Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०९, २०१३

रोपवनाच्या कामाच्या मस्टरवर पाचवीचा विद्यार्थीही मजूर

सुशील नगराळे / चंद्रपूर
MB 9923838961

मिर्श रोपवन लावण्याच्या कामावर मृतांसोबतच चंद्रपूरच्या नामवंत शाळेच्या विद्यार्थ्यांनाही दाखवून २२ हजाराचा निधी घशात घालण्याचा अफलातून प्रकार उघडकीस आला आहे.
बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली येथील वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष व तत्कालीन सचिव यांनी या मिर्श रोपवनासाठी आलेल्या निधीची वाट लावल्याची तक्रार आहे. या घोटाळय़ात मृतासोबतच मजूरही कमी पडले. त्यामुळेच समितीचे तत्कालीन सचिव व अध्यक्षांनी संगनमत करून मस्टरवर चक्क चंद्रपूर येथील नामांकित शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचेही नाव मस्टरवर चढविले. त्या विद्यार्थ्यांचे नावे चार महिन्यात चार देयके मंजूर करून तब्बल २२ हजार ५0४ रुपये स्वत:च्या घशात टाकले. गिलबिली वन व्यवस्थापन समितीला सन २0१0-११ या वर्षात वनविकास यंत्रणा चंद्रपूर अंतर्गत संरक्षण समिती गिलबिलीद्वारा कृत्रिम पूर्ण उत्पादन अंतर्गत मिर्श रोपवन करण्यासाठी निधी देण्यात आला. हे काम वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व वनरक्षक तथा समितीचे तत्कालीन सचिवांच्या देखरेखीखाली करण्यात आले. मिर्श रोपवनाची कामे गिलबिली अंतर्गत बर्‍याच ठिकाणी करण्यात आली. ही कामे करताना या कामावर मजूर म्हणून मस्टरवर दाखवण्यात आलेला दिनेश बळीराम सिडाम हा गिलीबिलीचा रहिवासी असून चंद्रपूरच्या न्यू इंग्लीश हायस्कूलचा पाचवीचा विद्यार्थी आहे.
मिर्श रोपवन कार्यक्रमांतर्गत कक्ष क्रमांक ५७ मधील २५ हेक्टरमध्ये रोपवनाचे काम करण्यात आले होते. या रोपवनाची देखरेख करणारा मजूर म्हणून विद्यार्थ्याचे नाव नोंदविण्यात आले. त्याचे नावे ५ हजार ४0३ रुपयाची उचल केली. मार्च २0११ मध्ये कक्ष क्रमांक ४५७ मधील रोपवनातील मस्टरवरही त्याचेच नाव नोंदविले. तेथून ५ हजार ७00 रुपयाचे बिल मंजूर करण्यात आले आहे. एप्रिल २0११ व मे २0११ मध्येही दिनेशच्या नावाने प्रत्येकी ५ हजार ७00 रुपयाप्रमाणे बिल मंजूर करुन पैसे समिती अध्यक्ष व तत्कालीन सचिवाने स्वत:च्या घशात टाकल्याची बाब उघड झाली आहे. पण दिनेश हा चंद्रपूर येथील न्यू इंग्लीश हायस्कू लमध्ये शिकत असून, अल्पवयीन आहे व तो रोपवनाची देखरेख करण्यासाठी गेलाच नसल्याची बाब समोर आली आह.े. त्यामुळे समिती अध्यक्ष व तत्कालीन सचिव यांनी दिनेशच्या नावे काढलेली एकूण २२ हजार ५0४ रुपयाची रक्कम हडप केल्याची बाब माहिती अधिकारात प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.