चंद्रपुर:
आज सकाळी १० वाजताच्या सुमारास अष्टभुजा वार्डातील रमाबाई नगर येथे 9 फुटाचा अजगर आढळून आला.परिसरात छोटा नाला असल्याने हा अजगर त्या नाल्यातुन रोड वर आला.परिसरात खेडणाऱ्या मुलांना हा अजगर दिसला.याची चांगलीच बोम्बाबोम्ब झाल्याणे परिसरात चांगलीच खड़बड उडाली.परिसरात अजगरला बघण्यासाठी बघ्याची चांगलीच गर्दी जमली.याची माहिती सर्पमित्र प्रेमींना देण्यात आली. सर्पमित्र युवकांनी त्या अजगराला पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले आहे. वसीम शेख व प्रवीण रॉय असे या दोन सर्पमित्रांचे नाव आहेत.