इदं नगरं देवयुगे पुष्पक संशितम्त्रेतायां माणिपूरच भानकं द्वापरेपिचकलौ तु भद्रकं नामख्यातं भविष्यति
विदर्भातील प्राचीन नगरांपैकी ङ्कारच थोडी नगरे आपली ऐतिहासिक पृष्ठभुमी बाळगून आहेत. भद्रावती हे त्यापैकी एक आहे. प्रागैतिहासिक काळापासून मध्यकाळापर्यंत व नंतरच्या काळातील अवशेषांचे भांडार आपल्या उदरात या शहराने घेतले आहे. भद्रावती गावातील जुना परिसर हा गौराळा, विजासन, चिचोर्डी, सुमठाना, घुटकाळा, आयुध निर्माणी व आताशा गेल्या दशकात तयार झालेल्या नविन ले-आऊट्स मिळून भद्रावती हे शहर तयार होतं.
तालुका मुख्यालय असलेले भद्रावती हे शहर महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूरवरून उत्तरेस २५ कि.मी. अंतरावर, नागपूरवरून दक्षिण पुर्वेस १२५ कि.मी. अंतरावर व वणीवरून वरोरा मार्गे ४० कि.मी. अंतरावर आहे.
भद्रावतीच्या दक्षिणेस दोन कि.मी. अंतरावर मध्यरेल्वेचे रेल्वे स्थानक असून येथे पॅसेंजर व जनता गाड्या थांबतात. नविन बस स्थानक वरोरा-चंद्रपूर राज्य महामार्ग क्रं. २६४ वर असल्यामुळे गावाचा विस्तार बस - स्थानक ते रेल्वे स्थानक असा तीन कि.मी. झालेला आहे. शहरातील सर्व भागांना जोडणारा हा एक मात्र, रस्ता आहे. त्यामुळे एका रस्त्याचे शहर असेही भद्रावतीला म्हटल्या जाते.
भद्रावती शहर एक दुष्टिक्षेप
क्षेत्रळ (चौ.कि.मी.) : ३६.०१
लोकसंख्या : ६४५००
नगरपरिषद : (स्थापना १५ ऑगस्ट १९९७)
वॉर्डांची संख्या : २६
पोलीस ठाणी : १
प्राथ-आरोग्य केंद्र : १
शाळांची संख्या : ९
महाविद्यालयांची संख्या : २
साक्षरता प्रमाण : ६० टक्के
बगिचा : ०
क्रिडांगण : ०
हुतात्मा स्मारक : १
विविध धर्मिय एकूण धार्मिक स्थळ : ७५
तलाव : ३००
देशातील प्रथम सिरॅमिक प्लॅण्ट : १
............
भद्रावती शहरात प्रथम
प्रथमविद्यमान
तहसीलदारश्री. प्रसाद मत्ते
मुख्याधिकारीश्री. आर.एन. देशमुख श्री. डॉ. विजय इंगोले
पोलीस निरीक्षकश्री. रमेश सरवदे
संवर्ग विकास अधिकारीश्री. मानकर
वैद्यकीय अधिकारीकुंभारेकन्नाके
न्यायदंडाधिकारी
सरपंचश्री. निळकंठराव गुंडावार........
नगराध्यक्षश्री. सुनील नामोजवारसौ. मिनल आत्राम
आमदार श्री. आर. के. पाटीलश्री. संजय देवतळे
..............
शहराला मिळालेला ऐतिहासिक वारसाख मुबलक खनिज साठा, बारमाही पाण्याची व्यवस्था, शहराच्या आजुबाजूला झालेला औद्योगिक विकास, विविध पक्षीय राजकीय पुढाèयांची भरमार, आदी अनेक बाबी शहराला जमेच्या अजूनही भद्रावती शहराच्या विकासात व नियोजनात अनेक उणीवा व समस्या आहेत.
१. तालुक्यातील भौगोलिकतेचा शहराच्या अर्थव्यवस्थेवर झालेला प्रभाव :
भद्रावती तालुका हा भौगोलिक दुष्टीकोणातून शहराच्या तीन बाजूने विखुरला आहे. वायव्य पूर्व दिशेला चोरा-चंदनखेडा रस्ता आहे. ज्या बाजूला चोरा चंदनखेडा टेमुर्डा शेगांव अशी मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या खेळी आहेत. या परिसरातील अनेक गावातील लोकं ही विनिमयाच्या दृष्टीने शेगांव व वरोरा येथील बाजारपेठेकडे मोठ्या प्रमाणात वळतात. तसेच शहराच्या पश्चिमेकडील माजरी कुचना या परिसरातील गावकरी हे वणी व वरोरा येथभल बाजारपेठेकडे वळतात कारण तालुक्यातील या परिसरांना भद्रावती पेक्षा वरोरा हे शहर व बाजारपेठ भौगोलिक दुष्ट्या जवळ पडते. तर शहराच्या दक्षिणेकडील म्हणजे घोडपेठ, पिपरी घोनाड धानोली या परिसरातील गावकèयांना चंद्रपूर हे शहर अंतराने व वाहतुकीच्या दृष्टीने जवळ पडते. त्यामुळे साहाजिकच आपोआप भद्रावती शहरात तालुक्यातून वस्तुविनिमय करण्याकरिता येणाèया लोकांचा ओघ कमी आहे.
भद्रावती शहरात आयुध निर्माणी कर्मचारी, डब्लू.सी.एल. कर्मचारी व शिक्षक तथा शासकीय कर्मचारी असा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, भद्रावतीच्या बाजारपेठेची शोकांतिका अशी आहे की, येथला नगदी ग्राहक हा वरोरा, माढेळी, qहगणघाट, नागपूर व चंद्रपूर या बाजारपेठेत जावून खरेदी करतो. व उधार वस्तु खरेदी करणारा ग्राहक हा भद्रावती बाजारपेठेला मिळतो. त्यामुळेही मउधारीची बाजारपेठङ्क असे शहराच्या बाजारपेठेला म्हटल्या जाते. त्यामुळे साहाजिकच शहरातील बाजारपेठेतल्या वस्तु महाग होवून जातात. उधारीत ग्राहकांकडून अधिक पैसा जातो. मात्र, हे ग्राहकांनाही कळत नाही.
सोबतच येथील आयुध निर्माण वसाहतीत स्वस्त दराच्या जिवनावश्यक वस्तुची कॅन्टीन आहे. जिथे मर्यादीतपणा नसल्यामुळे जास्तीत जास्त लोकं या कॅन्टीन मधून दैनंदिन वस्तु खरेदी करतात. (येथील बèयाच वस्तु बाहेरच्या बाजारातही विकल्या जातात) एम.आर.पी. पेक्षा कमी qकमतीत वस्तु मिळत असल्यामुळेही त्याचा परिणाम भद्रावतीच्या बाजारपेठेवर होतो.
परिणामत: एक मोठा विरोधाभास भद्रावतीच्या बाजारपेठेत तयार झाल्यामुळे भद्रावतीच्या व्यावसायिकांमध्ये व्यवसायाला घेवून ङ्कारसी उमेद नाही. व व्यवसाय मोठा करण्याची मानसिकता नाही. त्यामुळे शहरातील टप्पा व मुख्य बाजारपेठेचा परिसर सोडला असता शहरात बाजारपेठेला साजीशी झगमगाट दिसून येत नाही.
पार्कींगची समस्या
शहरातील प्रमुख समस्यांमध्येच पार्कींगची समस्या आहे. शहरातील मुख्य रस्त्याच्या कुठल्याही कडेला अस्ताव्यस्त वाहने पार्क केल्याचे चित्र दिसून येते. नागपूर-चंद्रपूर महामार्ग शहरातून जातो. या महामार्गावर ऑटो-ट्रक-हायवा-ट्रॅक्स-सुमो-काळी पिवळी-३०७ या सारखी वाहने वाट्टेल तशी उभी असतात. महामार्गावरच असलेल्या बसस्थानकापासून नियमाप्रमाणे खाजगी प्रवासी वाहने २०० मीटर अंतरावर असायला हवी मात्र, बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच खाजगी प्रवासी वाहने मोठ्या प्रमाणात उभी असतात. ऑटो-काळी पिवळी ही वाहने बसस्थानकातून निघणाèया प्रवाशांची वाट अडवणू असतात.
शहरातील हॉटेल्स, बीअरबार व इतर प्रतिष्ठाणामुळे पार्कींगची व्यवस्था नसल्याने पेट्रोल पंप चौक, भद्रनाग इण्डेन गॅस कार्यालय, श्री. मंगल कार्यालयापुढील पान ठेल्या पुढे, qशदे महाविद्यालय व त्यापुढील दारूभट्टी पुढे, एच.डी.एङ्क.सी., कन्यका, महाराष्ट्र या बँकापुढे, जुना बस स्थानक, गांधी चौक, एम.एस.ई.बी. कार्यालय, आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहतूक व्यवस्था प्रभावित होते.
आश्चर्याची बाब म्हणजे, खूद्द नगर परिषदेच्या ईमारतीलाच पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे न.प. पुढे रस्त्यावर वाहनांची चांगलीच गर्दी असते.
३. महागणदारी-र्युक्त शहरङ्क
महाराष्ट्र शासन महागणदारी मुक्त ग्राम योजनाङ्क राबवित आहे. मात्र, भद्रावती हे तालुका स्थळ असूनही शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवरच नागरीक शौचास बसतात. पद्मावार वाडी, चंडिका वॉर्ड, स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता, qवजासन येथील रस्ता, वरोèयाकडे जाणारा महामार्ग, डोलारा वॉर्डापुढील रस्ता, सुमठाना, गवराळा येथील गणेश मंदिराकडे जाणारा रस्ता, केसुर्लीकडे जाणारा रस्ता, बंगाली कॅम्पकडे जाणारा रस्ता या सर्व रस्त्यांवरच नागरिक शौचास बसतात. त्यामुळे घाण व दुर्गंधी चे साम्राज्य शहराची प्रतिमा खराब करीत आहे.
यात नागरिक स्वत:मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. व न.प. प्रशासनांनी देखील सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करून या विरोधात कडक पाऊले उचलणे आवश्यक झाले आहे.
४. मपुरग्रस्त भद्रावतीङ्क
पुरग्रस्त ईलाक्यांसाठी सरकार आपात्कालीन तथा पुर्व योजना आखतात. मात्र, भद्रावती न.प. द्वारा आपात्कालीन तर नाहीच मात्र, पूर्व नियोजन मागील कित्येक वर्षांपासून केलेले नाही. प्रत्येक पावसाळ्यात गौतम नगर, गुरुनगर, qवजासन, श्रीकृष्ण नगर, आदी प्रभागातील रस्त्यांवर व घरांमध्ये पावसाचे पाणी साचते. व नागरिकांना रात्र पाण्यात काढावी लागते. डोलारा तलावात आता अतिक्रमण वाढल्याने तिथपासूनचे पावसाचे पाणी हे गुरुनगर, गौतमनगर व महामार्गाच्या कडेला येवून साचते.
हा ङ्कार जुना प्रश्न आहे. मात्र, न.प. ला वारंवार नागरिकांनी निवेदन देवूनही या समस्येकडे दुर्लक्ष झालेले आहे. पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात पुन्हा नागरिकांना पाण्यात रात्री काढाव्या लागतील.
५. जलव्यवस्थापन नाही
शेकडो खाजगी तथा सार्वजनिक तलाव, विहीरी, शहराला लागून असलेली बारमाही वर्धा नदी, कोंढा नाला आदी पाण्याचा मुबलक जलसाठा शहराच्या भुगर्भात आहे. मात्र, या सर्व जलाशयांचे पाहिजे तसे नियोजन व देखरेख नाही. शहरात खाजगी बोअर हा प्रकार घरोघरी दिसून येतो. त्यामुळे जलउपसा मोठा आहे. पाण्याची टंचाई नसल्यामुळे अपव्यय वाढला आहे. जल - नियोजन नाही. सार्वजनिक विहीरी व तलावांची स्वच्छता प्रतिवर्षी केल्या जात नाही. बèयाच वॉर्डात तर शुध्द पिण्याच्या पाण्याचा अभावच आहे. उलट गौतम नगर मधील मोठी विहीर बुजविण्याचा बिनडोकपणा न.प. द्वारा केल्या जात आहे.
सध्या वर्धा नदीवरून भद्रावतीला २९ कोटी ८३ लाख रूपयांची पाणी पुरवठा योजना शुध्द पाण्याचा पुरवठा होण्याकरिता मोठा जलशुध्दीकरण प्रकल्प निर्मिती सुरू आहे. ही न.प. ची महत्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात नागरिकांना शुध्द पाणी मिळेल.
६. ग्रामीण रूग्णालय
जवळपास ६५ हजार लोकसंख्येकरिता शहरात एक ग्रामीण रूग्णालय आहे. त्यात केवळ एक डॉक्टर असतो. बेड चा तुटवडा आहे. केवळ ३० बेड आहेत. आवश्यक औषधी व सोयी सुविधांचा अभाव आहे. छोट्या - मोठ्या सर्वच आजारांवरील रूग्णांना मरेङ्कर टू चंद्रपूरङ्क असा उपचार चालतो. विशेष बाब म्हणजे येथील चिरघरात विद्युत व्यवस्था नाही. दि. २३ ला झालेल्या अपघातातील मृत्यू पावलेल्या इसमांचे पोस्टमार्टम हे दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात करण्यात आले. त्यामुळे भद्रावतीचे ग्रामीण रूग्णालय ही शहराची मोठी qचताच आहे. मृत्यूनंतरही येथे यातनांचा अंत होत नाही. मबेबी केअर युनिटङ्क नाही. मट्रॉमा केअर सेंटरङ्क.
७. मुख्य रस्त्याचे द्विभाजक
सध्या शहरातील पेट्रोल पंप ते रेल्वे स्थानकपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे द्विभाजकाचे काम सुरू आहे. या कामात नियोजनाचा पूर्ण अभाव आहे. दोन टप्प्यात द्विभाजकाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जुन्या बसस्थानकापर्यंतचे कामझाले. आता जुना बसस्थानक ते नागमंदिर चौकापर्यंतचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील कामाचा न.प. ला अनुभव आहे. तरीही पण दुसèया टप्प्याच्या कामात मोठाच गौडबंगाल आहे. ऐन दिवाळीच्या दिवसातच रस्ता मधोमध खोदून ठेवल्या गेला. द्विभाजकाचे काम सुरू करण्याअगोदर विद्युत खोबांची योग्य विल्हेवाट लावायला हवी होती. मात्र, तसे न केल्या गेल्यामुळे रस्ता अरुंद झाला व केवळ ५ ङ्कुटाच्या रस्तयांवरून वाहतुक दिवसभर सुरू असते. यात किरकोळ अपघात नेहमीचे झालेले आहे.
विद्युत खांबा वरिल विद्युत तार ही अंडरग्राऊंड घ्यावी, अशी सूचना सामाजिक कार्यकत्र्यांनी दिली. मात्र, न.प. प्रशासन ऐकूण घ्यायला तयार नाही. याचा परिणामअसा झाला की, शहरातील मोठमोठी वृक्ष तोडावी लागली.
जवळपास एक महिना होवूनही द्विभाजकाचे काम खोदूण ठेवल्यापुढे गेले नाही. ऐवढ्या रहदारीच्या रस्त्यावरील द्विभाजक शक्य तेवढ्या लवकर व्हावी, असे नागरिकांना वाटते.
८. शहरात झोपडपट्टीचे अतिक्रमण
मागील गेल्या दशकात शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण वाढलेले आहे. वोट बँकेकरिता येथील काही राजकीय पक्ष या झोपडपट्ट्यांना संरक्षण देताना दिसून येते. मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत लोकं सुरवातीला झोपड्या व कालांतराने पक्की घरे बांधून राहू लागले आहेत. या झोपडपट्ट्यांच्या विरोधात कुणी साधे बोलले तरी त्याला मत्याङ्क जमावांचा रोष सहन करावा लागतो.
विशेषत: नागपूर-चंद्रपूर महामार्गाला लागून असलेल्या डोलारा या प्राचीन तलावात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसलेली आहे. त्यामुळे या तलावाचे अस्तित्वच संपले आहे. याव्यतिरिक्त शहरातील वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व शासकीय जागांवर झोपडपट्टींचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे. ङ्कुकट नगर येथील झोपडपट्ट्यांवर याआधी एका वार्ताहरांनी समस्या मांडली असता त्यांच्या घरावर झोपडपट्टी रहिवास्यांनी मोर्चा काढला असल्याची बातमी जुनी नाही. त्यामुळे झोपडपट्टी ही एक मोठीच समस्या शहरात आहे.
(झोपडपट्ट्यांना नियोजन नसल्यामुळे व गरीब, अशिक्षित वर्ग वाढल्याने शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.)
९. घनकचरा प्रकल्प धुळखात
भद्रावती न.प. अंतर्गत लाखो रूपये खर्चून महत्त्वाकांक्षी घनकचरा प्रकल्प उभारल्या गेला. मात्र, एक-दोन वर्षानंतर हा प्रकल्प आजतागायत पांढरा हत्ती बनून राहिला आहे. यात शासनाच्या लाखो रूपयांचा चुराडा तर झालाच मात्र, शहरात कचरा व घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले. यापैकी दुसरा सेंद्रीय खत प्रकल्प हा ठेकेदारी पध्दतीने यावर्षीपासून सुरू झालेला आहे.
१०. क्रिडांगण व बगीचा
६५ हजार लोकवस्तीच्या शहरात एक क्रिंडागण व एक बगीचा नसणे ही एक शोकांतिकाच आहे. यापैकी शहरात परवानगी मिळालेली आहे व मागील २ वर्षांपूर्वीच क्रीडांगणाकरिता निधी उपलब्ध झाला. मात्र, अजूनपर्यंत क्रीडांगणाच्या बांधकामाचे भूमिपूजन झालेले नाही.
११. शहराला झुडूपी जंगलाचा वेढा
भद्रावती लगत १९८.९५ हेक्टर झुडपी जंगल आहे. भद्रावती शहराच्या अवतीभवती वनविभागाच्या झुडपी जंगलामुळे अनेक प्रकल्प रखडलेले आहे. बंगाली कॅम्प कडे जाताना अशीच खूप मोठी जागा झुडूपी जंगलामुळे पडीत आहे. शहरातील बगीचा व इतर अनेक लोकोपयोगी इमारती व कामांकरिता या जागेचा वापर होवू शकतो. मात्र, वनविभाग व स्थानिक प्रशासन याबाबत निरूत्साही आहेत.
१२. डुक्कर व मोकाट जनावरांचा त्रास
शहरातील मार्केट परिसर व मुख्य रस्त्यांवर डुक्कर तथा मोकाट जनावरे, कुत्रे मोठ्या प्रमाणात वाहतूकीला अडसर बनतात. व त्यामुळे अपघात व रोगराईला नियंत्रण मिळते.
१३. भाजी मार्केट
शहरातील मध्यभागी असलेले भाजीमार्केट घाणीच्या विळख्यात आहे. तेथील नाल्या व परिसरात घाण, पाणी व कचरा सदैव पडलेला असतो. त्यामुळे परिसरात डुकरांचा सुळसूळाट वाढलाच आहे. व अशा घाणीतच येथील ग्राहक भाजी खरेदी करतात. न.प. द्वारा नियमित स्वच्छता केल्या जात नाही. भाजीविक्रेते देखील त्याच परिसरात घाण करून ठेवत असतात.
ऐवढ्या वर्षात शहराला आठवडी बाजाराकरिता हक्काची जागा मिळालेली नाही. त्यामुळे आठवडी बाजार, हा शहराच्या मधोमध रस्त्यांवर भरल्या जातो. मिरची बाजार नागमंदिर पुढील खुल्या जागेत भरतो. त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी वाहतुकीची मोठी समस्या असते.
विशेषत: पोलीस स्थानकापासून तर qवजासन रस्त्यापर्यंत अरूंद रस्त्यामुळे वाहनांची येथे नेहमी कोंडी होते. न.प. सदर रस्ता मोकळा करण्यात पाऊले उचलत नाही तर व्यापारी म्हणतात की, ही आमचीच जागा आहे. असे असेल तर व्यापाèयांनी हा रस्ता कायमचा बंद करून टाकावा मात्र, व्यावसायांवर परिणाम होईल म्हणून ते तसे करित नाहीत. याचा परिणाम ग्राहक व नागरिकांवर होवून रहदारी पूर्णत: प्रभावित होत असते.
१४. मुख्य रस्त्यांसह इतर रस्ते विकसित व्हावे :-
पेट्रोल पंप चौक ते रेल्वे स्टेशन या एकमात्र रस्त्यांव्यतिरिक्त इतर रस्तेही न.प. द्वारा विकसित करण्यात यावे. म्हणजे एकाच मार्गावरील रहदारी कमी होईल. इतर रस्ते विकसित होईल व शहराचा आवाका वाढेल.
श्रीराम नगर पासून ग्रामीण रूग्णालय ते जुना बस स्टॉप, कोंढा रस्ता ते केसुर्ली - बंगाल कॅम्प रस्ता, तेलवासा - गवराळा ते शहर, qशदे महाविद्यालयाच्या बाजूने जाणारा वळणरस्ता, ठेंगे प्लॉट पासून qशदे पेट्रोलपंप पर्यंतचा रस्ता, गौतम नगर ते डिङ्केन्सचा रस्ता, सुमठाणा - दरबार सोसायटी - शिवाजी नगर रस्ता हे सर्व शहरात प्रवेश करणारे रस्ते रूंद करून सुशोभित केल्यास शहराचा आवाका वाढेल व रहदारी कमी होईल. शहर प्रशस्त बनेल.
१५. तलाव व पर्यटन विकास / मंदिरांची अवस्था :-
शहरात असंख्य मामा तलाव आहेत. यात बरीच खाजगी आहे. या तलावांना न.प. ने अधिग्रहित करून त्यांचे खोलीकरण करून सुशोभीकरण केल्यास भूजल पातळी वाढेल व सौंदर्यीकरण होवू शकते.
पर्यटनाच्या दृष्टीकोनातून म्हणावा तसा विकास न.प. द्वारा अजून साधल्या गेला नाही. आजपर्यंत करोडो रूपये पर्यटन निधीच्या नावावर आलेत. मात्र, शहरात चार प्रवेशद्वारा व्यतिरिक्त ङ्कारसा विकास झालेला नाही.
शहर हे ऐतिहासीक व त्रिधर्मीय संगम असल्याने धार्मिक स्थळांची संख्या मोठी आहे. यात बरीच धार्मिक मंदिरे, गुंङ्का या खाजगी मालकीच्या अथवा धर्मदाय आयुक्तालयात नोंदणीकृत आहेत व बरीच पुरातत्वीय विभागातङ्र्के संवर्धीत आहे. त्यामुळे या सर्व धार्मिक स्थळांचा विकास रखडलेलाच आहे.
यापैकी जैनमंदिर व नागमंदिर या दोनच धार्मिक स्थळांचा विकास दिसून येतो. पुरातत्वीय विभागाचे दुर्लक्षामुळे अनेक प्राचीन अवशेष शहरात अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत आहे.
यासाठी येथील इतिहासप्रेमींनी न.प. कडे पुरातन अवशेषांचे मनगर म्युझीअमङ्कची केलेली मागणी धुळखात आहे.
याबाबत बुध्दीजीवी लोकांचा एक दुसरा विचार असा आहे की, नागमंदिरासारखं प्राचीन मंदिराचं सुशोभिकरण व आधुनिक वास्तुत रूपांतर केल्यास आपण येणाèया पिढ्यांना प्राचीन वारसा दाखवू शकणार कां? त्यापेक्षा प्राचीन वारस्यांच जतन करणे योग्य होईल, हा मतप्रवाह शहरात आहे.
राका तलावाजवळील लेणी, अष्टभूजा अथवा भवानी देवीच्या मंदिराचे भग्न अवशेष, गौराडा येथील गणेश मंदिर, यवनाश्व राजाचा महाल, प्राथमिक स्वास्थ केंद्राजवळील भवानी मंदिर, चंडीका मंदिर, जयनारायण सुर्यमंदिर, विवेकानंद शाळेसमोरील मंदिर स्तंभ, पंचशील वॉर्डातील भग्न मंदिर अवशेष, लुम्बीनी नगर मधील मंदिर अवशेष, डोलारा तलावातील आडवा मारोती, किल्ला वॉर्डातील भव्य किल्ला व तेथील विविध प्रतिमा, भंगाराम वॉर्डातील बालाजी मंदिर, अॅड. रायपुरे यांच्या घरापुढील अस्ताव्यस्त कुबेर प्रतिमा, शिवqपढ आदी मुत्र्या, आदी अनेक प्राचीन - पुरातन वास्तु, मंदिरे, मुत्र्या शहरात जागोजागी अतिषय दयनीय अवस्थेत विखुरलेल्या आहेत.
याकडे पुरातत्व विभाग, स्थानिक प्रशासन, नागरिक यापैकी कुणीच संवर्धनाच्या दृष्टीने लक्ष देत नाहीत.
१६. शहराला वाकुल्या दाखवून जात असलेल्या रेल्वे गाड्या :-
भद्रावती हे ममिनी इंडियाङ्क शहर आहे. या शहरात विविध प्रांतीय, भाषीय लोक आयुधनिर्माणी, डब्ल्यू.सी.एल. च्या माध्यमातून वास्तव्यास आहे. जैन मंदिर सारखे प्रतिष्ठित जैन बांधवांचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे विविध प्रांतातील मोठ-मोठ्या शहरांना जोडणाèया रेल्वेगाड्यांचा थांबा येथील रेल्वेस्थानकावर देणे आवश्यक आहे. मात्र, येथून जात असलेल्या ५५ रेल्वेगाड्या शहरवासियांना वाकोल्या दाखवित निघून जातात.
१७. कोल माईन्स करतील शहराचा विनाश :-
भद्रावती शहराच्या सिमेवर कोल माईन्सचे अधिराज्य आहे. ढोरवासा, तेलवासा, चारगांव, कुनाडा, माजरी येथील डब्ल्यू.सी.एल. च्या कोळसा खाणींमुळे शहरातील भूजल पातळी खालावत चालली आहे. ब्लास्टींगमुळे घरांना भेगा पडत आहेत. प्रदुषण, तापमान यांचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक झालेले आहे. त्यातून आजार वाढले आहेत. सोबतच शहरापासून ३ कि.मी. अंतरावर असलेली बरांज येथील कर्नाटका एम्टा कोल माईन्सने पर्यावरण संवर्धनाचे सर्व नियम धाब्यावर बसविल्याने शहराचे जनजिवन प्रभावित झालेले आहे. या खाणीतील दुषित पाणी कोंढा नाल्यात सोडल्यामुळे व नाल्याचे पाणी पिण्याकरिता भद्रावतीकर वापरीत असल्याने नागरिकांच्या जिवनाशीच खेळण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे भद्रावतीचा विनाश येत्या दशकात कोल माईन्सद्वारे होणार हे भाकीत आहे.