Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे २२, २०१४

केंद्रीय गुप्तवार्ता विभागात भरती

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या गुप्तवार्ता विभागात विविध जागांसाठी भरती होणार आहे. गुप्तवार्ता विभागात स्वीय सहायक, कनिष्ठ गृप्तवार्ता अधिकारी(तांत्रिक) या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. स्वीय सहाय्यक पदासाठी उमेदवार बारावी पास असणे आवश्यक असून त्याला टायपिंग येत असावे. तर कनिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी या पदासाठी मॅट्रिक असण्यासोबतच रेडिओ टेक्निशिअन अथवा तत्सम आयटीआय केलेला असावा. या पदासाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे इतके आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा सरकारी नियमानुसार शिथिलशम असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन भरावेत.
अधिक माहितीसाठी www.mha.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २ जून २०१४ आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने गृहमंत्रालायाच्या संकेतस्थळावर आपला ई-मेल आयडी व पासवर्ड तयार करावा. तसेच दस्तावेज, पासजपोर्ट साईज फोटो व सही स्कॅन करून अर्ज भरता येणार आहेत. या सर्व पदासाठी एक लेखी परिक्षा आणि त्यानंतर स्किल टेस्ट घेऊनच भरती केली जाणार आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.