चंद्रपूर : नोव्हेंबर २०१२ पासून शहरातील तीन हजार ३३ व्यापा-यांनी एलबीटीसाठी महानगरपालिकडे नोंदणी करून सुमारे १८ कोटींचा कर भरला. मात्र, आता राज्यातील विविध महानगरातील व्यापा-यांनी आंदोलन सुरू असल्याच्या पाश्र्वभूमिवर एलबीटीला विरोध करीत बुधवारी (ता. आठ) बंद पाळला. त्याला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला.
मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर शहरातील व्यापा-यांनी विरोध दर्शवून बेमुदत बंद पाळला आहे. त्याला पाqठबा देण्यासाठी चंद्रपूर चेंबर ऑङ्क कॉमर्सने बुधवारी (ता. आठ) बंद पाळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एलबीटीमुळे चंद्रपूर परिसरातील व्यापार सीमेबाहेर जात असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे. याचा ङ्कटका व्यापा-यांनाच बसत आहे. या बंदमध्ये मेडिकल, शीतपेयगृहे, बिअरबार वगळता सर्वच व्यापार, हॉटेल बंद होते.