Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०४, २०१७

बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू...

राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ, इंटक तर्फे वेकोलि, चंद्रपूर क्षेत्र मुख्य महाप्रबंधक कार्यालयासमोर नागपूर वर्धा रिजनचे महामंत्री के.के. सिंह यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू...
I

चंद्रपूरः- वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड, चंद्रपूर क्षेत्र प्रबंधनाच्या मनमानी व कामगार विरोधी धोरणाचा कडाडून विरोध करण्याकरीता ऐन सणासुदीच्या दिवसात दि. 28 सप्टेंबर 2017 पासून मुख्यमहाप्रबंधक कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरवात झाली. कामगारांच्या न्याय मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले, परंतू वेकोलि प्रबंधनाने कामगारांच्या न्याय मागण्यांकडे संपुर्ण दुर्लक्ष केल्याने सरते शेवटी राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ, इंटकचे नागपूर-वर्धा रिजनचे महामंत्री के.के. सिंह यांनी दि. 3 ऑक्टोबर 2017 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचे शस्त्र उपसल्याने प्रबंधनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे


  राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ, इंटकच्या विविध मागण्यामधे प्रामुख्याने 1) केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा वेकोलि प्रबंधनाद्वारे कामगाराचं शारिरीक व आर्थिक शोषण. 2) सत्ता पक्षाच्या राजकीय दबावात प्रबंधनाद्वारे अनैतिक कामे करून घेणे. ( उदाः- पदोन्नती, स्थानांतरण, घरकुल वाटपात अनियमीतता ). 3) कामगारांच्या कार्यवाटपात भेदभाव करणे 4) खोट्या आरोपांमधे पूर्व नियोजीत आरोपपत्र देऊन मानसिक व आर्थिक छळ करून भितीचे वातावरण निर्माण करणे. 5) कोळसा खाणीतील सुरक्षा व कल्याणकारी कार्याकडे संपुर्ण दुर्लक्ष करणे. 6) कामगारांकडून वर्षानुवर्ष जे कार्य करून घेतल्या जाते, त्या पदावर नियमीतीकरण न करणे. 7) संघटनेला विश्वासात न घेता प्रबंधनादावारे तडकाफडकीने कोळसा खाणी बंद करणे.  या मुख्य व इतर अनेक कामगारांच्या मागण्यांकरीता दि. 28 सप्टेबर 2017 पासून साखळी उपोषणाला सुरवात झाली असून आता हे आंदोलन तिव्र करण्याच्या इंटकच्या निर्णयाने वेकोलि प्रबंधनात प्रचंड खळबळ माजली आहे.


           इंटकचे महामंत्री के. के. सिंह मुख्य महाप्रबंधक कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनाला बसल्याचे वृत्त कामगार क्षेत्रात पसरताच असंख्य कार्यकर्ते सरकार व प्रबंधनाविरोधात घोषणाबाजी करत उपोषणस्थळी दाखल झाले. या आंदोलनाच्या यशस्वीतेकरीता चंद्रपूर क्षेत्राचे अध्यक्ष चंद्रमा यादव, सचिव के.डी. अहेर, जियाऊल हक, वयोवृध्द कामगार नेते सुरेशभाऊ सातपुते व सर्व शाखांचे पदाधिकारी, महिला व कामगार संघटनांचे सदस्य आवर्जून उपस्थित होते.  


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.