Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
मंगळवार, जुलै १७, २०१८
बुधवार, फेब्रुवारी २८, २०१८
मनसेच्या ९ कार्यकर्त्याची न्यायालयातून निर्दोष सुटका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ९ कार्यकर्त्यांनी डिसेंबर 2013 ला कन्याका नागरिक बैक कार्यालयावर एका महिला बैंक कर्मचाऱ्यांची छेडखानी केल्या प्रकरणी आंदोलन केले होते या आंदोलन ना दरम्यान बैंकचे अध्यक्ष प्रफुल भास्करवार यांच्यावर काळीशाई फेकून त्याना मारहाण केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यावर करून त्यांचेवर गंभीर गुन्हे चंद्रपूर येथील शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते, सदर प्रकरण चंद्रपुर न्यायालयात तब्बल चार वर्ष चालल्यानंतर अखेर दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ ला विद्द्यमान् न्यायाधीश खोत यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली, यामधे मनसेचे राजू कुकडे, सुनीता गायकवाड़,मनोज ताम्बेकर माया मेश्राम,संदीप शिडम.भारत गुप्ता, प्रकाश चंदनखेडे,सुजय अवथरे व योगिता कुंभारे इत्यादिचा समावेश आहे, त्यांच्या सुटकेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे.
सोमवार, जानेवारी २२, २०१८
मराठी शाळा बंद करण्यात येऊ नये: मनसेचे हाप पॅन्टवर आंदोलन
रविवार, नोव्हेंबर २६, २०१७
चंद्रपूरात मनसे आक्रमक:इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून फेकली
चंद्रपुरात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.शहरातील तुकूम परिसरात दुपारच्या सुमारास मराठी पाट्यासाठी आंदोलन करत मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी दुकान चाळीतील इंग्रजी पाट्यांना काळफासत इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून टाकली.
शहरातील नागपूर-चंद्रपूर मार्गावर दुपारी हा प्रकार घडला.तुकूमपरिसरात दुपारी मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांच्या हातात मनसेचे झेंडे देखील होते. मराठी पाट्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत होत्या. यानंतर या कार्यकर्त्यांनी अचानक इंग्रजी पाट्यांना लक्ष करत काळफ़ासले आणि काही इंग्रजी बॅनरही फाडले.अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. काही दुकानदारांनी तात्काळ दुकाने बंद केली.
चंद्रपुरात मनसेने नवीन शाखेचे उदघाटन केल्या नंतर मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे. यापूर्वीही मनसेने मराठी पाट्यांसाठी अनेकवेळा आंदोलने केले होते.आता पुन्हा एकदा मनसेने मराठी पाट्यांसाठी आक्रमक झाली आहे.
बुधवार, नोव्हेंबर २२, २०१७
मराठीत करा दुकानांचे फलक
मनसे करणार चंद्रपुर मध्ये खळ्ळ फट्याक
चंद्रपूर - मराठी राज्य भाषेचा सन्मान करण्यासाठी सर्व दुकाने व आस्थापनांचे फलक हे मराठीत असले पाहिजेत. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य भाषा सन्मान आंदोलन चालू करणार अाहे. जर दुकाने व आस्थापनांनी आपले फलक मराठीत लावले नाहीत तर खळ्ळ फट्याक करण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांनी ठाण्यामध्ये झालेल्या जाहीर सभेत दिले असून त्यांच्या आदेशानुसार आता चंद्रपुर शहरा मध्ये आंदोलन करणार मनदिप भाऊ रोडे शहर अध्यक्ष मनसे यांच्या नेत्रुत्वात ,अभिनव देशपांडे शहर उपाध्यक्ष, बाळा चंदनवार शहर उपाध्यक्ष, राहुल चव्हाण, व्यंकटेश मुकतलवार आदी उपस्थित होते