चंद्रपूर- एकमेकांच्या अंगावर रंग आणि पाणी उधळत धुळवडसाजरी करण्याऐवजी भद्रावती तालुक्यातील घोनाड व कोची या दोन गावातील नागरिकांनीग्रामस्वच्छता करून होळी साजरी केली . राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता आणि संतगाडगेबाबांच्या संदेशांचा गजर करीत ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबविले . गावातील काडीकचरा वेचण्यात आला . प्रदूषण टाळण्यासाठी सामूहिकपणे एकच होळी पेटविण्यातआली . गावातील नाल्या , कचऱ्याचे ढीग स्वच्छ करण्यात आलेत . त्यानंतर रात्रभर भजन -कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला . धुलीवंदनाच्या दिवशी सामूहिक ध्यान करण्यात आले . त्यानंतरभव्य ग्रामदिंडी काढण्यात आली . बचत गटांचे सदस्य , महिला , युवकांनी सहभाग घेतला . ग्रामनिरीक्षणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला . त्यानंतर सहभोजनाने होलिकोत्सवाच्याकार्यक्रमाची सांगता झाली . रंगाचा वापर आणि पाण्याचा अपव्यय टाळत गावकऱ्यांनी हाआगळावेगळा संदेश लोकांना दिला आहे . होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी गावातील मद्यविक्रीपूर्णपणे बंद होती . युवकांनीही त्याचा चांगला प्रतिसाद दिला . गुरुदेव सेवा मंडळाचे बंडोपंत बोढेकरयांनी या निर्णयाबद्दल युवकांचे कौतुक केले . बोढेकर यांच्या अध्यक्षतेखाली कोची येथील कार्यक्रमातसेवकराव मिलमीचे , काया बालबोढ , हरीदास भोयर , हनुमान बल्की , नामदेव थेटे , शशीकांतजगताप , देवानंद मारेकर , नंदू शेळकी आदींनी पुढाकार घेतला .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शुक्रवार, मार्च २९, २०१३
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments