Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, ऑगस्ट २३, २०१८
गुरुवार, जून २८, २०१८
वर्ध्यात धाडसी चोरी;६ लाखांचा ऐवज लंपास
शनिवार, एप्रिल ०७, २०१८
पोलिसांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला
सोमवार, नोव्हेंबर १३, २०१७
नवी मुंबईत भुयार खोदून बँक लुटली
नवी मुंबई : नवी मुंबईत जुई नगर येथे काही दरोडेखोरांनी भुयार खोदून बँक लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिल्मी स्टाइलने बँकेवर टाकण्यात आलेल्या या दरोड्यामुळे नवी मुंबई पोलीसही चक्रावून गेले आहेत.जुई नगर सेक्टर-११ मध्ये बँक ऑफ बडोदावर दरोडा पडल्याचं आज सकाळी उघडकीस आलं. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने बँक बंद होती. आज सकाळी बँक उघडण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. बँकेच्या बाजूला असलेलेल्या दुकानातून भुयार खोदून दरोडेखोरांनी या बँकेत प्रवेश केला. यानंतर तिजोरी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेली आहे. दरोडेखोरांनी नेमकी किती रक्कम लंपास केली याची माहिती मिळू शकली नाही. बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानात या भुयाराचे उगमस्थान आढळून आलंय. त्यामुळे या दुकानाचा मालक आणि दुकानातील नोकरांची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं. हे भुयार एका रात्रीत खोदलं गेलं नाही. त्यासाठी अनेक दिवस लागले असतील. पूर्ण प्लॅनिंग करूनच एखाद्या टोळीने हे भुयार खोदलं असावं, असं पोलीस सुत्रांनी सांगितलं. एवढं मोठं भुयार खोदलं जात असताना आसपासच्या परिसरातील लोकांना त्याचा सुगावा कसा लागला नाही? यावर पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
रविवार, नोव्हेंबर १२, २०१७
चंद्रपुरात घरफोडी पोलीस सुस्त, चोरटे मस्त
शहरात घरफोडी होते ह्या घरफोडीची तक्रार पोलिसात केली जाते. मात्र पोलिस दादा हे घटनास्थळी लवकर पोहोचत नाही असा अनुभव नागरिकांना बराच वेळा वेगवेगड्या माध्यमातून येतो. असाच अनुभव चंद्रपुरात रामनगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणात फिर्यादीला व चंद्रपूरच्या जनतेला आला आहे.
शनिवारच्या रात्री रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्या रामनगर परिसरातील श्री. अरुण चिंतलवार यांच्या राहत्या घरी रात्रीच्या सुमारास घरफोडी झाली. या घरफोडीत अरुण चिंतलवार
यांच्या घरून दहा हजार रुपये रोख व दोन हजार रुपये चिल्लर त्याच सोबत महत्वपूर्ण सामानही चोरीला गेल.
चोरट्यांनी जेव्हा घर फोडलं तेव्हा चिंतलवार दाम्पत्य हे एका वैवाहिक कार्यक्रमासाठी अकोला येथे गेले होते. सकाळ होताच शेजारी राहणारे सुनील तिवारी यांच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. त्यांनी या घटनेची माहिती चिंतलवार दांपत्यास फोनवरून दिली मात्र अकोला- चंद्रपूर अंतर लांब असल्याने त्यांनी संध्याकाळपर्यंत पोहोचातोय असे फोनवरून तिवारी यांना कडविले. व घटनेची माहिती पोलिसांना देण्यास सांगितले. तिवारी यांनी या घटनेची माहिती रामनगर पोलीस स्टेशनला फोन करून दिली, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटात त्यांना घटनास्थळावर जाणे बंधनकारक असते. पोलिस स्टेशन ते घटनास्थळ हे अंतर जवळपास अडीच किमी. मात्र घटनेच्या 50 मिनिटानंतरही पोलिस घटनास्थळी दाखल झाली नव्हती. त्यामुळे शेजारी तक्रारदार पोलिसांची वाट पाहत घटनास्थळी बराच वेळ होते. घटनेचा 50 मिनिटांनीही पोलीस घटनास्थळावर दाखल झाली नाही हे बघून तिवारी यांनी रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार जी.बी.गोटमारे यांना त्यांच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्याचाही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे परत फोन रामनगर पोलिसांना करण्यात आला. मात्र त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे जे उत्तर होते ते सामान्य जनतेसाठी चीड़ निर्माण करणारे होते.
संपूर्ण घटनाक्रमाची माहिती पोलीस दादांनी फोनवर घेऊन घेतली मात्र या घटनेला प्राधान्य न देता, या घटनेबद्दल गांभीर्य न जाणता त्यांनी सर्वात पहिले मुद्देमाल गेला आहे का? किंवा चोरीचा प्रकार मोठा आहे की छोटा असा प्रश्न केला. इतका सर्व खटाटोप झाला असतानाही पोलिस स्टेशन पासून निव्वळ दोन ते अडीच किलोमीटर अंतर यासाठी पोलिसांना इतका खटाटोप का करावा लागला? असाही प्रश्न यावेळी निर्माण होत आहे. यातही तक्रारकर्त्याने इतका वेळ घटनास्थळावर पोहोचण्यासाठी का होतोय अशी विचारणा केली असता पोलिसांनी फोनवरून उत्तर दिले 'सकाळची वेळ असल्याने पोलीस स्टेशनमध्ये स्टाफ कमी व कामात आहे त्यामुळे घटनास्थळावर कर्मचारी पोहोचून जाईल थोडा वेळ लागेल'.
चंद्रपुरातील रामनगर परिसर हा उच्चभ्रू वस्तीत मोडतो या वस्तीत शहरातील धनाढ्य व सुशिक्षित नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तक्रारदाराच्या सांगण्यावरून या परिसरात पोलीस कधीच गस्त घालत नाही असे निदर्शनास आले आहे. तक्रारदार हे कामानिमित्य रात्रीचे दोन वाजेच्या दरम्यान घरी परततात तरीही पोलिसांची पेट्रोललिंग या प्रभागात कधीच दिसली नाही असे सांगण्यात येते. हा मार्ग म्हणजे शहराच्या बाहेर चहूबाजूंनी निघण्यासाठी सोईस्कर आहे. घुग्घुस- चंद्रपूर, घुग्घुस- नागपूर, घुग्गुस- राजुरा, आणि परत शहरात हा मार्ग येतो. त्यात हा मार्ग भामटे -भुरट्याना शहराबाहेर जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर आहे. मात्र या परिसरात पोलिसांची गस्त नसल्याने चोरटे आपल्या संधीचा पुर्ण फायदा घेत असतात.त्यामुळे आता रामनगर पोलिसांना आपल्या हदीत गस्त घालन्याची गरज या निमित्याने निर्माण होत आहे
या संपूर्ण प्रकारात प्रश्न हा तक्रार करण्याचा किंवा घेण्याचा नसून पोलिसांवरील आक्षेपाचा देखील नाही.प्रश्न आहे तो पोलिसांनी दिलेल्या "असमाधानकारक उत्तरांचा" आहे.
त्यामुळे रामनगर पोलिसांच्या अशा बेजबाबदार प्रश्नांमुळे व लेटलतीफ पणामुळे नागरिक पोलिसांवर विश्वास ठेवणार का ?असाच प्रश्न निर्माण होत आहे.या संपूर्ण प्रकरनावरुण वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा कर्मचार्यांना काय सबब देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.