Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर १४, २०१३

दोन लहान मुलांची गळा आवळून निर्घृण हत्या




चंद्रपूर : एका १९ वर्षीय युवतीने घराशेजारी राहणार्‍या आपल्या नात्यातीलच दोन लहान मुलांची गळा आवळून निर्घृण हत्या केली. आज (दि.१३) सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे बल्लारपुरात खळबळ उडाली आहे.

सना अमानखाँ पठाण (रा. जाकीर हुसैन वार्ड) असे आरोपी युवतीचे नाव आहे. सनाच्या घराशेजारी इस्माईलखाँ पठाण नावाचे तिचे नातेवाईक राहतात. आज सकाळी त्यांची दोन्ही मुले शाळेत जाण्याच्या तयारीत असताना सना हिने इस्माईल पठाण यांच्या घरी जाऊन शैफाकत (१0) नामक त्यांच्या मुलाला आपल्या घरी बोलाविले. तो घरी आल्यावर सनाने मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून त्याचा खून केला.
शाळेची वेळ होऊनही तो घरी का परतला नाही हे पाहण्यासाठी त्याच्या वडिलांनी इरफानची बहीण महेक (८) हिला सनाच्या घरी पाठविले.
ती आली असता डोक्यात सैतान संचारलेल्या सनाने तिचाही मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.