Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ०८, २०१३

पाच महिन्यांत १८ कोटींची एलबीटी

तीन हजार ३३ व्यापा-यांनी केली मनपाकडे नोंदणी

चंद्रपूर : राज्यातील महानगरपालिकांत लागू केलेल्या स्थानिक संस्था कराला (एलबीटी) विरोध सुरू असताना चंद्रपुरात मागील पाच महिन्यांत सुमारे १७ कोटी ८१ लाख ९० हजार १४२ रुपयांची विक्रमी करवसुली झाली आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये चंद्रपूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. त्यानंतर मनपाची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच जुलै २०१२ पासून शासनाने एलबीटी लागू केली. त्यामुळे व्यापा-यांनी विरोध दर्शविला. मुख्यमंत्र्यांनी प्रारंभीच्या काही महिन्यांत सवलत दिल्यानंतर पुन्हा एलबीटी सुरू करण्यात आली. नोव्हेंबरपासून एलबीटी लागू झाला. नोव्हेंबर २०१२ पासून मार्च २०१३ पर्यंत एकूण १७ कोटी ८१ लाख ९० हजार १४२ रुपयांचा एलबीटी कर वसूल झाला आहे. सर्वाधिक एलबीटी कर ङ्केब्रुवारीत वसूल झाला आहे. सुरुवातीला चांगलाच विरोध करणा-या व्यापा-यांनी आता एलबीटीला सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे. ३ हजार ३३ व्यापा-यांनी एलबीटीसाठी नोंदणी केली आहे. यादरम्यान एलबीटी चोरीच्या केवळ चार घटना उघडकीस आल्या. नोंदणी प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. एलबीटी वसुलीसाठी देवानंद कांबळे यांच्या नेतृत्वात एकूण सहा जणांचे पथक कार्यरत आहे. 
-------------------------
  • २ कोटी १ लाख ९८ हजार ३४९-नोव्हेंबर १२
  • २ कोटी ७९ लाख ३९ हजार ४८७ -डिसेंबर १२
  • ३ कोटी २२ लाख ९३ हजार ४८६ - जानेवारी १३
  • ७ कोटी १२ लाख ३४ हजार ८७३ - ङ्केब्रुवारी १३
  • ३ कोटी ६५ लाख २३ हजार ९४१ - मार्च १३


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.