Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जुलै २६, २०१८

केंद्र व राज्यसरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पाहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण शक्तीनिशी कार्य करावे- विजय चौधरी

भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची आढावा बैठक संपन्न

चंद्रपूर प्रतिनिधी:- 
भारतीय जनता पार्टी, ओ.बी.सी. मोर्चा, चंद्रपूर महानगर व ग्रामीण यांच्या पदाधिकाऱ्याची आढावा बैठक डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या सभागृहामध्ये प्रदेश मा. अध्यक्ष विजयदादा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व महापौर अंजलीताई घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी श्री चौधरी यांनी पदाधिकाऱ्याकडून संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार कडून राबविण्यात आलेल्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केले. 

दि. 24 जुलै 2018 पासून नागपूर येथील ‘‘संवाद से संपर्क’’ अभियानाची सुरूवात प्रदेश अध्यक्ष मा. विजयदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. हा प्रवास पुढील 12 दिवसांपर्यंत निरंतर सुरू राहणार असून या दरम्यान विदर्भ व मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्हयाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व ओ.बी.सी. संघटनांसोबत विविध जाती धर्मातील स्थानिक नेते व पदाधिकाऱ्याच्या भेटी घेतल्या जाणार आहे. या दरम्यान गेल्या दोन दिवसांमध्ये नागपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली येथे पक्षकार्यकत्र्यांची आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर आज प्रदेश पदाधिकाऱ्याचे चंद्रपूर मध्ये आगमन झाले. यादरम्यान दुपारी 1.00 वाजता संपन्न झालेल्या या बैठकीप्रसंगी व्यासपिठावर प्रदेश अध्यक्ष विजय चैधरी, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाध्यक्ष ग्रामीण हरीषजी शर्मा, प्रदेश महामंत्री संजय गाते, प्रदेष उपाध्यक्ष किशोर पाटील, विदर्भाचे अध्यक्ष सुभाश घाटे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य श्रावण चैव्हाण, ओ.बी.सी. मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बगमारे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, महामंत्री शशीकांत मस्के, श्रीकांत भोयर, स्वप्नील बनकर, ग्रामीण जिल्हा महामंत्री अंकुश आगलावे, राकेश बदकी, संदीप पारखी, महिला जिल्हा अध्यक्षा सारीकाताई संदूरकर व ग्रामीण महिला अध्यक्षा मनिशा चिमुरकर, सह अनेक ओ.बी.सी. मोर्चाचे पदाधिकारी उपस्थिती होते. कार्यक्रमाप्रसंगी श्री चैधरी म्हणाले की आतपर्यंत सर्वात जास्त अन्याय ओ.बी.सी. समुदायावरती झाला आहे. ऐकेकाळी ओ.बी.सी च्या न्याय हक्कासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर देखील ओ.बी.सी. संदर्भातील भुमिका बदललेली नाही. यानंतर काकासाहेब कालेलकर आयोगाची नियुक्ती करण्यात आली मात्र त्यालादेखील कॉग्रेस सरकारने बगल दिली. गेल्या 40 वर्षापासून ओ.बी.सी. समाज अन्याय सहन करत होता. मात्र राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात पहिल्या ओ.बी.सी. मंत्रालयाची स्थापना आपल्या राज्यात करण्यात आली. त्यासाठी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी 9000 कोटी पेक्षा अधिक निधी दिला. त्याचप्रमाणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने राष्टीय ओ.बी.सी. आयोगाची स्थापना करण्याची हालचाल सुरू केली आहे. संसदेमध्ये हे बिल मागील अधिवेशनामध्ये ठेवण्यात आले होते मात्र त्याला काॅग्रेस सरकारने विरोध केला. राज्यसभेमध्ये संख्याबळ नसल्याकारणाने त्यावेळी हे बील पास होवू शकले नाही. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. राज्यसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पुर्ण बहुमत आले असून येत्याकाळामध्ये राश्ट्रीय ओ.बी.सी. आयोगाला मंजूरी मिळाल्याषिवाय राहणार नाही. श्री. चैधरी म्हणाले की, आयोगाला मंजूरी मिळाल्यानंतर ओ.बी.सी. समाजाला संवैधानिक अधिकार प्राप्त होणार आहे. 
कार्यकर्त्यांना संबोधीत करतांना श्री चौधरी यांनी जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाष बगमारे व महानगर अध्यक्ष श्री विनोद शेरकी यांना तीन कलमी कार्यक्रम आपल्या कार्यक्षेत्रात तात्काळ अमलात आणण्याचे आदेश दिले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन पुढे आलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजना समाजातील प्रत्येक असंघटीत कामगारापर्यंत घेवून जाण्यास सांगितले केवळ 85 रू. भरून कुठल्याही बांधकाम मजुराला या योजनेचा लाभार्थी बनता येईल या लाभाथ्र्यांस एका महिन्याच्या आत 5000 रू. ची मदत राज्यसरकार कडून प्राप्त होईल. तसेच राज्यातील 18 योजनांचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे ओ.बी.सी. समाजातील 348 जातींच्या पदाधिकाऱ्यापर्यंत तसेच अंतर्गत संघटनेच्या नेतृत्वापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेण्याचे निर्देष दिले. येत्याकाळात संबंधीत समाजांच्या समस्या व मागण्या संदर्भात राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. याचबरोबर केंद्र व राज्यसरकारच्या योजनांचा लाभ पदरात पाडून घेतल्यानंतर ज्या लाभाथ्र्यांना त्याचा फायदा झाला त्यांची 60 सेकंदाची एक व्हिडीओ क्लीप बनवून ती वाॅट्सप च्या माध्यमातुन जनतेपर्यंत पोहचविण्याची सुचना केली. 
कार्यक्रमाप्रसंगी महापौर अंजली घोटेकर, महामंत्री संजय गाते, हयांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रकाश बगमारे व सुत्रसंचालन, शशीकांत मस्के यांनी केले. तर उपस्थित मांन्यवर, पदाधिकारी व कार्यकत्र्यांचे विनोद शेरकी यांनी आभार व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.