Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बिबट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बिबट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, सप्टेंबर २७, २०१८

उघड्यावर शौचालयाला गेला अन.. गमवावा लागला जीव

उघड्यावर शौचालयाला गेला अन.. गमवावा लागला जीव

बिबिट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दुर्दैवी अशी घटना समोर आली आहे.जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मुरपार येथील एका ८ वर्षाचा मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.मात्र हि घटना काही वेगळ्या कारणाने घडल्याचे समोर येत आहे.साहिल सालोरकर वय 8 वर्षे असे बिबट्याने ठार केलेल्या बालकाचे नाव आहे.हा मुलगा सकाळी आई पाठोपाठ उघड्यावर शौचालयाला गेला असता त्याचेवर दबा घरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला यात त्याचा जागीच मृत्यू झाला.बिबट्याने झडप घातली व त्याला खेचत जंगलात नेले. आरडाओरडा केल्या नंतर संपूर्ण गाव गोळा झाला व जंगलात साहिल चा शोध घेतला असता तो मृत अवस्थेत आढळून आला. 
महाराष्ट्राने हागणदारी मुक्तचा मोठा टप्पा पार केला आहे. यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. महाराष्ट्रात २०१२मध्ये ५० लाख घरांत शौचालय होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये राज्यात २२ लाख शौचालये बांधली. यामुळे ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र हागाणदारी मुक्त झाला असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
घडलेल्या या प्रकारावरून शासनाच्या योजना घराघरात कितपत पोहोचल्या आहेत याचा प्रत्यय समोर येत आहे.

शनिवार, जुलै २१, २०१८

अपघातात जखमी झालेल्या बिबट्याच्या अखेर मृत्यू

अपघातात जखमी झालेल्या बिबट्याच्या अखेर मृत्यू

नागपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरालगत मुल मार्गावर लोहारा गावाजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या मादी बिबट्याचा मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला .अपघातानंतर उपचारासाठी त्याला गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात आणले होते. तब्बल दोन महिन्यांच्या उपचारानंतरही या बिबट्याची किडनी काम करत नसल्याने बिबट्या मृत्यु झाला. बिबट्याला 16 मे रोजी गोरेवाड्यात आणले होते. प्राथमिक तपासणीत बिबट्याचा मागील उजवा पाय तुटला होता समोरच्या पायाला देखील मोठी जखम झाली होती . त्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली त्याच्या पायात रॉड टाकण्या संदर्भात विचार सुरू होता. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भाग्यश्री शेंडे यांच्या मार्गदर्शनात त्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याच्या किडनी निकामी झाल्यावर त्या त्यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास बिबट्याचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिरीष उपाध्ये डॉक्टर विनोद धूत,भाग्यश्री शेंडे यांच्या उपस्थितीत डॉक्टर सोनकुसरे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर गोरेवाडा उपविभागीय व्यवस्थापकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सहाय्यक वनरक्षक वनपाल माडभुशी,वनपाल चव्हाण,वनरक्षक जाधव,वाघाडे आदी उपस्थित होते.

मंगळवार, मे १५, २०१८

चंद्रपुरात बिबट्याच्या वन अधिकाऱ्यावर हल्ला

चंद्रपुरात बिबट्याच्या वन अधिकाऱ्यावर हल्ला

नागपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर-मुल मार्गावर अधन्यात वाहनाच्या धडकेत जखमी वन अधिकाराच्या अंगावर झडप घेत हल्ला चढविला,या बिबट्याला उपचाराकरिता नेण्यासाठी वनविभागाची टीम १२ तासापासून बिबट्याला जेरबंद करायच्या प्रयत्नात होती,मात्र या चवताडलेल्या  बिबट्याने चक्क वाचवायला गेलेल्या वन अधिकाऱ्यावरच हल्ला केला,मात्र वन अधिकारी संतोष थीपे यांनी या बिबट्याचा प्रतिकार केला, यात वनपरीक्षेत्र अधिकारी थोडक्यात बचावले चंद्रपूर शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर चंद्रपूर- गडचिरोली महामार्ग हा प्रकार घडला.वन अधिकार्यावर हल्ला चढविला असता दरम्यान  त्यांच्या हातात असलेल्या फायबर रॉडने त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी त्याच्यावर रोड ऊगारला त्यामुळे संतोष थिपे हे थोडक्यात बचावले, तब्बल पाच मिनिटे हा प्रकार सुरू होता हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे ही थरारक आणि  बिबट्या आणि वन अधिकारी यांची झुंज समोर आली. वाहनाने वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली होती व तो परिसरातील बांबूचे झुडपांमध्ये लपलेला होता या याचा दरम्यान वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्याला उपचारासाठी न्यायला आले असता त्यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला,यानंतर त्याला जेरबंद करून उपचारासाठी चंद्रपूर येथे आनण्यात आले आहे.

  -----------------------------------------------------------------------
जाहिरात...

भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

रविवार, जानेवारी १४, २०१८

झुंजीमध्ये बिबट्याचा मृत्यू

झुंजीमध्ये बिबट्याचा मृत्यू

उमरेड/वार्ताहर:
उमरेड तालुक्यातील लोहारा गावाजवळ रविवार १४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ८ वा.  दरम्यान दोन शेतकरी व बिबट्याच्या  झुंजीमध्ये बिबट्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी रवींद्र भाऊराव ठाकरे रा. लोहारा व राजेंद्र देवनाथ ठाकरे रा. खुर्सापार येथील रहिवासी असून या दोघांचीही शेती लोहारा जंगलाला लागून आहे. रोजच्याप्रमाणे दोघेही रात्री  आपआपल्या शेतामध्ये पिकांची पाहणी  करण्याकरिता गेले होते. दिवस उजाळल्यानंतर रवींद्र ठाकरे यांना एक बिबट त्यांच्या शेतातील मालकीच्या बैलावर हल्ला  करताना दिसला.
                                 हे दृष्य पाहून त्याने काहीही एक विचार न करता वाघाच्या दिशेने धाव घेतली. मिळेल त्या साधणांनी वाघाला हाकलून लावले. परंतु, थोड्याच वेळात परत वाघाने रवींद्रवर हल्ला चढविला व त्याला गंभीर जखमी केले. तेव्हा रविंद्रची आरडा ओरडा पाहून बाजूच्या शेतात असलेला राजेंद्र हा रवींद्रच्या दिशेने धावला व  मिळेल त्या वस्तुने वाघाच्या शरीरावर मारणे सुरू केले. या झटापटीत रवींद्रला बिबट्याने जखमी केले. मदतीला राजेंद्र धावून आला. बैल, शेतकरी रवींद्र व बिबट्याच्या जीवघेण्या झुंजीमध्ये दोन्ही शेतकºयांनी आपली सुटका केली. परंतु ,त्यांच्या झुंजीमध्ये वाघाचा मृत्यू झाला. बिब्याचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे असल्याचे समजते. तेव्हा काही वेळेने ही बातमी गावामध्ये वाºयासारखी पसरली. यानंतर गावकºयांनी त्याठिकाणी धाव घेवून दोन्ही जखमी शेतकºयांना नागपूर येथील रुग्णालयात हलविले. 
                           थोड्याच वेळात उमरेड येथील वनविभागाचा चमु व पोलिस पथक दाखल झाले. पंचाच्या उपस्थितीत वाघाचा पंचनामा करुन लोहारा जवळील नर्सरीमध्ये वाघावर अग्नीसंस्कार करण्यात आले. परंतु या घडलेल्या घटनेमुळे गावातील सर्व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून शेतातील पिकाची व आपल्या पाळीव प्राण्याचे काय होणार असा प्रश्न नागरिकांसमोर पडला असून वनकर्मचारी  कर्मचारी फक्त पाहण्याचीच भूमिका घेणार की काही करणार असा प्रश्न जनतेसमोर पडला आहे.

बुधवार, नोव्हेंबर १५, २०१७

भुज पद्मापूर येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी

भुज पद्मापूर येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी

 ब्रह्मपुरी /प्रतिनिधी:
ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण वन परिसराअंतर्गत येणाऱ्या भूज पद्मापूर येथे श्री.दादाजी उंदरु तलांडे वय (55) गुराखी हा  गायीं चरायला जंगल मध्ये नेला असता झुडपा मध्ये लपुन बसलेल्या पिसाळलेल्या वाघानी हल्ला चढवून गंभीर जखमी केले.असून जखमी गुराखी याला प्रथोमपचारा करीता ब्रम्हपुरी रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे
 तरी संभाव्य धोके लक्षात घेता वन विभागाने तात्काळ पिसाळलेल्या वाघाला जेरबंद करावे अन्यथा आंदोलन करण्याच इशारा तेथील ग्रामस्थांनी दिला आहे