Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १४, २०१३

वाट चुकलेले वरोरा


वाट चुकलेले वरोरा

वाकटक राज्याच्या कालखंडात वरोरा शहराची मवरदाखेडम  अशी ओळख होती. ११ व्या शतकात कल्याणीच्या कालखंडातील मिळालेल्या ताम्रपत्रात मवरोडाङ्क या असा उल्लेख दिसून येतो. इंग्रजांच्या कालखंडात मवरोडाङ्कचा अपभ्रंश वरोरा असा झाला. तेव्हा वरोरा हेच नाव या शहराला प्रचलित झाले. महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, गाडगे महाराज या महापुरूषांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे.  स्वातंत्र्य सग्राम काळातील या परिसरात वरोरा हे मुख्य केंद्र होते.  १९४२ च्या स्वातंत्र्य संग्रामाला वरोरा शहराचे ङ्कार मोठे योगदान आहे. इंग्रजांच्या काळामध्ये या ठिकाणी त्यांची  छावणी होती. त्यांनी या शहरामध्ये रेल्वे मार्ग आणला. रुग्णालयाची निर्मिती केली. कोळशाच्या खाणी व कापसाची बाजार पेठ येथे होती.  कापसाची जिqनग होती.
स्वातंत्र्यानंतर बाबा आमटे यांनी कृष्ठरूग्णांसाठी स्थापन केलेल्या मआनंदवनाङ्कमुळे वरोरा जगाच्या नकाशावर आले.  असे शाली इतिहास आणि वर्तमान लाभलेल्या या शहराची ओळख प्रदूषणाच्या विळख्यात हरविली आहे. शहराचा सांस्कृतिक चेहराही धुसर झाला आहे.
                                                                             
वरोरा शहर दृष्टिक्षेपक्षेत्रळ - ७९३ (हेक्टर)लोकसंख्या - ४६५५४,
स्त्री -२२९२६,
पुरुष- २३६२३नगर परिषद स्थापना १७ मे १८६७,
वॉर्डाची संख्या २३,
पोलिस ठाणे -०१,
प्राथमिक आरोग्य केंद्र ०१,
महाविद्यालयाची संख्या -२,
साक्षरता प्रमाण ८० टक्के,
हुतात्मा स्मारक -१,
                                                                              
समस्या यांना सांगा
आमदार संजय देवतळे (जिल्ह्याचे पालकमंत्री) -९८२२५६५८११,
नगराध्यक्ष विलास टिपले -९८२२६९०००३
मुख्याधिकारी सुमेध अलोणे- ९९७५२१९९३४,
पोलिस निरीक्षक अशोक कोळी -९८२१६४४४४४
वैद्यकीय अधिकारी ....देशमुख- ९४२२१२२९२२
सवर्ग विकास अधिकारी..... वैरागडे -९३७१०१४५६६
तहसीलदार कदम - ९४२२०४५४०२
                                                                              
अतिक्रमणाच्या विळख्यात शहर
शहरात अतिक्रमणात वाढ होत आहे. जुना वरोरा नाका ते वणी नाका मार्गावरून दोन मोठी वाहने जाण्याइतका रस्ता असूनही मोठी वाहने धड जाऊ  शकत नाही. या मार्गावर बड्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करून रस्ता गिळंकृत केला.  शहराच्या सभोवताली झोपडपट्टी प्रमाणातही वाढ झालेली आहे.
                                                                              
खड्ड्यात रस्ते
शहरातील मुख्य मार्गावरील अंतर्गत रस्ते पूर्णता उखडलेले आहे. या रस्त्यावर मोठ मोठ खड्डे पडले आहे. अपघाताचे प्रमाणही वाढलेआहे. पावसाळ्यात या खड्यात पाणी साचल्यामुळे खड्यांना डबक्याचे स्वरूप आले आहे. डॉ. सैनानी यांच्या रुग्णालयापासून तर डॉ. खापणेच्या रुग्णालयापर्यंत पावसाळ्यात पाणी साचून राहते. शहरात असा एकही रस्ता नाही. की ज्या रस्त्यामध्ये खड्डे
                                                                              
रस्त्यावर मासविक्री
नगर पालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून मटन मार्केट बांधले.
मात्र सुरवातीपासून या मार्केटमध्ये मांस विक्रेते बसले नाही. आताही इमारत मोडकळीस आली आहे. नगर परिषद प्रशासनाने रस्त्या दुरुस्ती दुसरे मटन मार्केट बांधण्यासाठी खर्च केला. पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन झाले तरीही मास विक्रेते रस्त्यावर बसत आहेत. परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
                                                                              
शिक्षणाचे माहेरघर
शहराची दुरवस्था झाली असतानाही येथील शैक्षणिक दर्जा आजही टिकून आहे. शिक्षणाचे माहेरघर अशी या शहराची ओळख आहे. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. येथे निकेतन औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, कृषी पदविका आदी व्यावसायिक महाविद्यालय आहे. हे या शहराचे भूषण आहे.
                                                                              
ग्रामीण रुग्णालय
जवळपास ५० हजार लोकसंख्येकरीता  येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. त्या ५० खाटा आहेत. वरोरा शहर औद्योगीक दृष्ट्या विकसित होत असल्याने अपघात प्रमाण वाढले आहे. प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. वैद्यकीयांचा अभाव, अपुèया खाटा, औषधांचा तुटवडा व काही महत्वाची यंत्र नेहमीच येथे बंद राहतात.त्यामुळेमुळे मरेङ्कर टू चंद्रपूरङ्कअशीच अवस्था रुग्णालयाची आहे.
                                                                              
रेल्वे थांबा हवा
वरोरा शहरातील आनंदवन हे जगाच्या नकाशावर आले आहे. आनंदवन भेट देण्यासाठी नेहमी मोठ्या प्रमाणात परदेशी लोक येत असतात, मात्र येथे महत्वाच्या रेल्वे गाड्याचा थांबा नसल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
                                                                              
दारूचा महापूर
वाढत्या औद्योगिक करणामुळे काही प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहे. शेतकèयांच्या जमीनी गेल्या. त्यांच्या हातात पैसा खुळखुळायला लागला आहे. याचा परिणाम या शहराची सांस्कृतिक ओळख पुसण्यासाठी झाला आहे. पैसा आला, उद्योग आले तशी दारूची दुकानेही इथे वाढली. जवळपास पन्नास लोकसंख्येच्या या गावात एक झडन बिअरबार आहे. दोन दारूची  दुकाने आहेत.  शहरातील प्रत्येक भागात सहज दारु उपलब्ध होत आहे. अनेक  कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे. गरीब कुटुंबातील महिलासंह शाळकरी मुलेही याच्या विळख्यात सापडली आहे.
                                                                              
वीजखांब रस्त्यावर
शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्यात वीज वितरण कंपनीचे पोल अगदी रस्त्यात आहे. वरोरा नाका ते रेल्वे स्टेशन मार्गावरील विद्युत पोल मध्ये आजपर्यंत अनेक अपघात घडलेआहेत. सदर विद्युत पोल जणूकाही अपघातास आव्हान देत आहे.
                                                                              
भाजी विक्रेते घाणीच्या साम्राज्यात
वरोरा शहरात दर रविवारी यात्रा वार्डात आठवडी बाजार भरतो भाजी विक्रेत्यांसाठी १० वर्षापूर्वी नगर पालिकेने ओटे बांधून दिले मात्र त्या ओट्यांचे अद्यापही उद्घाटन झाले नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्या ओट्याचा वापर शौचालयासाठी करताना दिसत आहे. आठवडी बाजारातून सांडपाणी वाहून नेणारा नाला आहे. नाल्याची दुरुस्ती केलीनसल्याने सांडपाणी सर्वत्र पसरलेला आहे. तर इतरांच्या परिसरात मुक्त संचार राहतो. भाजी विक्रेते सडलेल्या भाजीपाला इथेच टाकतात, त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असून घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. मात्र पोटासाठी दहावाटा म्हणून भाजी विक्रेते घाणीतच बसतआहे.
                                                                              
चोरांचा धुमाकुळ
शहरात सध्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकुळ घातलाआहे. भंगार चोरी सोबत शहरात घरङ्कोडीचेही प्रमाण वाढले आहे. दुचाकी चोरट्यांचेही प्रमाण वाढले आहे.
डुकरे व मोकाट जनावरांचा त्रास
शहरात ठिकठिकाणी मोकाट जनावरे मुक्त संचार करताना दिसत आहे. मोकाट जनावरे व  डुकरे वाहतुकीस अडसर बनत असल्याने अपघातच व रोगराईस यातना मिळत आहे,. 

                                                                              
हागणदारी युक्त शहर
शासनाकडून हागणदारी मुक्त गावासाठी पुरस्कार दिला जातो. शासन त्यासाठी विविध योजनाही राबवितात. मात्र, ही योजना वरोरा शहरात ङ्कोल ठरली आहे. सार्वजनिक शौचालय आहे. मात्र, न.प. प्रशासन देखभाल व दुरुस्ती करीत नाही. त्यामुळे शौचालयाची दूरवस्था झाली आहे.  परिणामी नागरिक उघड्यावरच शौचास बसतात. शहरातील वणी बायपास रस्त्याच्या दुतङ्र्का घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नगर परिषदेच्या आंबेडकर शाळेच्या प्रांगणामध्ये मुलासाठी खेळण्याकरिता खेळणी लावलेली आहे. परंतु, त्याचा उपयोगही शौचालयासाठी केल्या जात आहे. एमआयडीसी रस्ता ते व्होलटाज व्हॉली या रस्त्याचा वापर सुध्दा प्रातविधीसाठी केला जातो.
                                                                             
शहरातील तलावाचे अस्तित्व धोक्यात
शहराच्या मध्यभागी असलेले तलावाचे अस्तित्वच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. तलावाच्या चारही बाजूने अतिक्रमण झाले आहे. तलावाची लांबी व रूंदी कमी झाली आहे. अतिक्रमण धारक तलावात माती घालून हळूहळू आपले पाय पसरवित आहेत. . त्यामुळे येत्या काही दिवसात वरोरा शहरातील पुरातन तलाव कालबाह्य गडप होण्याच्या मार्गावर आहे. गत वर्षी रोटरी क्लबने तलावामध्ये उद्यान उभे केले होते. वर्षभरातच या उद्यानाचा बोजवारा उडाला. प्रशासनाच्या ढिसाळ धोरणामुळे उद्यान बंद पडले. तलावाच्या समोर नगरपालिकेचे महात्मा गांधी उद्यान आहे. या उद्यानाकडे न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने तेही उद्यान ओस पडले आहे. या उद्यानाचा वापर आता जुगार खेळण्यासाठी होत आहे.
                                                                             
शहरात जाणारे रस्ते वाहतुकीकरिता बंद
शहर वासियांना नागपूर-चंद्रपूर मार्गावर येण्याकरिता नाहक त्रास घ्यावा लागत आहे. उडाण पूलाचे काम सुरू असल्यामुळे लोकांना वणी बायपासच्या रेल्वे ङ्काटकातून जावे लागत आहे. मात्र, ङ्काटक बंद राहत असल्यामुळे त्यांना तिथेही ताटकळत राहावे लागत आहे. सध्या बोर्डा पूलाचा बोगदाही बंद केल्याने सर्व वाहतुक ही आनंदवनकडे जाणाèया रेल्वे बोगद्यातून केली जात आहे. त्या बोगद्या मध्ये नेहमीच घाण पाणी वाहत असल्याने पायदळी जाणाèया व्यक्तींना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्या ठिकाणी नेहमीच ट्राङ्कीक जाम होऊन शाळकरी विद्यार्थी बराच वेळ अडून राहतात. पावसाळ्यामध्ये दोन्ही रेल्वे बोगद्यामध्ये पाणी साचत असते. त्यामुळे तेथून प्रवास करणारे विद्यार्थी पाण्यात पडून त्याची वया, पुस्तकेही पाण्यानी ओली होतात. असे प्रकार येथे नेहमीच होत असते.
                                                                             
शहरातील बसस्थानक
बसस्थानकावर सध्या एकही उपहार गृह नाही. जे उपहार गृह सुरू होते ते दोन महिन्यापासून बंद पडले आहे. खासगी व्यवसायकांनी बसस्थानकाच्या आवारात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे बसस्थानकावरील उपहारगृहाकडे कुणी ङ्किरकत नव्हते. व्यवसाय होत नसल्याने ते उपहार गृह बंद पडले. बसस्थानक प्रमुखाच्या क्वॉर्टर मधून काही खासगी व्यवसायकानी पिण्याचे पाणी पुरविल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे.
                                                                             
प्लास्टीकचे मुत्रीघर कच-यात
नगरपालिकेने शहरात नागरिकांच्या सोयीसाठी प्लॉस्टिकीची स्वच्छतागृह उभी केली. त्यापैकी एक मुत्रीघर यात्रा वॉर्डात बसविण्यात आले. मात्र, या मुत्रीघराभोवताल घाणीचे साम्राज्य असल्याने त्या मुत्रीघराचा ङ्कायदा नागरिकांना होत नाही.  मित्र चौकात बसविलेले मुत्रीघर वादाच्या भोवèयात अडकले आहे. पालिकेने ही मुत्री घरे नगरपालिकेच्या इमारतीच्या मागील बाजूस कचèयाच्या ढिगाèयात ङ्केकले आहे. हजारो रूपये खर्च करून नगरपालिका या मुत्रीघराला विल्हेवाट कचèयात लावत असल्याने नगरपालिका प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
                                                                              
कोट्यवधी खर्चूनही क्रीडांगण अपूर्णच
कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. दहा वर्षे उलटली. त्यानंतरही येथील क्रीडासंकुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे स्पर्धा व सरावाकरिता शहरातील खेळाडूंना आनंदवनातील मैदान गाठावे लागत आहे. वरोरा शहरातील रेल्वेस्थानकाकडे जाणाèया पाच एकर शासकीय जागेत दहा वर्षांपूर्वी तालुका क्रीडासंकुलाच्या कामाला सुरवात करण्यात आली. या संकुलात बॅडqमटन हॉल, अत्याधुनिक व्यायामशाळा, ४०० मीटर ट्रॅक, व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खो व बास्केटबॉलचे मैदान, प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी यांचा समावेश होता. सध्या बॅटqमटन हॉल, व्यायामशाळा व प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी आहे. बॅटqमटन हॉलमध्ये पावसाळ्यात पाणी साचत असल्याने ते खेळण्यायोग्य राहात नाही. क्रीडासंकुलच पूर्ण झाले नाही. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून प्रेक्षक गॅलरी रिकामीच आहे. संकुलाच्या मैदानावर आजतागायत एकही काम पूर्ण झाले नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत घेण्यात येणाèया सर्व वयोगटांतील शालेय स्पर्धा आनंद निकेतन महाविद्यालयाच्या मैदानावर घ्याव्या लागतात. ग्रामीण व शहरातील चिमुकल्या खेळाडूंना आनंदवन मैदानावर स्पर्धेत सहभागी होताना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. प्रेक्षकांना बसणाèया गॅलरीखाली रस्त्यासमोर लाखो रुपये खर्च करून दुकानासाठी गाळेही काढण्यात आले. तेही अर्धवटच असल्याने त्याचाही लिलाव झाला नाही. शहराच्या मध्यभागी एकही सुसज्ज मैदान नसल्याने भावी युवा खेळाडूंना सराव करता येत नसल्याने शहरातील खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे शासनाच्या क्रीडा विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
                                                                             
उड्डाणपुलाने सुटणार प्रश्न; पण....
शहरात उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काम अवघ्या काही दिवसांत पूर्णत्वास येईल. ही शहराच्या दृष्टिकोनातून जमेची बाब आहे. रत्नमाला चौक ते बसस्थानक व बसस्थानक ते बोर्डा पुलापर्यंत मोठा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वणीकडून नागपूर- चंद्रपूर मार्गाकडे येण्यासाठी रेल्वेङ्काटकावर तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत होते. आता उड्डाणपुलामुळे ही समस्या दूर होईल. वणी ते चंद्रपूर, वणी ते नागपूर जाणाèया वाहनांना रेल्वे ङ्काटकामुळे जो विलंब होत होता, तो वेळ वाचेल. उड्डाणपूल झाल्यामुळे बसगाड्या बसस्थानकात येतील. त्यामुळे बसस्थानकात पुन्हा वर्दळ सुरू होईल. उड्डाणपुलानंतर वणी रोडवरती करनाका तयार होत आहे. त्यामुळे शहरातील बरेच नागरिक संभ्रमात सापडले आहेत. उड्डाणपूल होत असल्याचे समाधान मनात असतानाच गावतल्या गावात चारचाकी वाहनांनी जायचे असेल, तर कर भरावा लागेल का? हा प्रश्न निर्माण होत आहे.
                                                                              
पालकमंत्री साहेब लक्ष द्या... 
तब्बल वीस वर्षांनंतर आमदार संजय देवतळे यांना लाल दिव्याची गाडी मिळाली. अत्यंत महत्त्वाचे असे खातेही मिळाले. परंतु, त्यांच्या लाल दिव्याचा प्रकाश अद्याप वरोèयात पडला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. पालिकेची सत्ता त्यांच्याकडे आहे. मंत्रिपद आहे. त्याउपरही शहरातील मूलभूत सोयीसुविधांच्या अडचणी सुटल्या नाहीत. विशेषत: वाढत्या उद्योगांमुळे येथे भविष्यात प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्यावर आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे. सोबतच येथील उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगाराची समस्याही मोठी आहे. देवतळे यांनी याकडेही लक्ष दिले पाहिजे.
.....................

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.