चंद्रपूर - जुन्या वादातून दोन गटांत उद्भवलेल्या हाणामारीत तलवारहल्ला झाल्याने तीन महिलांसह पाच जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. 28) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी 15 आरोपींना अटक करण्यात आली. ही घटना आपसी वादातून घडली असली, तरी होळीच्या पार्श्वभूमीवर रक्तरंजित रंगपंचमी झाल्याने प्रचंड दहशत निर्माण झाली.
शहराच्या मध्यवर्ती भागातील जलनगर वॉर्डात खंजर मोहल्ला आहे. परप्रांतीय नागरिक असलेल्या वस्तीत नेहमीच चाकू, तलवारीने हाणामारीच्या घटना घडत असतात. हाती स्थायी रोजगार नसल्याने हे परप्रांतीय अवैध व्यवसाय करून जीवन जगतात. त्यामुळे व्यवसाय करण्यावरून एकमेकांत वाद होत असतात. अशातच गुरुवारी रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी जुना वाद उफाळून आला. प्रारंभी शाब्दिक वाद होता. त्यानंतर तरुणांच्या एका गटाने तलवारी काढून तीन महिलांसह पाच जणांवर सपासप वार सुरू केले. त्यामुळे जलनगरात प्रचंड दहशत निर्माण झाली. या घटनेची माहिती काहींनी पोलिसांना दिली. जखमी आपला जीव वाचविण्यासाठी रक्ताने माखलेल्या स्थितीतच जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेत होते. पोलिस पथक पोहोचल्यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुणाच्या पोटावर, तर कुणाच्या पाठीवर वार झालेले दिसून आले. नरेश रामवा खंजर (वय 25), सारिका जय खंजर (वय 30), सविता रवी खंजर (वय 35), पायल बादल खंजर (वय 31), सुनील रामवा खंजर (वय 21) अशी जखमींची नावे आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वांना भरती केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. यात एकूण 15 जणांना अटक करण्यात आली. सायंकाळपर्यंत सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अवैध व्यवसायाचा वाद
शहरातील जलनगर वॉर्ड हे अवैध धंद्यांसाठी प्रसिद्ध आहे. सणानिमित्त दारूविक्री बंद असली की, येथे अवैधरीत्या दारू मिळते. पोलिसांनाही ही बाब माहीत आहे. मात्र, कारवाईच होत नसल्याने 16 वर्षांपासूनचे तरुणदेखील या दिवशी उघडपणे दारू विकण्यासाठी रस्त्यावर उभे असतात. अशा वेळी ग्राहक मिळविणे आणि जादा व्यवसाय करणे, यावरूनही अनेकदा वाद उफाळून आले आहेत.