Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

भाजप लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाजप लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, जुलै २६, २०१८

केंद्र व राज्यसरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पाहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण शक्तीनिशी कार्य करावे- विजय चौधरी

केंद्र व राज्यसरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पाहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण शक्तीनिशी कार्य करावे- विजय चौधरी

भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची आढावा बैठक संपन्न

चंद्रपूर प्रतिनिधी:- 
भारतीय जनता पार्टी, ओ.बी.सी. मोर्चा, चंद्रपूर महानगर व ग्रामीण यांच्या पदाधिकाऱ्याची आढावा बैठक डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या सभागृहामध्ये प्रदेश मा. अध्यक्ष विजयदादा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व महापौर अंजलीताई घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी श्री चौधरी यांनी पदाधिकाऱ्याकडून संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार कडून राबविण्यात आलेल्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केले. 

दि. 24 जुलै 2018 पासून नागपूर येथील ‘‘संवाद से संपर्क’’ अभियानाची सुरूवात प्रदेश अध्यक्ष मा. विजयदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. हा प्रवास पुढील 12 दिवसांपर्यंत निरंतर सुरू राहणार असून या दरम्यान विदर्भ व मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्हयाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व ओ.बी.सी. संघटनांसोबत विविध जाती धर्मातील स्थानिक नेते व पदाधिकाऱ्याच्या भेटी घेतल्या जाणार आहे. या दरम्यान गेल्या दोन दिवसांमध्ये नागपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली येथे पक्षकार्यकत्र्यांची आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर आज प्रदेश पदाधिकाऱ्याचे चंद्रपूर मध्ये आगमन झाले. यादरम्यान दुपारी 1.00 वाजता संपन्न झालेल्या या बैठकीप्रसंगी व्यासपिठावर प्रदेश अध्यक्ष विजय चैधरी, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाध्यक्ष ग्रामीण हरीषजी शर्मा, प्रदेश महामंत्री संजय गाते, प्रदेष उपाध्यक्ष किशोर पाटील, विदर्भाचे अध्यक्ष सुभाश घाटे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य श्रावण चैव्हाण, ओ.बी.सी. मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बगमारे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, महामंत्री शशीकांत मस्के, श्रीकांत भोयर, स्वप्नील बनकर, ग्रामीण जिल्हा महामंत्री अंकुश आगलावे, राकेश बदकी, संदीप पारखी, महिला जिल्हा अध्यक्षा सारीकाताई संदूरकर व ग्रामीण महिला अध्यक्षा मनिशा चिमुरकर, सह अनेक ओ.बी.सी. मोर्चाचे पदाधिकारी उपस्थिती होते. कार्यक्रमाप्रसंगी श्री चैधरी म्हणाले की आतपर्यंत सर्वात जास्त अन्याय ओ.बी.सी. समुदायावरती झाला आहे. ऐकेकाळी ओ.बी.सी च्या न्याय हक्कासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर देखील ओ.बी.सी. संदर्भातील भुमिका बदललेली नाही. यानंतर काकासाहेब कालेलकर आयोगाची नियुक्ती करण्यात आली मात्र त्यालादेखील कॉग्रेस सरकारने बगल दिली. गेल्या 40 वर्षापासून ओ.बी.सी. समाज अन्याय सहन करत होता. मात्र राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात पहिल्या ओ.बी.सी. मंत्रालयाची स्थापना आपल्या राज्यात करण्यात आली. त्यासाठी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी 9000 कोटी पेक्षा अधिक निधी दिला. त्याचप्रमाणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने राष्टीय ओ.बी.सी. आयोगाची स्थापना करण्याची हालचाल सुरू केली आहे. संसदेमध्ये हे बिल मागील अधिवेशनामध्ये ठेवण्यात आले होते मात्र त्याला काॅग्रेस सरकारने विरोध केला. राज्यसभेमध्ये संख्याबळ नसल्याकारणाने त्यावेळी हे बील पास होवू शकले नाही. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. राज्यसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पुर्ण बहुमत आले असून येत्याकाळामध्ये राश्ट्रीय ओ.बी.सी. आयोगाला मंजूरी मिळाल्याषिवाय राहणार नाही. श्री. चैधरी म्हणाले की, आयोगाला मंजूरी मिळाल्यानंतर ओ.बी.सी. समाजाला संवैधानिक अधिकार प्राप्त होणार आहे. 
कार्यकर्त्यांना संबोधीत करतांना श्री चौधरी यांनी जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाष बगमारे व महानगर अध्यक्ष श्री विनोद शेरकी यांना तीन कलमी कार्यक्रम आपल्या कार्यक्षेत्रात तात्काळ अमलात आणण्याचे आदेश दिले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन पुढे आलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजना समाजातील प्रत्येक असंघटीत कामगारापर्यंत घेवून जाण्यास सांगितले केवळ 85 रू. भरून कुठल्याही बांधकाम मजुराला या योजनेचा लाभार्थी बनता येईल या लाभाथ्र्यांस एका महिन्याच्या आत 5000 रू. ची मदत राज्यसरकार कडून प्राप्त होईल. तसेच राज्यातील 18 योजनांचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे ओ.बी.सी. समाजातील 348 जातींच्या पदाधिकाऱ्यापर्यंत तसेच अंतर्गत संघटनेच्या नेतृत्वापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेण्याचे निर्देष दिले. येत्याकाळात संबंधीत समाजांच्या समस्या व मागण्या संदर्भात राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. याचबरोबर केंद्र व राज्यसरकारच्या योजनांचा लाभ पदरात पाडून घेतल्यानंतर ज्या लाभाथ्र्यांना त्याचा फायदा झाला त्यांची 60 सेकंदाची एक व्हिडीओ क्लीप बनवून ती वाॅट्सप च्या माध्यमातुन जनतेपर्यंत पोहचविण्याची सुचना केली. 
कार्यक्रमाप्रसंगी महापौर अंजली घोटेकर, महामंत्री संजय गाते, हयांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रकाश बगमारे व सुत्रसंचालन, शशीकांत मस्के यांनी केले. तर उपस्थित मांन्यवर, पदाधिकारी व कार्यकत्र्यांचे विनोद शेरकी यांनी आभार व्यक्त केले.

मंगळवार, जुलै २४, २०१८

 विजय चौधरी यांचा विदर्भ "संवादसे संपर्क" अभियान दौरा

विजय चौधरी यांचा विदर्भ "संवादसे संपर्क" अभियान दौरा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी हे दि. २४ जुलै २०१८ ते १ ऑगष्ट २०१८ विदर्भातील व मराठवाडा विभागातील संधटनात्मक दौरा करणार आहेत. या प्रवासादरम्यान भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाची कार्य समिती बैठक घेऊन मोर्चाचा कामकाजाच्या आढावा घेतला जाणार आहे. तसेच ओबीसी मोर्चाचे दोन कार्यक्रम दिले जाणार आहे. याशिवाय जिल्याच्या ठिकाणी ओबीसी समाजातील विविध प्रमुखांशी चर्चा करून केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टी सरकारने केलेल्या जंकल्याणकारी योजनांची माहिती देवून "संवादसे संपर्क" हे अभियान राबविले जाणार आहे.

मंगळवार, एप्रिल १०, २०१८

सत्ताधारी भाजप सरकार बसणार उपोषणाला

सत्ताधारी भाजप सरकार बसणार उपोषणाला

bjp साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 सोमवारी केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसने देशभर एक दिवसाचा उपवास कार्यक्रम ठेवल्यानंतर आता सत्तेत असणारे मोदी सरकार विरोधकांसाठी एकदिवसीय उपवास कार्यक्रम ठेवणार आहे. 
संसदेत  विरोधक गदारोळ घालून सातत्याने कोंडी करत असल्याचा निषेध करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे सह भाजपचे सर्व खासदार  १२ एप्रिल रोजी काॅंग्रेसच्या राष्ट्रविरोधी भुमिकेचा निषेध नोंदविण्यासाठी उपवास उपोषण करणार आहे. हाच कार्यक्रम  चंद्रपूर येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात एकदिवसीय ‘‘सामुहिक उपवास’’ उपोषण करणार आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शाह नवी दिल्लीत एक दिवस उपोषण करणार आहेत.
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाजाचे बहुतांश दिवस वाया गेले. ही बाब देशातील जनतेपुढे नेण्यासाठी तसेच कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून घातल्या जाणाऱ्या गदारोळाचा विरोध करण्यासाठीच हे उपोषण असल्याचे संगीतल्या जात आहे. 
 12 एप्रिल 2018 रोजी गांधी चौक  चंद्रपूर येथे सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत हा सामुहिक उपवास कार्यक्रम होत असून या कार्यक्रमास राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री  तथा पालकमंत्राी चंद्रपूर जिल्हा
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, चंद्रपूर विधानसभेचे आमदार नानाभाऊ शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, राजुरा विधानसभेचे आमदार अॅड. संजय धोटे, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आर्णी विधासभा क्षेत्राचे आमदार राजू तोडसाम, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, महापौर सौ. अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होत असलेल्या या एकदिवसीय उपवास कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा
परिषद, पं.स. सभापती, मनपा सभापती, नगरपरिषद सभापती, जि.प. सदस्य, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील नगराध्यक्ष, नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक या उपवास कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

बुधवार, मार्च १४, २०१८

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार:मुनगंटीवार

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार:मुनगंटीवार

मुंबई/काव्यशिल्प ऑनलाईन:
bjp shivsena साठी इमेज परिणाम
"शिवसेना आणि भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार’, असा थेट दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतच केला आहे.‘शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक सेना - भाजप एकत्र लढणार.’ असा दावा मुनगंटीवार यांनी विरोधकांना उद्देशून केला.‘उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहींना तर मंत्री बनण्याची घाई झाली आहे. मात्र पुन्हा सत्ता आमचीच येणार.’ असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला,आमच्यात किती ही वाद झाले तरी आमचे आमही बघून घेऊ . काँग्रेस-राष्ट्रवादी 1999 मध्ये असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्याने एकत्र आलात त्यामुळे आम्हीही वेगळं न लढता एकत्र येऊ.’ असा विश्वास मुनगंटीवार यांनी सभागृहात विरोधकांना प्रत्युत्तर देताना व्यक्त केला.
एकीकडे शिवसेनेनं 2019 लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. अशावेळी मुनगंटीवार यांनी थेट सभागृहात आपण एकत्र लढणार असल्याचं म्हटल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. त्यामुळे शिवसेना आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

बुधवार, फेब्रुवारी २८, २०१८

शिवसेना भडकली;पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला

शिवसेना भडकली;पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला

आदिवासी समाज व चंद्रपूरची जनता किशोर जोरगेवारांन सोबत - सुरेश पचारे
चंद्रपूर (ललित  लांजेवार):   
shivsena bhajap साठी इमेज परिणाम
                       राज्याच्या राजकारणात भाजप शिवसेना यांच्यातला वाद काही नवीन नाही,खांद्याला खांदा लाऊन सत्तेत बसेले दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप दररोज करतात,तुझ माझ जमेना, तुझ्या वाचुन करमेना अशी स्थिती  राज्यात या पक्षाची आहे.
                   मात्र चंद्रपूरच्या राजकारणात देखील आज परीयंत कधी न झालेला  शिवसेना भाजप वाद आता शहराच्या राजकारणात जोर पकडू लागल्याचे चिन्ह दिसु लागले आहे. सोमवारी चंद्र्पूर येथे शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जनतेची मूख्य समस्या असलेल्या जटपूरा गेटचा मुद्दा हाती घेत वाहतुकीची कोंडी होत असणाऱ्या जटपूरा गेट येथून वाहतुकीचा मार्ग मोकळा करा व नंतरच सौंदर्यीकरण करा यासाठी आंदोलन केले, तसेच जिल्हाधिकारी यांना माहितेचे निवेदन देत सूचनाही सुचविल्या,हे आंदोलन होत नाही तर लगेच चंद्रपूर महानगर पालिकेच्या भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांनी या आंदोलनावर आक्षेप घेत एक प्रेस नोट माध्यमांत प्रकाशित केली. जटपूरा गेटला धक्का जरी लागला तर आदिवासी समाज चूप बसणार नाही.  असा घानाघात करत शिवसेनेच्या आंदोलनाला विरोध दर्शविला.
                     याच भाजप व शिवसेनेच्या तू-तू मै-मै मध्ये आता चंद्रपूरचे शिवसेनेचे नगरसेवक व शहर प्रमुख सुरेश पचारे यांनी एक प्रेस नोट काढत भाजपला थेट प्रतिउत्तर देत धारेवर धरले आहे. पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला असा खोचक उत्तर शिवसेना नेते किशोर जोरगेवार याची बाजू राखत सुरेश पचारे यांनी भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांना दिले आहे. 
                   याच सोबत प्रसिद्धी पत्रकात शिवसेने भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांच्यावर बराचश्या प्रश्नांची भडीमार केली आहे.  शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जनतेची मूख्य समस्या असलेल्या जटपूरा गेटचा मुद्दा हाती घेतल्या नंतर भाजपाच्या नगर सेविका शितल कुळमेथे यांना आदिवासी समाजाच्या पुरातन वास्तुंचा साक्षात्कार झाला आहे. जेव्हा महानगर पालीकेने गिरनार चौकातील विर बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या नावाचा फलक काढून तो कच-यात टाकला तेव्हा त्या परदेशात होत्या का? असा टोला हाणत किशोर जारगेवार यांच्या लोकोपयोगी आंदोलनाला आदिवासी समाजाचा पाठींबा असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगर सेवक सुरेश पचारे यांनी स्पष्ट केले आहे. 
शिवसेनेचा विकासकामांना कधिच विरोध नव्हता ना तो असेल मात्र नको त्या गोष्टीवर खर्च करुन मुळ समस्या जैसे तेच ठेवली जात असेल तर त्याला मात्र शिवसेना तिव्र विरोध आहे असे देखील या पत्राच्या माध्यमातून म्हटल्या गेले आहे , सौंदर्यीकरनाला आमचा विरोध नाही मात्र पहिले येथील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवा व नंतर हे सौंदर्यीकरण करा अशी भुमीका किशोर जोरगेवार यांनी घेतली आहे.
                         यात गोंड कालीन जटपूरा गेटचे अतिस्व मिटण्याचा प्रश्नच येत नाही. आणि शिवसेना असे पर्यंत तरी चंद्रपुरातील ऐतिहासिक वारसा असलेले गोंड कालीन वास्तूंना हात लावण्याची कोणाची हिम्मत नाही. आदिवासी समाज हा चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव आहे या समाजाचा मोठा वारसा जिल्ह्याला लाभला आहे मात्र त्याच्या वीर पुत्रांचे एकही  स्मारक शहरात नाही. त्यामुळे जटपुरा गेट समोर विर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक व्हावे अशी सेनेची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र आता नगरसेविका शितल कुळमेथे यांनी प्रेसनोट प्रकाशित करुन यात जातीय राजकार घोडण्याचा प्रयत्न केला आहे. याला आदिवासी समाज कधीही स्विकारणार नाही. गोंड कालीन वास्तुंची दशा आजघडीला अतिशय बिगट झाली आहे. त्यासाठी कूळमेथे यांनी आजवर किती निवेदण दिलेत? पहिले  हे सांगावे ,त्याच्या स्वताच्या भानापेठ प्रभागात नागरिकांनी गोंड कालीन परकोटांवर अतिक्रम केले आहे. त्यांना ते दिसत नाही का ? ईक्रो प्रो संघटणेच्या वतीने परकोट स्वच्छता मोहीम  राबवली जात असतांना शितल कुळमेथे यांनी कितीदा उपस्थिती लावली पाहिले हे सांगावे केवळ राजीकय हेतुतून समाजाच्या नावाचा गैरवापर करून उघीच  बडबड करु नये, आदिवासी समाज हा जागरुत आहे. आणि भाजपाने या समाजासाठी काय केले हेही या समाजाला चांगल्याने कळते त्यामूळे अश्या नगर सेवीकांच्या मागे हा समाज कधिच उभा राहणार नाही.  हे आदिवासी समाजाचे नेते तसेच आदी जनचेतना जागर या संस्थेचे अध्यक्ष अशोक तुमराम यांनी किशोर जोरगेवार यांच्या धरणे आंदोलनात उपस्थित राहून दाखऊन दिले आहे. त्यामुळे कुळमेथे यांनी पहिले त्यांच्या प्रभागातील परकोटांवर नारिकांनी केलेले अतिक्रमण काढावे त्यात भाजप त्यांना मदत करत नसेल तर तसेही सांगावे आम्ही गोंड कालीन वसा वाचवीण्यासाठी प्रयत्नशील असुन हे अतिक्रमण काढण्यात आम्ही तुम्हाला मदत करु असा सल्लाही पचारे यांनी शितल कुळमेथे यांना दिला आहे. 
                        याअगोदर पाच ठिकाणी गोंड कालीन परकोट तोडल्या गेले ते कुणाला विचारून तोडण्यात आले व त्यावेळेस कोणते अधिकारी होते? तसेच २.५० कोटी रुपये जटपुरा गेटच्या सौदर्याकरीता सरकारकडून दिले आहे जटपुरा गेट येथे वाहतूक कोंडी हि खूप मोठी समस्या आहे आणि इथल्या लोकप्रतीनिधीकडून तिथे सौंदर्यीकरणासाठी २.५० कोटी रुपये खर्च करीत आहेत ते पैसे तिथे खर्च करण्याची काही गरज नाहि तेच २.५० कोटी रुपये परकोटाच्या डागडुजी करीता खर्च करावे. या जटपुरा गेटच्या सौंदर्याकरीता शहरातील मोठे व्यापारी तसेच अनेक कंपन्या करायला तयार आहे पण त्यांना हे शासन करू देत नाही.  आणि तेच काम फुकट होत असताना त्याठिकाणी २.५० कोटी रुपये खर्च करण्याची काही गरज नाही आहे या संपूर्ण विषयाकडे नगरसेविका शितल कुळमेथे यांनी लक्ष द्यावे आणि विनाकारण दोषारोपण करू नये.  असा सवाल देखील पचारे यांनी करत भापला चांगलच सवालाच्या घेऱ्यात उभे केले.  त्यामुळे दररोज होणाऱ्या भाजप शिवसेना वादात नक्कीच चंद्रपूरच्या नागरिकांच्या समस्या मार्गी लागणार का ? कि हे दोन्ही पक्ष दररोज आप-आपल्या कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून एकमेकांवर टीका करतच राहणार हे मात्र योग्य ती वेळच ठरवेल.त्यामुळे शिवसेनेच्या या खोचक सावलांचे उत्तर भाजप कोणत्या पद्धतीने देते ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे. 
shivsena bhajap साठी इमेज परिणाम