Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी ०३, २०१३

माझे गोंडपिपरी

गोंडपिपरी हे साधारणतः पंधरा हजार लोकसंख्येचे शहर. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असणाèया या शहराला आता महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या तीन राज्यांना जोडणारे महत्त्वाचे शहर म्हणून गोंडपिपरीची नवी ओळख निर्माण होत आहे. आदिवासी समाजातील गोंड समुदायातील नागरिकांच्या वास्तव्याने या गावाला गोंडपिपरी हे नाव मिळाले. आता मात्र सर्व समुदायातील नागरिक येथे राहतात. शहराला विविध समम्या भेडसावत आहेत.
------------------
अस्वच्छ गोंडपिपरी
शहरात एकूण पाच वॉर्ड आहेत. या वॉर्डांतील विकासकामांकरिता पंधरा ग्रामपंचायत सदस्य आहेत. मात्र, हे सदस्य प्रचंड उदासीन आहेत. ग्रामपंचायतीतील सङ्काई कामगारांचा उपयोग या सदस्याच्या घरासमोरील कचरा व नाली साङ्क करण्यासाठीच होतो. यामुळे शहरातील स्वच्छतेकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. नाल्या तुडुंब भरल्या आहेत. सांडपाण्याचे नियोजन नाही. त्यामुळे  वातावरण दूषित होत आहे. शहरातील दलित वस्तीकडे लोकप्रतिनिधी पूर्णत: दुर्लक्ष करीत आहेत. या वस्तीमधील संसर्गजन्य आजारांचे जिवाणू तयार झाले आहेत. वारंवार लेखी तक्रार देऊनही ग्रामपंचायत दखल घेत नाही. अस्वच्छता ही गावातील साèयाच वॉर्डांची समस्या झाली आहे.
------------------
अतिक्रमण काढा
शहरातील व्यावसायिक आपल्या दुकानाचे अधिकाअधिक सामान मुख्य मार्गालगत ठेवतात. याचा मोठा ङ्कटका वाहतूकव्यवस्थेला बसत आहे. अध्र्यापेक्षा जास्त मार्ग सामानांनी गिळंकृत केल्याने वाहनधारकांना ङ्कारच कमी जागेतून आपली वाहने काढावी लागतात. अशात अनेकवेळा अपघातसुद्धा घडले आहेत. वाहतूक विभाग याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर ढकलत आहे.  बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे देत नाहीत. अतिक्रमण हटविल्याशिवाय वाहतूक सुरळीत होणार नाही.
------------------
एटीएमची प्रतीक्षा
शहराची लोकसंख्या वाढत आहे. नोकरदारांची संख्या शहरात मोठी आहे. आजघडीला अत्यंत महत्त्वाची गरजेत एटीएमचा समावेश होतो. गोंडपिपरीत बँक आङ्कॅ इंडियाची शाखा आहे. गेल्या वर्षभरापासून ग्राहकांना एटीएम कार्डचे वितरण करण्यात आले. मात्र, एटीएम मशीन लागले नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेची एटीएमची यंत्रणा तयार आहे. मात्र, त्याला उद्घाटनाचा मुहूर्त मिळालेला नाही. ग्राहकांना सुटीच्या दिवशी अथवा बँक बंद झाल्यानंतर पैशाची गरज पडल्यास  पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरील बल्लारपूर येथे जावे लागते.
------------------
कोंबड्याच्या पिसांची विल्हेवाट लावा
गोंडपिपरी शहरात अगदी ग्रामपंचायतलगत चिकन मार्केट आहे. या मार्केटमधील कोंबड्यांचे पिसे शहराला लागून असलेल्या क्रीडासंकुलाजवळील मुख्य मार्गावर टाकली जातात. या मार्गावर जंगल आहे. पिसे खाण्याकरिता कुत्रे गर्दी करीत असतात. यामुळे नेहमी या मार्गावर मोठ्या संख्येत कुत्रे ङ्किरताना दिसतात. जंगल असल्याने वन्यजीवांचा इथे वावर असतो. अशात या पिकांमुळे कुत्र्यांनी दोन ते तीन चितळांची शिकार केल्याच्याही घटना घडल्या आहेत. ग्रामपंचायत, वनविभाग या महत्त्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. या मार्गावर पहाटे ङ्किरायला जाणाèयांची संख्या मोठी आहे. त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
------------------
आठवडी बाजाराला हवी जागा
गोंडपिपरी येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. इतर दिवसांपेक्षा आठवडी बाजारात सामान अधिक स्वस्त मिळते. यामुळे आठवडी बाजारात मोठी गर्दी असते. आठवडी बाजारासाठी जागाच नसल्याने गोंडपिपरी जुना बसस्थानकालगत ते हनुमान मंदिर, वॉर्ड क्र. पाचपर्यंतच्या रस्त्यालगत हा बाजार भरतो. रस्त्यालगतच हा बाजार भरत असल्याने ही एक मोठी समस्या झाली आहे. ग्रामपंचायत आठवडी बाजारासाठी जागा नसल्याचे सांगत हात झटकत आहे. आठवडी बाजाराला स्वतंत्र जागा देऊन ही समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचयातीने पुढाकार घेण्याची गरज आहे.
------------------
विद्याथ्र्यांना हवा मोकळा मार्ग
गांधी चौकात बँक ऑङ्क इंडियासमोर जिल्हा परिषद मुलांची शाळा आहे. शाळेच्या अगदी समोर सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी असते. यामुळे विद्याथ्र्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विद्याथ्र्यांची धावपळ सुरू असते.  वाहनांची रेलचेल सुरू असल्याने नेहमीच अपघाताची मोठी शक्यता आहे. बोरगाव मार्गावरही अशीच गंभीर परिस्थिती आहे. येथे अरुंद रस्ते असल्याने व ऑटोंची गर्दी वाढल्याने जनता विद्यालयात शिकणाèया विद्याथ्र्यांना त्रास होत आहे.
------------------
गुरांची विल्हेवाट लावा
गोंडपिपरी येथील मुख्य मार्गाच्या गावातील गुरांचा उपद्रव नेहमीच सुरू असतो. या गुरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अनेकांचे अपघात झाले आहेत. ग्रामपंचायतीने अनेकदा गुरे पकडण्याची मोहीम राबविली. मात्र, त्यांना यश आले नाही. गुरांची कायमची विल्हेवाट लावण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
------------------
पाणीपुरवठा योजना केव्हा सुरू होणार?
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कोट्यवधी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. गत चार वर्षांपासून याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही हे काम पूर्ण होऊ शकले नाही. यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या केव्हा सुटणार? हा मोठा प्रश्न नागरिकांसमोर आहे. उन्हाळ्यात गावात भीषण पाणीटंचाई असते.
------------------
उपविभाग केव्हा?
गोंडपिपरी येथे महसूलचे उपविभागीय कार्यालय द्या, अशी मागणी नागरिकांनी केली होती. अनेकांनी याबाबतच निवेदने ही दिलीत. लवकरच घोषणा होईल, असेही सांगण्यात आले. मात्र, कुठे घोडे अडले, कळायला मार्ग नाही. उपविभागाने शहराच्या विकासाला गती येईल, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.
------------------
मुख्यमार्ग खड्ड्यांत 
गोंडपिपरी शहराच्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. नुकतेच हे खड्डे बुजविण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. पण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या आशीर्वादाने परिस्थिती मजैसे थेङ्क झाली आहे. वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
------------------
नगरपालिकेचा प्रश्न प्रलंबित
ऑगस्ट २०१२ रोजी गोंडपिपरी ग्रामपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. तशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करणार होते. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही घोषणा झालेली नाही.
गोंडपिपरी ग्रामपंचायत क्षेत्रात एकही उद्योग नाही. तेथील आर्थिक उत्पन्नही जेमतेम आहे. गोंडपिपरीऐवजी बल्लारपूर उपविभाग होत असल्याने गोंडपिपरी ग्रामपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला. या ग्रामपंचायतीत एकूण १७ प्रभाग आहेत. गावाच्या विकासासाठी नगरपालिकेची निर्मिती होणे गरजेचे आहे.
------------------
 नियमित बिल द्या
गोंडपिपरी भारत संचार निगमच्या कार्यालयाच्या भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. इंटरनेटच्या अधिक वापराने आता लॅण्डलाइन धारकांची संख्या वाढली आहे. अशात या कार्यालयाकडून नियमित मासिक बिलाचे वितरण करण्यात येत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. दोन महिन्यांतून एकदाच बिलांचे वितरण करण्यात येते. परिणामी ग्राहकांचे आर्थिक नियोजन तर बिघडत आहेच, सोबत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.

-------------------------
सौंदर्यीकरणाची ऐशीतैशी
 लाखो रुपये खर्चून गोंडपिपरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवाजी चौकात र्सौदर्यीकरण केले. आजघडीला याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या सौंदर्यीकरणाला केलेले कुंपणही चोरीला गेले आहे. आज येथे गवत उगवले आहे. काही मनोरुग्णांचे हे निवासस्थान झाले आहे. सौंदर्यीकरणाच्या आत अस्वच्छता पसरली आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तव्वर हे आठवड्यातून केवळ दोनच दिवस कार्यालयात येतात. त्यांचे कार्यालयीन कामकाजाकडे लक्ष नसल्याने विविध समस्या निर्माण होत आहेत.
------------------                 
   शौचालयाचा अभाव
गोंडपिपरी येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती व इतर प्रशासकीय कार्यालयात गावोगावचे नागरिक विविध कामांनी येत असतात. मात्र, या प्रशासकीय कार्यालयात शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पंचायत समितीसमोर लाखो रुपये खर्च करून शौचालय बांधण्यात आले. शौचालय तयार होऊन वर्ष उलटले, तरीही नागरिकांसाठी ते खुले करण्यात आलेले नाही.
------------------                 
क्रीडांगणाची दुरवस्था
गोंडपिपरी शहराला लागून असलेल्या तालुका क्रीडांगणाची मोठी दुरवस्था झालेली आहे. लाखो रूपयाचा निधी क्रीडांगणाच्या सुविधेकरिता येतो. मात्र, या निधीचे नेमके होते काय, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
क्रीडांगणात मोठ्या प्रमाणावर कचरा आहे. इमारतीलाही तडे गेले आहेत. यामुळे शहरातील खेळाडूंना याचा काहीच ङ्कायदा होताना दिसत नाही. यासंदर्भात वारंवार तहसीलदारांना निवेदन देऊनही या महत्त्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
------------------                 
 बसस्थानकात प्रवासी बसेनात
गोंडपिपरी येथील जुने बसस्थानक म्हणजे अतिशय गजबजलेला परिसर. मात्र, या बसस्थानकाच्या आत कुठलेच प्रवासी थांबत नाही. बसस्थानकाच्या आत असलेली घाण याला कारणीभूत आहे. गावोगावी जाणारे प्रवासी रस्त्यावर थांबतात. मात्र, बसस्थानकाच्या आत थांबत नाही. हे बसस्थानक केवळ बॅनर लावण्याच्याच कामाचे झाले आहे. बसस्थानकाच्या स्वच्छतेसाठी ग्रामंपचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे.
------------------                 
 अस्वच्छ मूत्रीघर
भाजी मार्केटजवळ असलेल्या मूत्रीघराने अनेकांना त्रस्त करून सोडले आहे. एकीकडे गांधी वाचनालय व भाजी मार्केट असताना त्यालाच लागून मूत्रीघर आहे. जवळच देशी दारूचे दुकान आहे. अशातच मद्यपींकडून या मूत्रीघरात मोठ्या प्रमाणावर घाण केली जाते. शहरात हे एकमेव ग्रामपंचायतीचे मूत्रीघर आहे. प्रचंड अस्वच्छता असल्याने या मूत्रीघराचा वापर कुणीच करीत नाही.
------------------                 
अवैध वाहतुकीचा विळखा
गोंडपिपरीत मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू आहे. येथील जुन्या बसस्थानकावर काळी पिवळी, ऑटोची नेहमीच गर्दी असते. गोंडपिपरीत ऑटोसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने अगदी रस्त्यालगत ऑटो लावले जातात. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा होत आहे. सोबत अपघातातही वाढले आहेत.
                         
 असभ्य वर्तणुकीचा निराधारांना त्रास
येथील बँक ऑङ्क इंडियाच्या शाखेत नेहमीच निराधार, विधवा व सामान्य नागरिकांना असभ्य वागणूक दिली जात असल्याचा अनुभव येतो.
रॉकेल व स्वस्त धान्याच्या काळ्या बाजाराचा प्रश्न तालुक्यात मोठा आहे. जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार होत असताना पोलिसांची मात्र याकडे डोळेझाक होत आहे. यामुळे रॉकेलचा काळाबाजार करणारा हा परवानाधारक व्यापारी अद्याप मोकाट आहे. काळाबाजार करणारा हा रॉकेलमाङ्किया कोण, असा प्रश्न येथे चर्चीला जात आहे. मात्र, याचे उत्तर आजघडीला गोंडपिपरी पोलिसांकडे नाही. रॉकेलचा काळाबाजार हा प्रश्न तालुका प्रशासनाच्या अखत्यारितील आहे. विशष म्हणजे यात आरोपीने ज्या परवानाधारकांकडून रॉकेल खरेदी केले, त्याच्या नावाची नोंद नव्हती. त्यामुळे या प्रकरणी पुढील कार्यवाही करणे पुरवठा विभागाला शक्य झाले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात रॉकेलचा काळाबाजार करणाèयांच्या परवाना यामुळेच अजूनपर्यंत कायम आहे.
------------------
गोंडपिपरी ... थोडक्यात
लोकसंख्या .....१५,००० 
क्षेत्रङ्कळ ...५६२.९६ हेक्टर
ग्रामंपचायतीची स्थापना.. १९४८
ग्रामपंचायत सदस्यसंख्या..१५ 
वार्डाची संख्या. ५
समस्या यांना सांगा 
आमदार सुभाष धोटे ९४२२१३६९९९
 चंदावार तहसीलदार .९४२०४४६९६९
 ठाणेदार परदेसी     ९८२३८८४४५६
 सरपंच सुनील डोंगरे ...९४०४५२८४०८

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.