Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी ०३, २०१३

महसूल क्रिकेट गडचिरोली विजेता


विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा

चंद्रपूर,दि.3 : सीटीपीएसच्या मैदानावर सुरु असलेल्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत गडचिरोलीच्या संघाने क्रिकेटच्या अंतिम सामन्यात चंद्रपूर संघाचा 6 गडी राखून पराभव करुन विजेते पद पटकाविले.
    प्रथम फलंदाजी करत चंद्रपूर संघाने निर्धारित 12 षटकात 108 धावा करुन  गडचिरोली संघासमोर जिंकण्यासाठी 109 धावांचे लक्ष ठेवले. चंद्रपूर संघातर्फे सर्वाधिक 31 धावा सुरेशने केल्या तर विनोद 28 धावा केल्या. या धावाचा पाठलाग करतांना गडचिरोली संघाने पहिल्याच षटकात 6 वाईड धावासह 12 धावा काढल्या. चंद्रपूरच्या गोलंदाजांना लय मध्ये येणासाठी 3 षटक खर्च करावी लागली. गडचिरोली संघाचा पहिला गडी लवकरच बाद झाला मात्र सलामीला आलेल्या राकेशने 36 धावा काढत संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले. शेवटच्या षटकात 6 चेंडु व 11 धावा अशी स्थिती असतांना भूषणने 2 चौके मारुन संघाला विजयाजवळ आणले. व चौकार मारुन विजयीश्री मिळविली.
गडचिरोली संघाकडून राकेश 36, अमोल 19, रोशन 17, भूषण 15 व सुनिलने 5 धावा काढल्या. तर चंद्रपूर कडून सुजित 18, समिर 7, विनोद 28, सुरेश 3 व अमोलने 13 धावा काढल्या. गडचिरोलीकडून भूषण, रुपेश, सुनिल व अमोल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला तर चंद्रपूर कडून राहूल 1, शैलेश 1, व सुरेशनी 2 गडी बाद केले. सामन्याचे पंच म्हणून श्रीकृष्ण उपर्वट, प्रकाश तुमाने व संजय यांनी काम पाहिले. अतिरिक्त जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण बडकेलवार, गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपजिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, नियोजन अधिकारी एम.एम.सोनकुसरे यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.