Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सिंदेवाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सिंदेवाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जुलै १५, २०१८

चंद्रपुरात वाघाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

चंद्रपुरात वाघाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

चंद्रपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात रत्नापुर वनपरिक्षेत्रात एका वाघाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने वनविभागात चांगलीच खळबळ उडाली.
शुक्रवारी सकाळी रत्नापूर-खांडला मार्गापासून २०० मीटरवर वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.मिळालेल्या माहितीवरून तीन ते चार दिवसांपूर्वी हा वाघ मरण पावला असावा, असा अंदाज वनविभागाने लावला आहे.मात्र हा वाघ कशामुळे मेला ह्याचे कारण समजू शकले नाही.




सोमवार, जुलै ०२, २०१८

अखेर त्या दहशदखोर वाघाला पकडण्यात वनविभागाला यश

अखेर त्या दहशदखोर वाघाला पकडण्यात वनविभागाला यश

वाघ पिंजरा  साठी इमेज परिणाम
संग्रहित 
चंद्रपूर/प्रतिनिधी: 
६ ग्रामस्थांना ठार केलेल्या दहशदखोर वाघाला पिंजराबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागात सिंदेवाही परिसरात गेले काही दिवस एका वाघाने चांगलीच दहशत पसरविली होती. किन्ही, मुरमाडी , लाडबोरी भागात या वाघाने शेतशिवार कामे करणा-या आणि जंगलात सरपण वेचण्यासाठी गेलेल्या 6 ग्रामस्थांना ठार केले होते तर ३ ग्रामस्थांना जबर जखमी केले होते. या घटनेनंतर वाघाला पकडण्यासाठी वनविभाग मोठे अभियान राबवित होते. लोकांचा रोष बघता या वाघाला पकडने वनविभागाची महत्वाचे होते,या संपूर्ण घटनेनंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार याने या वाघाचा बंदिबस्त करण्याच्या सूचना वनाधिका-याना दिल्या होत्या.याच प्रयत्नात रविवारी संध्याकाळच्या सुमारास सिंदेवाही जंगलातील कक्ष क्रमांक १३३४ मध्ये वन विभागाच्या पथकाने या वाघाला बेशुद्ध करत त्याचा ताबा मिळविला.विशेष म्हणजे या वाघाला पकडण्यासाठी जंगल परिसरात वनविभागाने कॅमेरे लावून तब्बल ४० वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची या वाघावर पाळत होती.हा दीड ते २ वर्षाचा नर वाघ असून त्याची तातडीने चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. त्यातच या वाघाची दहशत असल्याने स्थानिक नागरिक संतापले होते. वाघ पिंजराबंद झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

मंगळवार, जून १९, २०१८

  सिंदेवाही तालुक्यातील वाघाचा बंदोबस्त करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश

सिंदेवाही तालुक्यातील वाघाचा बंदोबस्त करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश

वाघ साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी व अन्य परिसरात वाघाच्या हल्ल्यामुळे महिला मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून या वाघाचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. वनविभागाने यासंदर्भात चौकशी करून वाघाचा बंदोबस्त करावा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वनाच्छादित भागात अनेक वेळा वाघामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. चंद्रपूर जिल्ह्यासाठी वाघ हा महत्त्वपूर्ण प्राणी आहे. मात्र यासोबतच वनाशेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या जीवित्वाची किंमत अमूल्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव व वन्यजीव संघर्ष जनजागृती आणि उपायोजना संदर्भात वेळोवेळी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले आहेत. यासंदर्भात स्थानिक नागरिकांचे नेहमी सहकार्य असून या जिल्ह्यातील वाघ पर्यटनाचे व मिळकतीचे माध्यम आहे. तरीही अशा परिस्थितीत नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे पहिले कर्तव्य असून वनविभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन या सर्वांनी सिंदेवाही तालुक्यामधील वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी एकत्रित मोहिम आखावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 
17 जून रोजी सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावातील शेत शिवारामध्ये पट्टेदार वाघाने अनुबाई आनंदराव चौखे या महिलेवर केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी 15 जून रोजी देखील सिंदेवाही तालुक्यातील किन्ही या गावांमध्ये शेतकऱ्याला वाघाने जखमी केल्याची घटना घडली. गेल्या चार पाच महिन्यांमध्ये या परिसरात पट्टेदार वाघाची प्रचंड दहशत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरले आहे. त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाशेजारी राहणाऱ्या गावांमध्ये वनावर आधारित अनेक जोडधंद्याला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांचे वनावरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी अगरबत्ती उद्योगांपासून पर्यटनाच्या पूरक व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. जंगलामध्ये नागरिकांना जावेच लागू नये यासाठी शंभर टक्के गॅस वितरणाचा यशस्वी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांना रोजगार मिळण्यासोबतच शेताला कुंपणाची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. तरीही अशा काही दुर्दैवी घटना घडतातच. मात्र या भागातील नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे हे पहिले कर्तव्य असून संबंधित विभागाने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याबाबतही वनमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

शनिवार, एप्रिल ०७, २०१८

पोलिसांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

पोलिसांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

चोरी साठी इमेज परिणाम
सिंदेवाही/प्रतिनिधी:
 तळोधी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले आणि सिंदेवाही येथील रहिवासी असलेले पोलीस हवालदार यांच्या घरी कोणी नसल्याने  संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला यात ९२ हजार ४०० रुपयाचा सोने,व यासह चांदीचा ऐवज लंपास केला.या प्रकरणात  सिंदेवाही पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंदेवाही येथील कॉलनी परिसरात राहत असलेले जनार्दन मांदाळे यांचे घरी कुणी नसल्याने चोरट्यांनी भरदुपारी  दोन वाजताच्या सुमारास दरवाज्याचा ताला तोडला व  दिवानात ठेवलेल्या सोन्याचे मंगळसुत्र, चांदीचा करंडा, लक्ष्मीची मुर्ति यासह किरकोड मौल्यवान वस्तूनसह एकूण  ९२ हजार ४०० रुपयाचा ऐवज चोरला .
     कुटुंबिय काही वेळानंतर घरी आल्यानंतर प्रकरण उजेडात आले. या प्रकरणी सिंदेवाही पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली  असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेमुळे पोलीसाच्याच घरी झाल्याने संपूर्ण परिसरातील नागरिकात आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

मंगळवार, जानेवारी १६, २०१८

ट्रक आणि कारच्या धडकेत एक ठार ; एक जखमी

ट्रक आणि कारच्या धडकेत एक ठार ; एक जखमी

सिंदेवाही /प्रतिनिधी:
सिंदेवाही-चंद्रपूर मार्गावरील सरडपार ते सिंदेवाही मुख्य रस्त्यावरील कळमगाव कार्नरवर ट्रक व कारची जबर धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगलवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. चंदन कोठेवार असे अपघातात मृत पावलेल्या इसमाचे नाव असल्याचे कळते. 
सरडपार ते सिंदेवाही मुख्य रस्त्यावरील कळमगाव कार्नरजवळ ट्रकने समोरून येत असलेल्या कारला जोरदार धडक दिली. यात कारचा समोरील भाग पूर्णपणे चकणाचुर झाला असून यात चंदन कोठेवार ठार झाले.तर वृत्त लिहिपरियंत जखमीचे नाव कळू शकलेले नव्हते. गंभीर अपघातग्रस्ताला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आल्याचे कड़ते.

रविवार, डिसेंबर १०, २०१७

वाघाने घेतला निर्मलाचा बळी

वाघाने घेतला निर्मलाचा बळी

सिन्देवाही -येथील निर्मला मुखरुजी निकोडे (वय ५२ ) ही महीला शेतावर एकटीच गेली. सांयकाळ झाली परंतु घरी वापस आली नाही. तिचा सांयकाळी शोध घेतला असता मिळाली नाही. मग सकाळी पुन्हा शोध घेतला असता नाल्यामध्ये छिन्नविचीन्न अवस्थेत वाघाने खाल्लेले आढळले.

सोमवार, नोव्हेंबर २७, २०१७

 वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी

वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी

सिंदेवाही तालुक्यातील घटना 
सिंदेवाही/प्रतिनिधी:
सिंदेवाही तालुक्यातील शिवनी रेंज मधील पांढरवाणी क्षेत्र क्रमांक २६१ पिपरहेटी बिट १ मध्ये सोमवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान जळाऊ लाकडे आणण्यासाठी  गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढविला.सुमित्रा सुखदेव आले (55) वर्ष असे या वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सुमित्रा आले ह्या काही महिलांसोबत पांढरवाणी  क्षेत्र क्रमांक २६१ पिपरहेटी बिट१   येथे जळाऊ लाकडे आण्यासाठी गेल्या होत्या.मात्र त्या इतर महिलांना सोडून बऱ्याच पुढे निघून गेल्या तितक्यातच दबा  धरून बसलेल्या वाघाने सुमित्रा आले यांच्यावर हल्ला  केला .या हल्य्यात त्या थोडक्यात बचावल्या.हल्ला करताच आरडा ओरड करण्यात आल्याने सोबत असलेल्या इतर महिलांना त्यांना वाचविण्यात यश आले ,त्यांना जखमी अवस्थेत तात्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काजलच्या मृत्यूचा तपास वरिष्ठाकडे

काजलच्या मृत्यूचा तपास वरिष्ठाकडे

सिंदेवाही : येथील काजल मृत्यू प्रकरणी तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी पुढाकार घेतला आहे. काजल मृत्यू प्रकरणात अनेक बाबी अनुत्तरित आहेत. रविवारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मृत काजलचे मोठे वडील काशीनाथ हनवते व त्यांचे कुटुंब यांच्याशी चर्चा केली. मागील चार दिवसांपासून  हे प्रकरण सुरु असून चर्चा होत आहे.

 या घटनेची बातमी 
https://kavyashilpnews.blogspot.in/2017/11/blog-post_668.html

शनिवार, नोव्हेंबर २५, २०१७

प्राचार्यांनी दिले मुख्याध्यापकांना धडे

प्राचार्यांनी दिले मुख्याध्यापकांना धडे


सिंदेवाही- तालुकास्तरीय KRA मुख्याध्यापक  कार्यशाळा पंचायत समिती, सिंदेवाही  -( बीट :- सिंदेवाही, गुंजेवाही  अंतर्गत भारत विद्यालय , पळसगाव (जाट) येथे घेण्यात आली.
यावेळी बाबूपेठ येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणचे प्राचार्य धनंजय चापले यांनी मार्गदर्शन केले.
KRA बाबत मुख्याध्यापकामध्ये  मार्गदर्शन व चर्चा, NAS सर्वेक्षण बाबत विशेष मार्गदर्शन व महत्व विषद केले, ASER  सर्वेक्षण बाबत आपल्या जिल्ह्याचे स्थान व आपली प्रगती कुठे आहे, यावरही मार्गदर्शन केले. गणितपेटीतील साहित्याची ओळख व घटकनिहाय वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन केले.दि. 14 जुलै 2017 च्या जीआर चे वाचन सर्व मुख्याध्यापकांनी करून त्यानुसारच पायाभूत चाचणी व संकलित चाचणी-1 घेऊन गुणदान करावे, असे सूचित करण्यात आले.
कार्यशाळेत शिविअ केंद्रप्रमुख व सर्व विषय साधन व्यक्ती उपस्थित होते.
कार्यशाळेत मान. श्री. मेश्राम ( B.E.O. ), श्री. चहांदे, श्री. परचाके, बरगडे ( के. प्र. )  श्री. बोरकर मु.अ. भारत विद्यालय , पळसगाव श्री. भारत मेश्राम, श्री. बगडे, श्री. निकुरे, विषयतज्ञ उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन  श्री. शेंडे ( के.प्र.) यांनी केले, तर आभार श्री. जनबंधू यांनी मानले.

बुधवार, नोव्हेंबर २२, २०१७

काजलचा मृतदेह विहिरीत

काजलचा मृतदेह विहिरीत

- सिंदेवाही तालुक्यातील घटना 

सिंदेवाही/प्रतिनिधी:

सिंदेवाही येथील सिद्धार्थ चौक जवळील विहिरीत एका युवतीचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आल्याची घटना घडली . काजल रावजी हनुमंते वय १७ वर्ष असे या युवतीचे नाव असून ती सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही येथे बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती.

                 प्राप्त माहिती अनुसार काजल  हि य आपल्या मोठ्या वडीलाकडे सिंदेवाही येथे राहून शिक्षण घेते. ती सिंदेवाही तालुक्यातील लोनखैरी या गावची रहिवासी होती. तिन दिवसापासून म्हणजे रविवार पासून ती अचानक घरून निघून गेली होती. घरचांनी तिचा शोध घेतला मात्र ती कुठेच आढळून न आल्याने आज बुधवार ला सकाळी ७.३० वाजता च्या दरम्यान सिंदेवाही येथील सिद्धार्थ चौक येथील विहरीत तरंगत असलेल्या  आढळून आले.

             हि माहिती सिंदेवाही पोलिसांना देण्यात आली.पोलीस घटना स्थळ गाठून तिला विहीरीतून बाहेर काढले. पुढील तपास इंगळे साहेब ठाणेदार सिंदेवाही याांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मंगळवार, नोव्हेंबर ०७, २०१७

कलावंत  राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत नवरगावचे कलावंत अव्वल

कलावंत राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत नवरगावचे कलावंत अव्वल

सिंदेवाही/प्रतिनिधी
कलावंत न्यास उज्जैन(मध्यप्रदेश) आयोजित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील   नवरगाव येथील श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाच्या  बावीस विद्ध्यार्थ्यानी वेगवेगळी बक्षिसे पटकावून अव्वल येण्याचा मान पटकावला आहे . भारताच्या विविध प्रदेशातील हजारो विद्यार्थ्यानी या स्पर्धेत भाग घेतला होता.
रेखा व रंगकला  विभागाचा  कृनाल धनझोडे यांस पाच हजार रुपये रोख आणि
अक्षय मेश्राम याला दोन हजार रुपये रोख पारितोषिक प्राप्त झाले. हे दोन्ही पुरस्कार त्यांच्या ग्राफीक्स या कलाप्रकाराला देण्यात आलेत.
रेखा व रंगकला विभागाचा रोहित बन्सोड याच्या चित्राला तीन हजार रुपयांचे पारोतीशिक मिळाले.
अबोली लांबे आणि अक्षय पिंपळक यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले असून अन्य विध्यार्थ्यांना मेरिट सर्टिफिकेट जाहीर झालीत.
त्यात श्वेता गुरू, निखिल आत्राम, सुरभी कागदेलवर,अश्विनी गावळे, चेतन वाढई, भाग्यश्री फुकटकर, प्रियंका रॉय, प्रवीण कुंभारे, निखिल जनबंधु, अक्षय बोबडे, धयनदेवी नंदनवार, भावना काशट्टीवार, पूजा गावंडे, मारोती चौधरी, नेहा भोगे, प्रिया निकुरे आणि स्वाती लोणकर यांचा समावेश आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेचे हे 17 वे वर्ष असून भारतातल्या दिग्गज परिक्षकांकडून चित्रांचं मूल्यमापन करण्यात येते
           महाविद्यालयाचे प्राचार्य सदानंद बोरकर आणि मार्गदर्शक अद्यापक चित्रकार प्रा अतुल कामडी, प्रा कैलाश घुले, प्रा निवृत्ती बावणे आणि लक्ष्मीकांत लेंझे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.