Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी ०६, २०१५

मुलाने केली आईची हत्या

पोंभुर्णा - तालुक्यातील चकठाणा येथे मुलाने जन्मदात्या आईलाच ठार केल्याची घटना मंगळवार, ६ जानेवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.गंगाधर गजानन गौरकर (३५) आणि त्याची आई शकुंतला गजानन गौरकर (६५) यांच्यामध्ये मंगळवारी सकाळी ९ वाजता किरकोळ स्वरूपाचे भांडण झाले. भांडणातच गंगाधरने आई शकुंतला हिच्या डोक्यावर काठीने वार केले. गंभीर दुखापतीमुळे शकुंतला जागेवरच गतप्राण झाली.
या घटनेची माहिती पोंभुर्णा पोलिस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक वाय. पी. नैताम, ए. एस. आय. बलगेवार, पोलिस हवालदार बुधा पेंदोर, जे. के. यादव घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंडपिपरी येथे पाठविण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.