Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर ०२, २०१४

प्रचार रथाने होणार मतदार जागृती

चंद्रपूर दि.02- मतदार शिक्षण व सहभागाचा पध्दतशीर कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील राजूरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपूरी, चिमूर व वरोरा या मतदार संघात मतदार जागृती रथाव्दारे जागृती करण्यात येणार असून या रथाला जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज हिरवी झेंडी दाखविली. अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, तहसिलदार गणेश शिंदे व स्वीपचे नोडल अधिकारी सुरेश वानखेडे यावेळी उपस्थित होते. प्रत्येक मतदार संघात मतदार जागृतीसाठी एक रथ देण्यात आला असून यात मतदारांना मतदार यादीत नाव पहाण्यासाठी लॅपटॅप असणार आहे. एक तलाठी या रथात नियमित असणार असून नागरिकांना मतदार यादीत नाव शोधण्यासाठी तलाठी मदत करणार आहे. मतदार ओळखपत्र असले तरी यादीत नाव असल्याशिवाय मतदान करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी यावेळी केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.