Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर २३, २०१४

अमृतकरच्या अध्यक्ष पदाला स्थगिती

चंद्रपूर -  अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा शोभा ओझ यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कमलताई व्यवहारे यांना चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाला स्थगितीचे आदेश दिले. गेल्या काही  दिवसापूर्वी माजी महापौर संगीता अमृतकर यांची अध्यक्ष पदी निवड झाली होती 
त्याकरीता नविन महिला जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा वनमाला राठोड व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव सिमा भुरे यांनी निरीक्षक म्हणून सोमवार दि.२४ नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी २.०० वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे येणार आहे. तरी चंद्रपूर जिल्हा महिला काँगे्रस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ता लव महिला काँग्रेस प्रेमी यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान सुनिता वि. लोढीया यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.