Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

pune लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
pune लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, जानेवारी १९, २०२३

विद्यार्थी भारतीच्या "भेदाभेद मुक्त मानव" मोहिमेची २ री वर्षपूर्ती पुण्यातील चिखलगावात

विद्यार्थी भारतीच्या "भेदाभेद मुक्त मानव" मोहिमेची २ री वर्षपूर्ती पुण्यातील चिखलगावात

26 जानेवारी 2023 "प्रजासत्ताक दिन" ते 
30 जानेवारी 2023 "गांधी शहादत दिन"


"विद्यार्थी भारती" vidyarthi bhart संघटनेने हाती घेतलेले "भेदाभेद मुक्त मानव मोहीम" बघता बघता दोन वर्ष महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये अनेक खेड्यांमध्ये अनेक गावांमध्ये पोहोचली आहे.आज मानवाने आपले अस्तित्व चंद्रापर्यंत न्हेले असले तरी जगण्याच्या व्यासंगाला रूढी परंपराच्या बेढ्यानी खूप वाईट पध्दतीने जखडले आहे हे सत्य आज 21 व्या शतकातही नाकारता येणं अशक्यच आहे. 

आज भेदभाव मुळापासून संपवणे जवळपास अशक्यच असले. तरी मुळापासून माणुसकी संपणे हेदेखील अशक्यच आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही . ह्याच मानवतेच्या विश्वासावर ही मोहीम 26 जानेवारी 2021 प्रजासत्ताक दिन ते 30 जानेवारी 2021 गांधी शहादत दिन विद्यार्थी भारती संघटनेच्या राज्यध्यक्षा पूजा जया गणाई यांनी 5 दिवसाचे उपोषण करून साताऱ्यातील वाई तालुक्यातील बोपरडी या गावातून सुरू केली होती . 

Vidyarthi Bharti

आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन एक दिवसीय लक्षणीक उपोषण करून त्या गावात मानवतेची जनजागृती करण्याचे काम सुरू आहे व आता पर्यंत एकूण 24 उपोषणे झाली आहेत.अशी माहीती विद्यार्थी भारती राज्याध्यक्षा पूजा गणाई यांनी दिली. 

Vidyarthi Bharti 


हे उपोषण सरकार कडून कोणत्याही अपेक्षा ठेवत नाही कारण कागदोपत्री कायदा करून कोणताच भेद संपत नाही. भेद संपवण्यासाठी माणसांची वृत्ती बदलावी लागेल. आणि ती हळूहळू बदलेल. उपोषण हा फक्त अहिंसेचा एक मार्ग आहे जो आम्ही अवलंबिला आहे. भेदभाव तेव्हा संपेल जेव्हा मानवी प्रवृत्ती बदलेल, माणसाला माणूस म्हणून बघितले जाईल त्यासाठीच गावोगावी, खेड्यापाड्यात जाऊन आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो ज्यात संपूर्ण गाव सहभागी होतो. मग त्यात सामुहिक हळदीकुंकू, वेगवेगळे खेळ, स्पर्धा इत्यादी. अशी माहिती कल्याण समनव्यक दिव्या सनान्से यांनी दिली. 

Vidyarthi Bharti 


या वर्षी पुण्यातील भोर तालुक्यातील चिखलगावात हे पाच दिवसाचे उपक्रम राबविण्यात येत आहे आपणही जमेल तसा वेळ काढून पाठिंबा द्यायला नक्की या!

रविवार, ऑगस्ट २८, २०२२

Maharashtra CM Eknath Shinde; शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको

Maharashtra CM Eknath Shinde; शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको




*चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

पुणे दि.२८: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी वाहतूक कोंडी टाळण्याच्या उपाययोजनेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावे. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक योग्यरितीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्यादृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार तातडीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी शहरातील रिंगरोडच्या नियोजनाविषयी माहिती घेतली. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.  

यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,  अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

*नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल*
मुख्यमंत्री साताऱ्याकडे जात असताना नागरिकांनी चांदणी चौक परिसरातील वाहतुकीची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. श्री.शिंदे यांनी तातडीने या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांना या भागाला भेट देऊन आवश्यक कामे तातडीने करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले होते. 

आज मुंबईकडे परत जात असताना प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या परिसराला भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून  नियोजनाची माहिती घेतली. नागरिकांना होणार त्रास लवकर दूर करण्यासाठी सर्व यंत्रणा एकत्रितपणे काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको' हे त्यांचे वाक्य आणि आज दिलेली भेट नक्कीच जनतेला दिलासा देणारी आहे.
 

गुरुवार, जून ०३, २०२१

निमगिरी येथे महिला बालविकास विभागाच्या  अधिकार्यांनी  बालविवाह रोखले

निमगिरी येथे महिला बालविकास विभागाच्या अधिकार्यांनी बालविवाह रोखले

निमगिरी येथे महिला बालविकास विभागाच्या  अधिकार्यांनी  बालविवाह रोखले


जुन्नर /आनंद कांबळे 

जुन्नर : निमगिरी येथे लग्नघरी आदल्या दिवशी वाजत गाजत साखरपुडा, टिळा झाला. हळद खेळून झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी विवाह मुहूर्तावर डोक्यावर अक्षता पडणे बाकी होते. वऱ्हाडाच्या जेवणाचा सुवास दरवळत होता. गुलाबजाम तयार करण्याचे काम सुरू होते आणि दारासमोर पोलीसांची (police) गाडी उभी राहिल्याने लग्नघरी एकच धांदल उडाली. जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील निमगिरी येथे सोमवारी (ता. ३१ मे) रोजी सकाळी ९.१० वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर नियोजित विवाह होणार होता. कोरोनामुळे लॉकडाऊन (lockdown) असल्याने वधूच्या घरीच विवाह आयोजित केला होता. वधूचे वय १७ वर्षांपेक्षा कमी असल्याने हा बाल विवाह (child marriage ) यावेळी प्रशासनाकडून रोखण्यात आला. महिला बालविकास विभागाचे अधिकारी जनरचे पोलीस निरीक्षक विकास विभागाचे अधिकारी, जुन्नरचे पोलीस निरीक्षक विकास जाधव,  स्थानिक ग्रामसेवक यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती जुन्नरचे अभय केंद्र संरक्षण अधिकारी अक्षय साळुंके यांनी दिली.यावेळी नियोजित वर व त्याचे घरच्यांना बोलावून घेण्यात आले. बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार विवाहासाठी वयाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. विवाहाकरिता मुलाचे २१ तर मुलीचे वय १८ कायद्याने ठरविण्यात आले आहे. येथील वधुस १८ वर्षे पूर्ण होण्यास सात महिन्याचा कालावधी असल्याने हा विवाह करता येणार नाही. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. असे दोन्हीकडील मंडळींना समजून सांगण्यात आले. त्यानंतर मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही असे पालकांचे हमीपत्र घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले.पाच हजाराचा दंड ठोठावला- बेल्हे ता.जुन्नर येथे २८ मे रोजी बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयास दूरध्वनीवरून मिळाल्यानंतर अभय केंद्र संरक्षण अधिकारी अक्षय साळुंके, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पवार, बाल विवाह प्रतिबंध अधिकारी तथा स्थानिक ग्रामसेवक यांच्या पथकाने वधू-वर बोहल्यावर चढण्यापूर्वीच हा बालविवाह रोखला येथील वधूचे वय १८ वर्षापेक्षा कमी होते. यावेळी विवाहाचे अगोदर स्थानिक मंगल कार्यालयाने वधू व वर यांचें जन्मदिनाकांचे पुरावे घेणे आवश्यक असताना ते घेतले नाहीत तसेच मंगल कार्यालयात बालविवाह आयोजित केल्याचा कारणावरून स्थानिक प्रशासनाने पाच हजाराचापाच हजाराचा दंड ठोठावला- बेल्हे ता.जुन्नर येथे २८ मे रोजी बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयास दूरध्वनीवरून मिळाल्यानंतर अभय केंद्र संरक्षण अधिकारी अक्षय साळुंके, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पवार, बाल विवाह प्रतिबंध अधिकारी तथा स्थानिक ग्रामसेवक यांच्या पथकाने वधू-वर बोहल्यावर चढण्यापूर्वीच हा बालविवाह रोखला येथील वधूचे वय १८ वर्षापेक्षा कमी होते. यावेळी विवाहाचे अगोदर स्थानिक मंगल कार्यालयाने वधू व वर यांचें जन्मदिनाकांचे पुरावे घेणे आवश्यक असताना ते घेतले नाहीत तसेच मंगल कार्यालयात बालविवाह आयोजित केल्याचा कारणावरून स्थानिक प्रशासनाने 

पाच हजाराचा दंड ठोठावला- बेल्हे ता.जुन्नर येथे २८ मे रोजी बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयास दूरध्वनीवरून मिळाल्यानंतर अभय केंद्र संरक्षण अधिकारी अक्षय साळुंके, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पवार, बाल विवाह प्रतिबंध अधिकारी तथा स्थानिक ग्रामसेवक यांच्या पथकाने वधू-वर बोहल्यावर चढण्यापूर्वीच हा बालविवाह रोखला येथील वधूचे वय १८ वर्षापेक्षा कमी होते. यावेळी विवाहाचे अगोदर स्थानिक मंगल कार्यालयाने वधू व वर यांचें जन्मदिनाकांचे पुरावे घेणे आवश्यक असताना ते घेतले नाहीत तसेच मंगल कार्यालयात बालविवाह आयोजित केल्याचा कारणावरून स्थानिक प्रशासनानेपाच हजाराचा हजाराचा दंड ठोठावला  मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही असे पालकांचे हमीपत्र घेऊन समुपदेशन करण्यात आले. पुणे येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांच्या मागर्दशनाखाली जुन्नरचे अभय केंद्र संरक्षण अधिकारी अक्षय साळुंखे यांनी ही कारवाई केली. आपल्या परिसरात असे बालविवाह होत असतील तर 1098 या चाईल्ड लाईन वर संपर्क करून बालविवाह रोखण्यास मदत करावी असे आवाहन महिला बालविकास अधिकारी पुणे व जुन्नर कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.