राज्य वाड्.मय पुरस्कारासाठी
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
नागपूर, दि.29 : स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे.
राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीसाठी ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार योजना’ राबविण्यात येते. प्रकाशन वर्ष 2019 च्या पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशकांकडून 31 जानेवारी 2020 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र असतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार- 2019 नियमावली व प्रवेशिका’ शीर्षाखाली व ‘What’s New’ या सदरात ‘Late Yashvantrao Chavan State Literature Award -२०१९Rules Book and Application Form’ या शीर्षाखाली आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध आहेत.
लेखक, प्रकाशक पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका तहसिल कार्यालयास पाठवू शकतात. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटयमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई -400025 या पत्त्यावरही थेट प्रवेशिका पाठविता येतील. लेखक, प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2019साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत असे साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.