Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

विदर्भ आत्मबळ यात्रा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विदर्भ आत्मबळ यात्रा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, फेब्रुवारी ०२, २०१८

माझा मुख्यमंत्र्यांवरचा विश्वास उडाला;योग्य वेळ येताच राजीनामा देऊ:भाजप आमदाराचा सरकारला घरचा अहेर

माझा मुख्यमंत्र्यांवरचा विश्वास उडाला;योग्य वेळ येताच राजीनामा देऊ:भाजप आमदाराचा सरकारला घरचा अहेर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मी मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहारकरत असून मुख्यमंत्र्यांन कडून समाधानकारक काहीही उत्तर मिळत नसल्याने माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं वक्तव्य भाजपचे काटोलचे नाराज आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केलं आहे. आशिष देशमुख यांची ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ चंद्रपुरात पोहचली त्यावेळी आशिष देशमुख यांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली . 
विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच विदर्भाबद्दल जनतेची मते जाणून घेण्यासाठी आमदार डॉ. आशिष देशमुख विदर्भातील ६२ मतदारसंघ पालथी घालत आहेत. शेतकऱ्यांना आत्मबळ देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व बेरोजगार युवकांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी दि. ७ जानेवारी २०१८ ते १३ फेब्रुवारी २०१८ पर्यंत विदर्भ आत्मबळ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

विदर्भ विकासासाठी विदर्भ राज्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. शिवसेना ही विदर्भ राज्य निर्मितीसाठी विरोध करीत असल्याने ती सरकारची कोंडी झाली आहे . सरकारला कंटाळून शिवसेनेने देखील पुढील काळात स्वतंत्र निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. याच संधीचे सोने विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने केले पाहिजे. मागणीचा वेळीच विचार न झाल्यास आपण राजीनामाही देऊ, अशी माहिती आ. आशिष देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सुरुवातीपासूनच आपण विदर्भ राज्यासाठी संघर्ष करीत असून, यापूर्वी बेमुदत उपोषणसुद्धा केले होते़ त्यावेळी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा सरकार सत्तेवर येताच विदर्भ राज्य करू, असे आश्वासन दिले होते़. भाजपच्या नेत्यांनी अनेकदा विदर्भ राज्यासाठी अशासकीय ठरावसुद्धा मांडले आहेत़ मात्र, त्यांनी आता विदर्भ राज्याच्या मागणीवर चुप्पी साधली आहे, असे ते म्हणाले.
विदर्भात सर्वाधिक वीजनिर्मिती होते. सर्वाधिक कोळसा उत्पादन होते़ या उद्योगिकीकरणामुळे निर्माण प्रदूषणाचे चटके येथील जनतेला बसत आहे़ मात्र, येथील जनतेला २४ तास वीज मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली़
भाजपा सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे़ आगामी काळात हा रोष दिसून, येईल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले़ विदर्भ राज्याच्या मुद्यावर भाजपाचे आणखी काही आमदार आपल्यासोबत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शंकरपूर, भिसीत देशमुखांचे जंगी स्वागत
आमदार आशिष देशमुख यांच्या विदर्भ आत्मबळ यात्रेचे शंकरपूर व भिसीत दुपारच्या सुमारास आगमन झाले. त्यांच्या सोबत जि. प. सदस्य डॉ. सतीश वारजूकर, डॉ. रमेश गजबे, पं.स. सदस्य रोशन ढोक, भावना बावणकर, अमोद गौरकर, रामभाऊ भांडारकर, शामराव बोरकर, नितीन सावरकर, मोरेश्वर झाडे, प्राचार्य जाने यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी भिसीच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आ. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शंकरपूर येथेही सभा झाली.