Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर १५, २०१७

माती, मुरूम, गिट्टी व रेतीची लयलूट


रामटेक/ प्रतिनिधी- 
रामटेक तालुक्यांत मोठया प्रमाणावर माती,मुरूम,गिट्टी व रेती यासारख्या गौण खनिजांची मोठया प्रमाणावर वाहतूक होत असून शासकीय राजस्वाचे मोठे नुकसान होत असतांना राजस्व व पोलीस विभाग कमालीचा सुस्त असल्याचे जाणवते. तक्रारी केल्यानंतरही कुठलीच कारवाई होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी वाहने अडविली तरी त्यांचेवर कारवाई करण्याचे धाडस पोलीस वा राजस्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी दाखवित नाहीत. सत्तापक्षाच्या राजकीय दबावाखाली अधिकारी कारवाई करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.
षासकीय राजस्व बुडवितांना काहींनी या प्रकारातून कोटयावधीची माया जमविल्याचीही तालुक्यांत चर्चा आहे.
याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की,दिनांक 12 नोव्हेंबर 2017 रोजी भंडारबोडी येथील ग्रामस्थांनी सहा ट्रक (ट्रक क्रमांक- एम एच32-क्यू5527, एमएच40एके6070, एमएच40बीजी6970, एमएच40एटी7070, एमएच32क्यू5526, व एमएच40वाय6070) मुरूम भरून ओव्हरलोड जात असतांना अडविले.याबाबत लगेच रामटेक पोलीसांना कळविण्यांत आले.रामटेक पोलीसांचा स्टाफ सुमारे 8.45 वाजताच्या सुमारांस भंडारबोडी येथे पोहचला व त्यांनी याबाबत रामटेकचे तहसिलदार यांना माहीती दिली.तहसिलदारांनी तात्काळ मंडळ अधिकारी व अन्य कर्मचारी यांना घटनास्थळी पाठविले.सदर ट्रकजवळ राॅयल्टी पास असल्याने त्यांना सोडून देण्यांत आल्याचे तहसिलदार यांनी विचारल्यावरून सांगीतले.मुख्य प्रष्न असा आहे की तेथील ग्रामपंचायतने याबाबत यापुर्वीच तक्रार करून हे ओव्हरलोड ट्रक मुरूमाची वाहतूक करीत असल्याचे व ते ओव्हरलोड असल्याने गावांतील रस्ते खराब होत असून राजस्वाची चोरी होत असल्याचे प्रषासनाला लेखी कळविले होते.मात्र याकडे अधिकारी यांनी कानाडोळा केला व अखेर ग्रामस्थांनीच पुढाकार घेत हे ट्रक अडविले मात्र एवढे केल्यावरही पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी यांनी हे ओव्हरलोड मुरूमाचे ट्रक कुठलीच कारवाई न करता सोडल्याने आष्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी तहसिलदार रामटेक यांनी सांगीतले की सदर ट्रकचालकांजवळ राॅयल्टीपरवाना असल्याने त्यांना सोडण्यांत आले मात्र सदर सहाही ट्रक हे ओव्हरलोड होते.त्यांना क्षमतेपेक्षा जास्त मुरूमाची वाहतूक करता येते कां? त्यावर मात्र कुठलेही उत्तर दिले गेले नाही.पोलीसांनी सांगीतले की आमचा राॅयल्टी चोरीषी व हे ट्रक ओव्हरलोड असण्याषी काहीही संबध नाही.केवळ तिथे कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही घटनास्थळी गेलो होतो.महसूल विभागाचे अधिकारी तिथे पोहचल्यावर व त्यांनी सदर सहाही ट्रक सोडल्यावर आम्ही परत आलो. सदर ट्रक ताब्यात घेवून त्यांना रामटेकच्या तहसिल कार्यलयांत वा पोलीस स्टेषनला आणण्याचे व आरटीओ यांना बोलावून हे ट्रक ओव्हरलोड आहेत कींवा नाही याची खातरजमा करणे ,तेही कागदोपत्री मात्र असे सौजन्य दोन्ही विभागाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी दाखविले नाही.याबाबत अधिक खोलांत चैकषी केली तेंव्हा कळले की सत्तापक्षाच्या एका बडया नेत्याचे हे ट्रक्स असल्याने त्यांना कुठल्याही परीस्थितीत सोडण्यांत यावे यासाठी मोठा राजकीय दबाव होता.रामटेकचा राजस्व व पोलीस विभाग प्रचंड राजकीय दडपणाखाली कार्य करीत असल्याचेच हे द्योतक असल्याची चर्चा आहे.
विटभट्टी संचालक तर क्षमतेपेक्षा अधिक विटा वाहून नेण्याला आपला अधिकार समजायला लागले आहेत.राजस्व बुडवून अधिक विटा तयार करणे,लागून असलेल्या सरकारी जमीनीवर अतिक्रमण करणे यासारखे प्रकार सर्रास सुरू आहेत.व त्यातुन षासनाचे मोठे नुकसान होत आहे.गावागावातील रस्ते खराब होत आहेत. आगामी काळांत लोकांच्या तक्रारीवरून प्रषासन आपले काम करीत नसेल व त्यांच्या तक्रारीची दखल घेणार नसेल तर मात्र ग्रामस्थ आपल्या हातात कायदा घेतील व त्यामुळे ठिकठिकाणी मोठा कायदा व सुव्यवस्थेचा प्रष्न निर्माण झाल्याषिवाय राहणार नाही असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.