Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, जुलै २६, २०१८
मंगळवार, जुलै २४, २०१८
विजय चौधरी यांचा विदर्भ "संवादसे संपर्क" अभियान दौरा
मंगळवार, एप्रिल १०, २०१८
सत्ताधारी भाजप सरकार बसणार उपोषणाला
बुधवार, मार्च १४, २०१८
शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार:मुनगंटीवार
बुधवार, फेब्रुवारी २८, २०१८

शिवसेना भडकली;पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला

मंगळवार, फेब्रुवारी २७, २०१८
शिवसेनेचे आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी:भाजपचा घणाघाती आरोप
चंद्रपूर(ललित लांजेवार)५०० वर्षांचा पुरातत्त्व गोंड राजाचा इतिहास आम्ही फक्त पुस्तकाद्वारे पुढच्या पिढीला न सांगता तो प्रत्यक्षात जतन करून ठेवू, या सौंदर्यीकरण आला कुठलाही विरोध केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून याचा जाहीर निषेध करू असे देखील म्हणाले.

शनिवार, फेब्रुवारी १७, २०१८
कॉंग्रेसला मोठे खिंडार;प्रभारी सरपंचाचा भाजपात प्रवेश
उपाध्यक्ष पदासाठी भाजपातच धूसफूस
रविवार, जानेवारी ०७, २०१८
नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बंडूभाऊ क्षीरसागर यांचा भाजपात प्रवेश
शनिवार, जानेवारी ०६, २०१८
राज्यासाठी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’
नागपूर : विदर्भातील सिंचनाचा अनुशेष, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी , उद्योगांचा अभाव, वीज भारनियमन,कुपोषण व नक्षलवाद अशा समस्या मार्गी लागव्यात, तसेच विदर्भाचा सर्वांगीण विकास हवा असेल तर स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच जनतेची मते जाणून घेण्यासाठी ७ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढणार असल्याचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्रात सत्ता आल्यास विदर्भाचे स्वतंत्र राज्य होईल, असे आश्वासन भाजपा नेत्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. गेल्या साडेतीन वर्षापासून केंद्रात सत्ता असूनही विदर्भाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. भाजपा नेत्यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. दुसरीकडे राज्य सरकारवर तब्बल ४.५० लाख कोटींचे कर्ज आहे. राज्याची आर्थिक स्थिती विचारात घेता संयुक्त महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही. नव्याने निर्माण झालेले उत्तराखंड राज्य प्रगतीच्या बाबतीत देशात सर्वात पुढे आहे. याचा विचार करता स्वतंत्र राज्य झाल्यास विदर्भाचा विकास होईल. आजवर विदर्भासाठी राखून ठेवण्यात आलेला निधी पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी वळविण्यात आला. यामुळे विदर्भ मागास राहिला. परिणामी विदर्भ शेतकरी आत्महत्यात सर्वात पुढे असल्याचे आशिष देशमुख म्हणाले.
बुधवार, जानेवारी ०३, २०१८
भाजप आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची तोडफोड

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शनिवार, डिसेंबर ३०, २०१७
अमोल कोंडबतुनवार यांचे निधन
बुधवार, नोव्हेंबर १५, २०१७
ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौक ते मर्दान अली सिमेंट रस्ता ठरत आहे जीवघेणा
ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
ब्रम्ह्पुरी येथील शिवाजी चौक तें मर्दान अली या सीमेंट रस्त्यांची दूरावस्था झाली असून अपघाताच प्रमाण वाढले आहे त्या रस्त्याच्या संदर्भात मा.मुख्याधिकारी न.प.ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले.
सदर रस्त्यांच बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले त्यामुळे रस्त्याला खूप असॆ खड्डे पडलेली आहेत अशी माहिती खासदार मा.अशोक नेते यानी मागील महिन्याच्या आढावा बैठकीत नगरपरिषददेंला आदेश देण्यात आले होते. सदर रस्त्यांच काम दिवाळी नंतर सुरू करू असॆ आश्वासन नगर परिषद तर्फे मा.खासदार साहेबाना देण्यात आले होतें.परंतु दिवाळी लोटूनही एक महीना होत आला तरी नगर परिषद तर्फे कामाला सुरुवात झालेली नाही.
सदर रस्त्याच काम तात्काळ करण्यात यावे त्या साठी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.परेश शहादाणी ,भा.ज.यु.मो.ब्रम्हपुरी शहराध्यक्ष प्रा.सुयोगकुमार बाळबुद्दें,शहर महामंत्री श्री.रितेश दशमवार ,शहर महामंत्री स्वप्नील अलगदेवे ,शहर सचिव श्री.दत्ता येरवार यानी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.तात्काळ या रस्त्याच काम न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा ब्रम्हपुरी वासिय जनता आणि भा.ज.यु.मो.यांच्या वतीने नगर परिषद ला माहिती देण्यात आली.
मंगळवार, नोव्हेंबर १४, २०१७

आता विदर्भ लांबणीवर
नागपूर - विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय वेगळं राज्य घेणं योग्य होणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं.
निवडणुकीपूर्वी भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्याचं आश्वासन दिलं होतं. पण जवळपास तीन वर्षं झाल्यानंतरही भाजप सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबद्दल कोणतंही पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे फडणवीस सरकारच्या भूमिकेबाबत विदर्भवाद्यांमध्ये संभ्रम आहे.

शनिवार, नोव्हेंबर ११, २०१७

सरपंचांनी आदर्श ग्राम निर्माण करावेः डाॅ.पोतदार
नागपूर / प्रतिनिधी - जिल्हयातील ग्रामिण भागातील भाजपा कार्यकत्र्यांच्या मेहनतीमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 136 ठिकाणी विजय मिळवुन मोठे यश संपादन करता आले.मात्र या यशाने हुरळुन न जाता ग्रामिण क्षेत्रात आणखी व्यापक काम करण्याची गरज आहे.आपआपल्या गावांचा विकास साधण्यासाठी सरपंचांनी जोमाने कामाला लागले पाहिजे भाजपच्या प्रत्येक सरपंचाने आपले गाव आदश्ज्र्ञ ग्राम म्हणुन निर्माण करावे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डाॅ.पोतदार यांनी केले.
गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बॅंकेच्या सभागृहात 10 नोंव्हेंबर रोजी आयोजीत भाजपाप्रणीत राज्यसरकारचा त्रिवर्षपुर्ती अभिनंदन सोहळा व सरपंच ,सदस्य यांचा सत्कार पार पडला व्यासपिठावर आ.अनिल सोले ,आ.आशिष देशमुख, माजी आ.अशोक मानकर ,जि.प.अध्यक्षा निशा सावरकर,माजी जि.प.अध्यक्ष अशोक धोटे ,भाजपाचे जेष्ठ नेते आनंदराव ठवरे,संध्याताई गोतमारे,दिलीप जाधव,आनंदराव राऊत,मनोज चवरे,अजय बोढारे,अर्चनाताई डेहनकर,प्रतिभा मांडवकर,अरविंद गजभिये,पे्रम झाडे,संजय टेकाडे ,किशोर रेवतकर,अविनाश खळतकर,विकास तोतडे,आदी मान्यवर मंडळी व सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषनात डाॅ.पोतदार म्हणालेत की,गावाचा विकास झाला तर राज्याचा विकास होईल यासाठी समाजातील प्रत्येक माणसाचा शेतकÚयाचा आर्थिक,सामाजिक,शारिरिक ,मानसिक,व शैक्षणिक विकास होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपले मुख्यमंत्री अहोरात्र काम करीत आहे.सातबारा आॅनलाईन करणे,डीजीटल ग्रामपंचायती तयार करणे कृषी प्रक्रीयेवर आधारीत उद्योग निर्मिती यासारख्या अनेक योजना शासनाने सुरू केल्या आहे.आपल्या गावाच्या विकासासाठी व राज्याच्या उत्थानासाठी कडक कायदे करीत भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आज महाराष्ट्रात प्रस्थापित केले आहे.यातुन आपण आपल्या विकासासाठी भर दयावा असे यावेळी त्यांनी सांगितले.
कर्यक्रमामध्ये राज्याचे उर्जामंत्री व नागपुर जिल्हयाचे पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हजरी लावली होती. यांनी नवनिर्वाचीत सरपंच व सदस्यांचे अभिनंदन केले व त्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले सरपंचपदी आरूढ झालो म्हणजे आपले काम संपले,अशी भावना कुणीही बाळगु नये.राज्य व केंद्र सरकारने ग्रामविकासावर सर्वाधिक लक्ष देऊन काम केले आहे. सरकारने सरपंचांचे अधिकार क्षेत्र वाढविले असून डिजिटल ग्रामपंचायतीमुळे आता केंद्रांचा सरळ ग्रामपंचायतीशी संबंध येणार आहे.विकास निधीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर अवलंबुन राहण्याची गरज नाही.त्याचबरोबर पालकमंत्री या नात्याने मी देखील निधी कमी पडु देणार नाही.हजारो योजना ग्राविकासाच्या आहेत.तेव्हा या योजनांचा अभ्यास करा.प्रस्ताव कसे तयार करावे,कुठली योजना कशी राबवायची ,त्यासाठी विभागाकडे पाठपुरावा करायचा या सर्व बाबींच्या माहितीचे तंत्र अवगत करा.असा विकासाचा मंत्र यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित सरपंचांना दिला.या कार्यक्रमामध्ये नागपुर जिल्हयातील भाजपचे सर्व नवनिर्वाचित सरपंच,सदस्य व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.अरविंद गजभिये यांनी केले.व आभार प्रदर्शन श्री प्रेम झाडे यांनी केले.

जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना भाजयुमोद्वारा फळवितरण
शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७

रामू तिवारींची घरवापसी होणार?
चंद्रपूर - महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती रामू उर्फ रितेश तिवारी भाजप सोडून पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असून यासाठी ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सतत संपर्कात असल्याची खात्रीजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. कॉग्रेस मध्ये असतांना शहरातील काँग्रेस पक्षाच्या बळकटी देत कार्यकर्त्यांचा मोठा फोज फाटा तयार करणारे रामू तिवारी यंदाच्या मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज होहून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढले होते. मात्र मतदारसंघ नवा असल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्येच काम केले. सध्याही ते भारतीय जनता पार्टीतच सक्रिय आहे. मात्र आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. या संबंधाने त्यांनी नुकतीच नागपूर येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची भेट घेतल्याचीही खात्रीजनक माहिती आहे.
अविनाश पाल बाजार समिती अशासकीय प्रशासकीय मंडळात
सावली/प्रतिनिधी - कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अशासकीय प्रशासकीय मंडळात मुख्य प्रशासक म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी पदभार स्विकारला.
या अशासकीय प्रशासक मंडळात उपमुख्य प्रशासक म्हणून विनोद गड्डमवार यांची तर प्रशासक म्हनुन दिलीपजी ठिकरे, पुनम झाडे, सुधाकरजी गोबाडे, अर्जुनजी भोयर, अरुनजी पाल, गुरुदेव भुरसे, अशोक नागापुरे, रविंद्र साखरे, सचिन तंगडपल्लीवार, ढिवरूजी कोहळे, भुवनजी सहारे, सौ. पुष्पाताई शेरकी व शरद सोनवाने यांची नियुक्ति करण्यात आली.
पदभार स्विकारतांना संतोष सा. तंगडपल्लीवार सभापती बांधकाम समिती जि. प. चंद्रपूर, देवराव सा. मुद्दमवार जिल्हा सचिव भाजपा, सतिष बोम्मावार महामंञी, तुकाराम ठिकरे उपसभापती पं. स. सावली, मनिषा चिमुरकर सदस्य जि. प. चंद्रपूर, योगिता डबले सदस्य जि. प. मनोहरजी कुकडे होते.
बुधवार, नोव्हेंबर ०८, २०१७

नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे जनआक्रोश आज
नागपूर - ८ नोव्हे.२०१७ रोजी नोटबंदी ला १ वर्ष पूर्ण होत असून देशभरात काँग्रेस पक्षातर्फे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे . भाजप प्रणित केंद्र व राज्यात सत्तेत असलेले शासन जनतेविरुद्ध अनेक निर्णय घेत आहे. याचा फटका समाजातील सर्व घटकांना बसला असून या शासन विरुद्ध बुधवार ८ नोव्हे.२०१७ रोजी दुपारी ३.०० वाजता टेलीफोन एक्सचेंज चौक,नागपूर येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केले आहे.
मंगळवार, नोव्हेंबर ०७, २०१७
दारूच्या बाटलीवर भाजपच्या 'कमळ'चा लोगो
नागपूर/प्रतिनिधी : दारूला महिलांचे नाव दिले तर दारूची अधिक विक्री होईल असं म्हणणाऱ्या गिरीश महाजनांचा नागपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दारूच्या बाटलीवर कमळ चिन्ह लावून कलेक्टर ला दारूच्या बाटल्या दिल्या.
केंद्रात आणि राज्यात भाजप ची सरकार आहे, त्यामुळे भाजप चे फॉलोवर अधिक आहे त्यामुळे बाटली वर मोदी किंवा कमळ लावले तर अधिक विक्री होऊ शकते अस राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष अलका कांबळे यांनी सांगितले. तसेच हा महिलांचा अपमान असून गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यानी त्यांना राजीनामा मांगवावा असे अलका कांबळे यावेळी म्हणाल्या.
दारूची विक्री वाढविण्यासाठी दारूला महिलांची नावे द्यावीत असा अजब सल्ला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याचे वृत्त सर्वत्र गाजले होते. बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे. त्यांची विक्री अधिक होते, ही वस्तुस्थिती आहे. तंबाखूजन्य पदार्थांनाही विमल, सुमन अशी बहुतांशी महिलांचीच नावे दिल्या गेली आहे. त्यामुळं सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी दारूचं नाव 'महाराजा' ऐवजी 'महाराणी' करावे असे गिरीश महाजन म्हणाले होते.


