Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर १०, २०१३

"ती एक काळरात्र' नाटकातून अंधश्रद्धेविरुद्ध एल्गार!

नरेंद्र दाभोलकर यांना कलावंतांकडून श्रद्धांजली 

सिंदेवाही - झाडीपट्टी रंगभूमीवरील एकमेव लेखिका म्हणून ओळख असलेल्या आसावरी नायडू हिच्या आगामी "ती एक काळरात्र' या नाटकातून अंधश्रद्धेविरुद्ध एल्गार पुकारण्यात येणार आहे. मानसिक खच्चीकरण झाल्यावर सुशिक्षितांची पावलेही भोंदूंच्या दरबाराकडे वळतात आणि अखेर भोंदूगिरी संपविण्यासाठी सारे कुटुंब कसे एकत्र येते, हे यात दाखविण्यात येईल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांना कलावंतांकडून ही एकप्रकारे श्रद्धांजलीच असेल.
अनिल उट्टलवार यांच्या शिवराज रंगभूमी निर्मित या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन आसावरीने केले आहे. एवढेच नाही, तर ती मुख्य भूमिकाही साकारणार आहे. आसावरीने लिहिलेले हे झाडीपट्टी रंगभूमीवरील पाचवे नाटक असेल. विशेष म्हणजे अंधश्रद्धा, भोंदूगिरी, नरबळी आदींना आळा घालण्यासाठी शासनाने विधेयक मंजूर केले. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रंगभूमी आणि चित्रपटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याला आसावरीच्या नाटकाने आणखी बळ मिळणार यात दुमत नाही. यासह "लग्नाआधी विघ्न' आणि "बायको नखऱ्याची' या दोन नाटकांचीही निर्मिती शिवराजने केली आहे. यापैकी "लग्नाआधी विघ्न'चे लेखन-दिग्दर्शनही आसावरीनेच केले आहे. तिन्ही नाटकांमध्ये तिच्या प्रमुख भूमिका असतील, हे विशेष. शार्दूल-संतोष-संदीप यांनी संगीत दिले आहे. तर, तिन्ही नाटकांमध्ये आसावरीसह प्रतिभा साखरे, पिंकी कांबळे, श्रद्धा, राहुल ठाकरे, चेतन राणे, चेतन वडगाये, राज पटले, डॉ. राज मराठे, श्री. उईके, अधीर कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतील.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.