Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर १२, २०१४

जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप

चंद्रपूर : जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप तसेच समिती सदस्यांची निवड दीर्घ कालावधीनंतर सोमवारी पार पडली.
सभापतींच्या खातेवाटपामध्ये देवराव भोंगळे यांना बांधकाम, तसेच शिक्षण खाते मिळाले आहे. ईश्वर मेश्राम यांना आरोग्य खाते देण्यात आले आहे. उपाध्यक्ष कल्पना बोरकर कृषी सभापतिपद देण्यात आले आहे. तर नीलकंठ कोरांगे यांना समाजकल्याणचा भार देण्यात आला आहे. सविता कुडे यांना महिला बालकल्याण खाते मिळाले आहे.
समिती सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. माजी पदाधिकाऱ्यांपैकी संदीप गड्डमवार यांची जलव्यवस्थाप समिती सदस्य, संतोष कुमरे यांची अर्थ समिती, गुणवंतराव कारेकर शिक्षण समिती, अमृता सूर यांची बांधकाम समिती सदस्यपदी निवड करण्यात आली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.