Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी ०१, २०१३

लोकबिरादरीसाठी शंकर एहसान लॉय गाणार

बाबा आमटेंच्या स्वप्नातील लोकबिरादरी प्रकल्पाच्या आर्थिक मदतीसाठी देशातील प्रसिद्ध संगीतकारआणि गायक शंकर एहसान लॉयपुढे आले आहेत बाबा आमटेंनी सुरू केलेला हा दवाखानाआता मोडकळीस आला आहे या दवाखान्याच्या पुनर्निमाणासाठी एका म्युझिकल कॉन्सर्ट चेआयोजन करण्यात आले असून यात शंकर एहसान लॉय परफॉर्म करणार आहेत अशीमाहितीएका पत्रकार परिषदेत देण्यात आली 
९ फेब्रुवारी रोजी हॉटेल सन अॅन्ड सॅन्ड मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .शंकर एहसान लॉय यांनी परफॉर्म करावे यासाठी गेल्या काही काळापासून प्रयत्न करण्यात येतहोते त्यांनी यासाठी सहमतीसुद्धा दर्शविली होती कार्यक्रमातील १८ कलाकारांना त्यांचे मानधनदेण्यात येईल परंतु लोकबिरादरी दवाखान्याच्या आर्थिक मदतीसाठी हा कार्यक्रम असल्याने शंकर -एहसान लॉय यांनी या कार्यक्रमाचे मानधन घेण्यासाठी नकार दिला आहे असे प्रशांत उगेमुगेयांनी सांगितले 
कार्यक्रमासाठी १० हजार ५ हजार आणि ३ हजार अशी तीन प्रकारची विशेष देगणी तिकीटेअसतील १ हजार ४०० देगणी तिकीटांची व्यवस्था करण्यात आली आहे या कार्यक्रमातून ५० ते६० लाख रुपये इतका निधी गोळा होण्याची आशा आहे ही संपूर्ण रक्कम या दवाखान्याच्यापुनर्निमाणासाठी लावण्यात येणार आहे असे अनिकेत आमटे यांनी सांगितले यावेळी मनिषसंघवी दिनेश राठी उपस्थित होते अधिक माहितीसाठी ७५८८७७२८५७ केतन आणि७५८८७७२८५८ (सचिनया क्रमांकावर संपर्क साधावा 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.