महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, सेल्स टॅक्स आणि इतर पदासाठी परीक्षा झाल्या होत्या. या परीक्षेत पुण्याचा रोहितकुमार राजपूतने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर सुधीर पाटील व सोपान टोपे यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे. तर महिलांमधून श्रीमती रोहिणी नऱ्हे यांनी राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला. मुंबईसह 37 जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमधून 4839 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. लेखी परीक्षेच्या आधारे 1194 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. विद्यार्थ्यांना हा निकाल एमपीएससीच्या https://www.mpsc.gov.in या वेबसाइटवर पाहता येईल.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, मे ३०, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments