Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

MPSE लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
MPSE लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, मे ३०, २०१८

 MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

MPSC exam 2018 results announced | एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा रोहितकुमार राजपूत पहिलामुंबई/प्रतिनिधी:
 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, सेल्स टॅक्स आणि इतर पदासाठी परीक्षा झाल्या होत्या. या परीक्षेत पुण्याचा रोहितकुमार राजपूतने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर सुधीर पाटील व सोपान टोपे यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे. तर महिलांमधून श्रीमती रोहिणी नऱ्हे यांनी राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला. मुंबईसह 37 जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमधून 4839 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. लेखी परीक्षेच्या आधारे 1194 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते.  विद्यार्थ्यांना हा निकाल एमपीएससीच्या https://www.mpsc.gov.in या वेबसाइटवर पाहता येईल.