Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, मे २७, २०२३

खासदार बाळू धानोरकर यांच्या मेव्हण्याला ईडीची नोटीस; नेमके प्रकरण समजून घ्या! Balu Dhanorkar

खासदार बाळू धानोरकर यांच्या मेव्हण्याला ईडीची नोटीस; नेमके प्रकरण समजून घ्या! Balu Dhanorkar


चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचे मेहुणे प्रवीण काकडे (Praveen Kakade) यांना ईडीने नोटीस पाठवली. यवतमाळ बँक कर्मचारी भरती प्रकरणात आलेल्या तक्रारीवरून ईडीने ही नोटीस पाठवल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. ईडीचे हे पत्र 8 मे रोजी निघाले. पण ते जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळण्यापूर्वीच हे चंद्रपुरातील डिजिटल मीडिया माध्यमांना प्राप्त झाले. त्यांनी ते सोशल मीडियात व्हायरल केले. विशेष म्हणजे 8 मे रोजीचे पत्र २५ मे रोजी उघड झाले. मग, नागपूरच्या ईडी कार्यालयातून निघालेले हे पत्र १५ दिवस उलटूनही पोलिस अधीक्षकांना का भेटले नाही. की मुद्दाम ते दडवून ठेवण्यात आले होते.   ८ मे रोजी ईडीने हे पत्र जारी केले आणि ११ मे रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांच्यावर गोळीबार झाला. तेव्हापासून खासदार बाळू धानोरकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. प्रकरणातील दोन आरोपीना २३ मे रोजी अटक करण्यात आली. ते दोघेही धानोरकर यांचे खास निघाले. आरोपींसोबतचे धानोरकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांनतर २५ मे रोजी ईडीने पाठविलेली नोटीस वायरल झाली. खासदार धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांचे भाऊ प्रवीण काकडे यांच्यावर भद्रावतीसह जिल्ह्यातील कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, याची माहिती मागविण्यात आली आहे.  या नोटीसनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही नोटीस पाठवली आहे. या पत्रात पीएमएलए कायद्यांतर्गत चौकशी करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काकडे यांच्या विरोधात भद्रावती आणि आसपासच्या पोलीस ठाण्यात आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काकडे यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार करण्यात आली आहे. Deputy Director of ED Sanjay Bangaratale 


त्यामुळे ईडीचे उपसंचालक संजय बंगारतळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी (District Superintendent of Police Ravindrasinh Pardeshi) यांना पत्र पाठवून या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांसह ईडीच्या पथकाला आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे चंद्रपुरातही ईडीची एन्ट्री होणार आहे. मात्र, ही नोटीस अद्याप जिल्हा पोलीस अधीक्षकांना प्राप्त झालेली नाही. त्याआधीही ईडीने पाठवलेली नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे या नोटिशीची चर्चा रंगली आहे.