Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर १२, २०१४

जिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी


चंद्रपूर दि.12- जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे आज जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी भेट देवून पाहणी केली. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णसेवा व नवीन इमारत याविषयीची पाहणी करुन रुग्णांशी संवाद साधला.
जिल्हाधिका-यांनी महिला वार्ड, शिशु वार्ड, सामान्य वार्ड, बर्न वार्ड, नेत्र विभाग, स्वयंपाक गृह, भांडार गृह, सिटी स्कॅन, आयसीयू व नवीन इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालयाकरीता नवीन सिटी स्कॅन मशीन तसेच एक्सरे मशीनची मागणी करावी अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या. रुग्णालयातील लिफ्ट त्वरीत कार्यान्वित करावी व स्वच्छतेविषयी विशेष काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.

सद्यास्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाकरीता 165 व्यक्तींचे सिधा पत्रिका मंजूर आहेत. त्या वाढवून घेण्याविषयी त्यांनी सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिका-यांनी रुग्णांची चौकशी करुन मिळणा-या सेवेविषयी विचारपूस केली.
यावेळी त्यांच्यासोबत तहसिलदार गणेश शिंदे, नायब तहसिलदार वानखेडे, घोरपडे, मनपा उपआयुक्त मोहिते, उपअभियंता लेहगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम.मुरंबीकर, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.यु.व्ही.मुनघाटे व मुख्य प्रशासकीय अधिकारी एस.के.कांडेकर उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.