Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी ०१, २०१३

उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदीचा प्रस्ताव स्वीकारला


चंद्रपूर- जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याच्या मागणीसाठी अ‍ॅड . पारोमता गोस्वामी यांच्यानेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या तब्बल ९७ महिलांची शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारासनागपुरातील मध्यवर्ती कारागृहातून सुटका होणार आहे . गृहमंत्री आर . आर . पाटील यांनीत्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले आहेत , असे आंदोलनकर्ते विजय सिद्धावार यांनी सांगितले . चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त करण्याचा निर्णय एका महिन्यात घेण्यात येईल , असा शब्द मुख्यमंत्रीपृथ्वीराज चव्हाण यांनी अ‍ॅड . गोस्वामी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला १२ डिसेंबरला दिलाहोता . परंतु एका महिन्यात दारूबंदी झाली नाही . त्यामुळे १३ तारखेला चंद्रपुरात आंदोलकत्र्यांनीसत्याग्रहाची शपथ घेतली. २६ जानेवारीला चंद्रपुरात जेलभरो आंदोलन केले . त्यात तिनशेवरमहिला व पुरूषांनी स्वतःला अटक करून घेतली. अ‍ॅड . गोस्वामी व त्यांच्यासह अटक केलेल्या ९७ महिलांना नागपुरातील मध्यवर्ती कारागृहातठेवण्यात आले . ८७ पुरूषांना चंद्रपुरातील कारागृहात ठेवण्यात आले . त्यांची नंतर जाम िनावरसुटका करण्यात आली . परंतु महिला आंदोलनकत्र्यांनी जाम िन घेण्यास नकार दिला . त्यानंतरमुख्यमंत्री चव्हाण यांनी नागपुरातील जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकत्र्यांची भेट घेण्याची सूचना केली. येत्या एक महिन्यात दारूबंदीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल , असानिरोप पाठव िला . त्यानंतरही महिलांनी कारागृहाबाहेर न येण्याचा निर्णय घेतला . तेव्हा गृहमंत्रीपाटील यांनी बुधवारी आंदोलनकत्र्या म हिलांवरील सर्व आरोप मागे घेतले . सरकार दरबारीझालेल्या हालचालीनंतर अ‍ॅड . गोस्वामी यांनी जामीन स्वीकारला . त्यांच्यासह सर्व आंदोलनकत्र्यामहिला शुक्रवारी कारागृहाबाहेर येणार आहे . कौटुंबिक न्यायालयाच्या सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीशमीरा खडक्कार , विदर्भ लेडी लॉयर्स असोसिएशनच्या पदाधिकारी , भारतीय स्त्रीशक्तीच्या पदाधिकारीअ‍ॅड . गोस्वामी आणि आंदोलनकत्र्या महिलांचे कारागृहाबाहेर अभिनंदन करणार आहेत


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.