Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०७, २०१३

बनावट नोटा : सर्व आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी


चंद्रपूरः बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट राज्यव्यापी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आता अटकेत असलेल्या आरोपींची संख्या नऊ झाली आहे. पुण्याचा प्रमोण मोहकार, अहमदनगरच्या प्रकाश वडीटाके , अकोल्याचा अभिजीत म्हैसकर , चंद्रपूरचा नागेश अहिरे , मूलचा सचिन कोटपल्लीवार , मुख्य सूत्रधार नाशिकचा बाबा जाधव , अकोल्याचा राजेश दंदेकर ,गडचिरोलीचा त्रिदेव मुझुमदार आणि पानगडे यांना अटक करण्यात आली आहे. यातील बाबा जाधव हा नोटा स्कॅनिंग करीत होता. सर्व आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
चंद्रपुरातील बसस्थानक परिसरातील सुशिल्का हॉटेलमध्ये थांबलेल्या तीन व्यक्तींना तब्बल ३२ लाख रुपयांच्या नकली नोटांसह चंद्रपूर आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली. या तिघांसह चंद्रपुरातील एकाला या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या नोटांचा वापर नक्षलवाद्यांसाठी शस्त्र खरेदीसाठी केला जाण्याचीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केल्यानं या प्रकरणाचं गांभीर्या वाढलं आहे. या प्रकरणातील मास्टर माइंडहा नाशिक इथं असल्यानं त्यालाही अटक होण्याची शक्यता आहे.
 चंद्रपूर पोलिसांनी प्रदर्शनात मांडलेल्या या हजार रुपयांच्या नोटा असली नसून बनावट आहेत. तब्बल ३२ लाख रुपयांच्या बनावट नोटा चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणार होत्या. मात्र, गडचिरोली पोलिसांना याची माहिती मिळाली आणि चंद्रपूर पोलिसांच्या मदतीनं बनावट नोटांचा व्यापार करणाèया टोळीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रमोद दत्तात्रय मोहरकर, पुणे, प्रकाश चांगदेव वडितके, रा. qपपळगाव (अहमदनगर), अविजित धर्मराज म्हैसकर, अकोला आणि नागेश प्रभाकर अहिरे, चंद्रपूर यांचा समावेश आहे. या प्रकरणातील मास्टर माइंड प्रमोद जाधव हा नाशिक इथला रहिवासी असून, त्याच्या अटकेसाठी पोलिस पथक रवाना झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथून काही व्यक्ती स्कार्पिओ या गाडीनं तीन एप्रिलला चंद्रपुरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते हॉटेल सुशिल्का इथं थांबणार असून त्यांच्याकडे नकली नोटा आहेत. नकली नोटा देऊन त्या बदल्यात काही व्यक्तींकडून खèया नोटा घेणार आहेत, अशी मटीपङ्क गडचिरोली येथील सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांना मिळाली होती. त्यानंतर बावकर आपल्या  पथकासह चंद्रपुरात दाखल झाले. पोलिस अधीक्षक राजीव जैन यांनी लगेच चंद्रपूर आणि गडचिरोली पोलिसांचं संयुक्त पथक तयार केलं आणि रात्री हॉटेल सुशिल्का इथं छापा टाकला. तेव्हा हॉटेलमध्ये प्रमोद मोहरकर, अविजित म्हैसकर आणि प्रकाश वडितके आढळले. त्यांना ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली, तेव्हा हजार आणि पाचशे रुपयांच्या एकूण ३२ लाख तीन हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या. सोबतच एक लाख २८ हजार रुपयांच्या खèया नोटाही पोलिसांना मिळाल्या. आरोपींनी आपल्या वाहनावर ममहाराष्ट्र पोलिसङ्क असं लिहिलं होतं. गंमत म्हणजे ज्या हॉटेलमध्ये हे आरोपी थांबले, ते हॉटेल पोलिस मुख्यालयाच्या अगदी समोर आहे. आरोपींकडून पोलिसांनी या तिघांसह लॅपटॉप, पाच मोबाईल ङ्कोन जप्त केले. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपुरातील मध्यस्थ नागेश अहिरे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याही घरून हजार रुपयांच्या २४ व पाचशे रुपयांच्या दोन नकली नोटा तसंच एक लाख २६ हजार ५०० रुपयांच्या खèया नोटा पोलिसांनी जप्त केल्या.
चंद्रपुरातील नागेश अहिरे हा मध्यस्थाचे काम करीत होता. या प्रकरणात सचिन कोटपल्लीवार या आणखी एका मध्यस्थाचं नाव समोर आलं आहे. तो मूल येथील असला तरी सध्या तो गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी इथला रहिवासी आहे. नकली नोटा छपाईचं काम नाशिक इथं चालत होतं. पोलिस तपासात काही खळबळजनक बाबीही समोर आल्या. या नकली नोटा शस्त्रसाठा खरेदीसाठी वापरल्या जाणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसंच या प्रकरणाचे तार गडचिरोली जिल्ह्याशी जुळले असल्यानं नक्षली कारवायांत हा पैसा वापरला जाणार होता का, या दिशेनेही तपास सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी या प्रकरणात गोपनीयता बाळगली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत नकली नोटा छापणारे मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता असून, त्याचा वापर यापूर्वी कधी केला आणि कुठे केला जाणार होता, यावरून पडदा उठण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गडचिरोलीचा संबंध असल्यानं प्रकरण गंभीर झालं आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.