. या घटनेच्या वेळी गायत्रीसोबत प्रशांत बबनराव सत्रमवार रा. शिवाजीनगर भद्रावती, रामवती रामकिशोर रामटेके (४४) रा. रय्यतवारी चंद्रपूर, प्रविण भक्तदास बतरा रा. इंदिरानगर चंद्रपूर हेसुध्दा होते. बलात्काराची घटना घडल्यानंतर आरोपींनी पंजाब येरेकर याला पाच लाखांची मागणी केली. मात्र रक्कम देण्यास येरेकर असमर्थ ठरल्याने त्यांच्यात वाद विकोपाला गेला. यामुळे येरेकर  हा  पिडीत मुलीसह पोलिसात तक्रार देण्यासाठी हिंगणघाट पोलिस ठाण्यात पोहचला. यावेळी तक्रार देतानाही बाचाबाची झाल्याने महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योत्सना गिरी यांनी पिडीत मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली. यावेळी मुलीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी आरोपी पंजाब येरेकर, गायत्री तांबोळी, प्रशांत सत्रमवार, रामकली रामटेके, प्रविण बतरा यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली.  पोलिसांनी एल.एल. गेस्ट हाउसमध्ये जावून खोल्यांची पाहणी केली. पिडीतेला घटनास्थळी नेवून पंचनामा केला. यावेळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. उद्या २३ नोव्हेंबर रोजी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.