Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे २२, २०१४

डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या मानधन घोटाळयाची तक्रार

श्रमिक एल्गारने मूल पोलिस स्टेशनला दिली. या तक्रारीची चौकशी केली जाईल असे मूल पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री. ताजणे यांनी सांगीतले.
राज्याचे ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव, माहीती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव यांचेसह 8 गैरअर्जदाराचे विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ई—पीआरआय योजनेच्या कामात सुमारे 500 करोड रूपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला होता. या घोटाळयात सहभागी असलेल्या गैरअर्जदाराचे विरोधात आज मूल पोलिस स्टेशनला श्रमिक एल्गारचे महासचिव विजय कोरेवार यांनी लेखी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी ही तक्रार दाखल करवून घेत चौकशी करण्यात येईल असे सांगीतले.

ई—पंचायत अंतर्गत केंद्र सरकारनी 13 व्या वित्त आयोगाचे करोडो रूपये राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाला दिले. ही योजना तयार करतांना, ग्राम पंचायतीतील डाटा एन्ट्री आॅपरेटरना रू. 8000/— मानधन देण्याचे शासन निर्णय काढण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या आॅपरेटरना रू. 3800/— पेक्षाही कमी मानधन देवून, या योजनेत खाजगी कंपन्याचे भले करण्यात येत आहे.
श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी या घोटाळयाची चौकशी करावी अशी मागणी कॅग, पंचायती राज मंत्रालय, वित्त आयोग, लोकलेखा समिती महाराष्ट्र यांना केलेली आहे. या घोटाळयाची पोलिस तक्रारही आज दाखल करण्यात आली असून, या आॅपरेटरना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार अॅड. गोस्वामी यांनी व्यक्त केला आहे.  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.