Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे ०६, २०१४

श्रमिक एल्गारचे मजुरांना घेऊन ठिया आंदोलन

सावली - तालुक्यातील अंतरगांव येथिल मजुरांना नियमित कामे मिळत नसल्याने व कामाची मजुरीही वेळेवर मिळत नसल्याने श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात सावली पंचायत समितीत ठिया आंदोलन करण्यात आले.

अंतरगांव येथील मजुरांनी 1 एप्रिलला नमुना 4 अंतर्गत कामाची मागणी केली परंतु 15 दिवसात काम मजुरांना काम देण्यात आले नाही त्यामुळेे मजुरांनी बेरोजगार भत्याची मागणी केली. भत्याची मागणी करताच मजुरांना काम देण्यात आले परंतु सदर काम नियमीत न देता ई-मस्टरचे कारण सांगुन मध्येच बंद
करण्यात आले. मजुरांना जानेवारी पासुन मजुरी मिळाली नाही, काही मजुरांची मोजमाप पुस्तीकेत नोंदच करण्यात आली नाही, या मजुरांच्या समस्या घेऊन पंचायत समितीमध्ये आंदोलन करण्यात आले. यामुुळे पंचायत समितीमध्ये गोंधळाची परीस्थीती निर्माण झाली. आंदोलकांसोबत चर्चा करण्यात येंऊन ई-मस्टर मजुरांना तयार करून देण्यात आले व काम देण्यात आले. मजुरी 8 दिवसात देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आल,े सदर आंदोलन अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात करण्यात येऊन विजय कारेवार, अनिल मडावी, रामचंद्र हुलके, भास्कर आभारे, किरण शेंडे, आदी कार्यकर्ते मजुरांसह सहभागी होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.