Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर २३, २०१४

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ३० नोव्हें.ला ठिया आंदोलन

शेतकरी संघटनेचे आंदोलन

चंद्रपूर - केंद्र व राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने कापूस, धान व सोयाबिन याला योग्य भाव तसेच कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीची भूमिका मांडली होती. परंतु प्रत्यक्षात केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने ३० नोव्हें. २०१४ ला नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घरासमोर सदर मागणीच्या पुर्ततेसाठी दु. १२ वाजेपासून ठिया आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे माजी आम. अ‍ॅड. वामनराव चटप, रवि गोखरे, रमेश नळे, कपिल इद्दे आदींनी दिली.
राज्यातील शेतकèयांना कापसाला ६००० रू., सोयाबिनला ५ हजार व धानाला ३ हजार रूपये तसेच ऊसाला रंगराजन समितीच्या शिफारशी लागू करणे, संपुर्ण कर्जमुक्ती व वीज बिल मुक्ती सोबतच सत्ताधारी पक्षाने दिलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीची वचनपुर्ती करण्यात यावी यासाठी २० नोव्हें. ला शेतकरी संघटना राज्य कार्यकारणीची बैठक आमदार निवास येथे पार पडली. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी, गुणवंत पाटील हंगर्गेकर यांची उपस्थिती होती. याच बैठकीत या आंदोलनाची भूमिका मांडण्यात आली अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.