Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी २९, २०२०

राज्य वाड्.मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


राज्य वाड्.मय पुरस्कारासाठी
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
नागपूरदि.29 : स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे.
            राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीसाठी स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार योजना’ राबविण्यात येते. प्रकाशन वर्ष 2019 च्या पुरस्कारासाठी लेखकप्रकाशकांकडून 31 जानेवारी 2020 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र असतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश’ या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार- 2019 नियमावली व प्रवेशिका’ शीर्षाखाली व ‘What’s New’ या सदरात ‘Late Yashvantrao Chavan State Literature Award -२०१९Rules Book and Application Form’ या शीर्षाखाली आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध आहेत.
            लेखकप्रकाशक पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका तहसिल कार्यालयास पाठवू शकतात. सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळरवींद्र नाटयमंदिर इमारतदुसरा मजलासयानी रोडप्रभादेवीमुंबई -400025 या पत्त्यावरही थेट प्रवेशिका पाठविता येतील. लेखकप्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2019साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत असे साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.     

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.