_*⭕सीलॅण्ड :या देशात फक्त २७ लोक राहतात ! ⭕*_
____________________________
*_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
*╰──────•◈•──────╯*
____________________________
. 🌀 *_दि. १३ जूलै २०२०_* 🌀
. *_देश म्हटला की आपण विचार करतो की त्यात कमीत कमी १०० शहर तरी असावीत आणि लाखांच्या घरामध्ये लोकसंख्या असावी. आता आपलाच भारत देश घ्या! किती मोठ्ठा आहे. लोकसंख्या तर विचारायची सोय नाही. त्यामुळे आपल्याला कोणी म्हटले की तुम्हाला असा देश माहिती आहे का जिथे केवळ २७ लोक राहतात तर??? आपला विश्वास बसणं मुश्कील!_*
*_🌹..............................................._*
╔══╗
║██║ _*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟ * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://m.facebook.com/story.php?story_fbid=539963409734920&id=100011637976439
____________________________
*_इंग्लंडच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या या देशाचे नाव सीलँड आहे. इंग्लंडच्या सफोल्ड या समुद्रकिनाऱ्यापासून फक्त १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सीलँड किल्ल्यावर हा देश वसला आहे. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडनं या देशाची निर्मिती केली होती. मात्र त्यानंतर त्या देशाला खाली करण्यात आलं. सीलँडवर आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी राज्य केलं आहे. _*
९ ऑक्टोबर २०१२ रोजी रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीला सीलँडचा राजा घोषित करण्यात आलं होतं. रॉय यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा मायकल यांनी राज्य केलं. ज्या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नसते त्यांना छोटे देश म्हणून संबोधण्यात येते. सीलँड या देशाचे क्षेत्रफळ ०.२५ किलोमीटर इतकेच आहे. भकास अवस्थेत असलेल्या या किल्ल्याला सीलँडसोबत रफ फोर्ट म्हणूनही ओळखले जाते. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या देशाची अर्थव्यवस्था देणग्यांवर चालते आहे. अनेकांना या देशाची माहिती सोशल मीडियावरूनच झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून या देशाला अनेक देणग्याही प्राप्त झाल्या आहेत. मात्र सीलँड या देशाला अधिकृतरीत्या मान्यता न मिळाल्यानं सर्वात छोटा देश म्हणून व्हेटिकन सिटी ओळखला जातो. व्हॅटिकन सिटी क्षेत्रफळ ०.४४ वर्ग किलोमीटर आहे. व्हॅटिकन सिटी या देशाची लोकसंख्या केवळ ८०० च्या घरात आहे.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
_*माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव*_
*╰──────•◈•──────╯*
*🌹.............................................*
. _*ണคн¡т¡ รεvค*_
. *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
. *༺♥༻*