Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गडचांदूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गडचांदूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जून ०८, २०१८

 प्रदूषणाने माखतोय गडचांदूर शहर

प्रदूषणाने माखतोय गडचांदूर शहर

cement factorys साठी इमेज परिणामगडचांदूर/प्रतिनिधी:
सिमेंट सिटी म्हणून महाराष्ट्र सह भारतभर प्रसिद्धी मिळालेल्या गडचांदूरतील तरुणांची मात्र आजही थट्टाच दिसते आहे.ज्या बाबीमुळे हि मोठी प्रसिद्धी मिळाली त्याच शहरातील तरुणांना सध्या रोजगारासाठी जिल्ह्यासह पर राज्यात कामासाठी जावे लागते हि मोठी शोकांतीका मानावी लागेल.हि बाब येथील राजकीय व सत्ताधार्यांची उदासीनता आहे कि ,मजबुरी हे आज पर्यंत येथील तरुणांना कळले नाही.
फक्त निवडणुका आल्या कि राजकारण्यांना वोट मागण्याची नेम्मून तरुणांची आठवण येते.परंतू आश्वासन देऊन आपले काम झाले कि आपली मनमानी सुरु असेच काहीशे चित्र मागील काळात झाल्याचे दिसते.
कोरपना या आदिवासी बहुल व मागास समजल्या जाणाऱ्या तालुक्यात ऐक नाही तर तब्बल चार सिमेंट प्रकल्प अस्थित्वात आहे.या दृष्टीकोनातून बघीतले तर येथील प्रत्येक तरुणांच्या हाताला मागेल तेवढा रोजगार मिळेल.परंतु हि एक सर्वात मोठी व लाजवेल अशी शोकांतिकाच म्हणावी लागेल.
गडचांदूर शहरात अगदी लोकवस्तीत नवीन प्रकल्पाचे कार्य पूर्णत्वास आले आहे.परंतु येथील अनेक तरुणांना एक मोठी आशा होती कि आपल्याला काही ना काही रोजगार हातास गवसेल परंतु ती आशा स्वप्नातस राहिली .ग्राम पंचायतीने नाहरकत प्रमाण पत्र देताना शहरातील बेरोजगार आणि पाहिजे त्याला रोजगार शहराच सौन्दर्यीकरन या बाबीच आश्वासन दिल गेले.परंतु आपल्या मुठीत काही राजकारण्यांनी धागे दोरे लावून आपापली माणसे लावून डल्ला मारून अनेक स्थानिक बेरोजगारावर्ती एकप्रकारची कुऱ्हाडच मारली आहे.
मागील काही दिवसात प्रकल्पात रोजगार भरतीसाठी पडताळणी केली.यामध्ये शहरातील स्थानिक तरुण बेरोजगारांना हाताला काम लागत नसल्याच्या प्रतिक्रिया आल्या.
सध्या गडचांदूर हा परप्रांतीयांचा एक प्रकारे अड्डाच बनला आहे. दररोज या शहरात परप्रांतीयांचे जत्थे उतरताना दिसते.या बाबीमुळे गड्चान्दुरची संख्या झपाट्याने वाढत असून शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे.शहरात जागा कमी आणि लोकसंख्या वाढत असून याचा नाहक त्रास स्थानीक राहणाऱ्या नागरिकांना होत आहे.प्रकल्पामध्ये यांचे धागेदोरे अगदी जवड चे असल्याने तरुणांचा रोजगार कमी होत असल्याचे येथील तरुणांचे म्हनणे आहे.मागील काही दिवसात बाहेरील जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील तरुणांची येथे धावपळ झाली.यातील अनेक तरुण बाहेरील होते.परंतु गड्चान्दुरातील तरुणांना रोजगार का नाही याची अजून पर्यंत काही कुणाला कल्पना सुधा सुचली नाही.

गडचांदूरकरांना होत आहे विकारांचा स्पर्श

गड्चांदुर कराना आत्तापर्यंत या विषयाची काही कल्पना नव्हती की समोर या समस्यांना झुंजावे लागेल कि सध्या पाण्यात क्षार चे प्रमान एवडे वाढले कि पोटाची आजार होण्यास प्रारंभ झाला आहे.अवती भवती प्रदूषण आणि प्रदूषण नच दिसते.लहान मुलांना अस्थमा तर काहीना अयाल्र्जी झाल्याचे दिसते.

माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापना

माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापना

Establishment of Workers' Union at Manikgad Cement Company | माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापनागडचांदूर/प्रतिनिधी:
कामगार नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापना करण्यात आली. कार्यालयाचे उद्घाटन नरेश पुगलिया यांच्या हस्ते पार पडले.स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सागर ठाकूरवार, कामगार नेते जि. प. सदस्य शिवचंद्र काळे, साईनाथ बुचे, देवेंद्र गहलोत, वसंत मांढरे, अजय मानवटकर, अभय मुनोत आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना नरेश पुगलिया म्हणाले, माणिकगड सिमेंट व्यवस्थापन गेल्या ३० वर्षांपासून कामगारांवर सतत अन्याय करीत आहे. सध्या येथे कार्यरत पाकेट युनियन कामगारांना न्याय देण्यास असमर्थ असल्याने नव्याने कामगार संघाची स्थापना करण्यात येत असल्याचे सांगितले. कामगारांनी एकसंघ होऊन अन्यायाविरोधात लढा देण्याचे आवाहन केले. सध्याची युनियन व्यवस्थापनच्या इशारावर चालत असल्याची टीकाही यावेळी केली.
कंपनीने कामगार कपात धोरण अवलंबताना कामगारांना नियमानुसार संपूर्ण लाभ दिला पाहिजे. मात्र कंपनीने २० वर्षे काम केलेल्या कामगारांना कामावरुन काढून टाकल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी कामगार नेत्यांची भाषणे झाली. त्यांनी कामगारांना एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी कामगार संघाचे सहसचिव राजू बेले, उपाध्यक्ष रामरतन पांडे, कोषाध्यक्ष प्रकाश बुरडकर, दिनकर लांडे, राजकुमार छत्री, अनिता सिंग, सतीश येमचेलवार, हरी काळे आदी उपस्थित होते.
युनियन कार्यालयात वाचनालय होणार
युनियन कार्यालयामध्ये कामगारांच्या मुलांसाठी वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. यात स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून देणार असल्याचे नरेश पुगलिया यांनी कार्यक्रमात सांगितले.

मंगळवार, जून ०५, २०१८

सावित्रीबाई फुले विद्यालय येथील अमोलची बारावी परिक्षेत गगनभरारी

सावित्रीबाई फुले विद्यालय येथील अमोलची बारावी परिक्षेत गगनभरारी

गडचांदूर/प्रतिनिधी:
"हाथो कि लकीरों पे कभी ऐतबार मत करना,तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नही होते"
या पंक्तीत खरा उतरणारा विध्यार्थी म्हणजे सावित्रीबाई फुले महाविद्यालय गडचांदूर येथील वर्ग १२ वीत शिकणारा अमोल शंकर हिवरकर होय.इमारतीच्या गच्चीवर खेळत असतांना जिवंत  विद्युत तारांना स्पर्श केल्यामुळे त्याला आपले दोन्ही हात गमवावे लागले. पण त्याने शिक्षणाची जिद्द सोडली नाहीं.यंदा १२ मध्ये त्याने परीक्षा दिली होती.परीक्षेत साहिल लुकमान बक्ष या  लेखनिकाच्या सहाय्याने  परीक्षा दिली व उत्तीर्ण झाला.
परीक्षा उत्तीर्न होणेच म्हणजे जीवन नव्हे हे त्याने आधीच सिद्ध केलं होते.जीवनाच्या परीक्षेत त्याने अनेक निकाल पास केले हे मात्र नक्की. त्याचे जीवन किती खडतर असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाहि. अमोलच्या जिद्दीकडे बघितले तर सर्वसामान्य विध्यार्थ्यांना हेवा वाटावं असा त्याचा शालेय प्रवास आहे. 
साधा आणि मनमिळाऊ वृत्तीचा अमोल आपल्या जीवनातील दुखाना बाजूला ठेऊन जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतो. तालुक्यातील खिर्डी या गावातील अमोल  11 व 12 चे शिक्षण गडचांदूर येथिल सावित्रीबाई फुले कनिष्ठ विद्यालयामध्ये पूर्ण केले असून त्याला शाळेचे प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी  आपल्या जीवनात यशस्वी होवो तसेच भावी आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहे.


एव्हरेस्टवीरांचे गडचांदुर नगरीत जल्लोषात स्वागत

एव्हरेस्टवीरांचे गडचांदुर नगरीत जल्लोषात स्वागत

संजयभाऊ एकरे यांनी केले स्वागत
गडचांदुर/प्रतिनिधी:
नुकतीच देशात मान उंचावून टाकणारी बाब आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी केली आहे.चंद्रपूर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचं नाव रोशन केल्यानं सर्वत्र कौतुक होत आहे.  मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्टवीर मनीषा धुर्वे व प्रमेश आडे या एवरेस्टवीरांचे गडचांदूर नगरीत  रणसूर्य वीर बाबुराव शेडमाके चौक येथे   जगदगुरु तुकोबाराया सार्वनिक वाचनालय गडचांदूरचे अध्यक्ष संजयभाऊ एकरे  व सौ.दिपाली संजय एकरे यांच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात आले.
        यावेळी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइस फेडरेशनचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ.सुधाकर मडावी, गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चांदागड तालुकाअध्यक्ष आदर्श शिक्षक पंढरी मरास्कोल्हे सर,गोंडीयन संस्कृती संवर्धन समितीचे दत्ता येडमे सर,सुरेश टेकाम सर,वनपाल सोयाम सर,मराठा सेवा संघाचे  अशोक घुंगरुड सर सौ. घुंगरुड मॅडम,सुभाष बेरड सर, प्रवीण काकडे  हर्षद शेतकी आदींनी एव्हरेस्टवीरांचे स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मागासलेल्या व अतिदुर्गम भागात सुधा अनेक होतकरू व हुशार विद्यार्थी असून आता कोरपना तालुक्यातील विद्यार्थी सुधा अशा प्राकरचे पराक्रम गाजवू शकतात हे या एवरेस्टविराणी दाखवून दिले आहे.या प्रसंगी गडचांदूर व कोरपना येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.



बुधवार, मे ३०, २०१८

 गडचांदूरच्या सावित्रीबाई फुले विद्यालययाचा उत्कृष्ट  निकाल

गडचांदूरच्या सावित्रीबाई फुले विद्यालययाचा उत्कृष्ट निकाल

निकिता कदम महाविद्यालयातुन प्रथम
गडचांदूर/प्रतिनिधी:
गडचांदूर शहरातील नामांकित सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर  च्या विध्यार्थानी यंदा इयत्ता बारावीच्या परीक्षेत बाजी मारली असून, महाविद्यालयाचा  निकाल 79.73 टक्के निकाल लागला आहे 
   कला शाखेतुन निकिता श्रीराम  कदम हिने 80.30% गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकवला आहे. प्रशांत भाऊराव करदोळे या विद्यार्थ्याने 78.46% गन मिळवून  महाविद्यालयातून द्वितीय येण्याचा मान मिळविला.तर रामचंद्र मधुकर काकडे याने 74.92% गुण मिळविले व तो महाविद्यालयातून तृतीय आला आहे.
या विध्यार्थीनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले,संस्थेचे उपाध्यक्ष तुळशीराम पुंजेकर,संस्थेचे सचिव नामदेवराव बोबडे, सर्व संचालक मंडळातील सदस्यांनी तसेच  महाविद्यालयाचे प्राचार्य सुधाकर मोहारे व सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विध्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
-------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo


शनिवार, फेब्रुवारी १७, २०१८

दारू कारवाईतून वाचविण्यासाठी पोलीस कर्मचार्यांनी मागितली लाच; अन स्वताच सापडला ACB च्या जाळ्यात

दारू कारवाईतून वाचविण्यासाठी पोलीस कर्मचार्यांनी मागितली लाच; अन स्वताच सापडला ACB च्या जाळ्यात

 गडचांदूर/प्रातिनिधी:
गडचांदूर येथे पोलीस विभागात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला गडचांदूर येथे अंबुजा सिमेंट कंपनी उपरवाही येथे कार्यरत असलेल्या ईसमाने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात दिले आहे.
तक्रारदार हे गडचांदूर येथील रहिवासी असून ते त्यांच्या मित्रासोबत मोटरसायकलने  तेलंगाना सीमेवरील भंबारा  येथे गेले होते परत येत असताना त्यांनी आपल्यासोबत स्वताःह पिण्यासाठी  गाडीच्या डिक्कीत IB कंपनीच्या दारुच्या बाटल्या सोबत आल्या होत्या .गडचांदूर येथे पोहोचताच गडचांदूर येथील रामकृष्ण हॉटेल समोर गडचांदूर पोलिसात कार्यरत असलेल्या येथे पोलीस कर्मचारी  नारायण वाघमोडे  यांनी तक्रारदाराची गाडी थांबवली आणि गाडीची तपासणी केली असता त्यांना डिक्कीत IB कंपनीच्या 3  दारुच्या बाटल्या सापडल्या त्यामुळे कारवाई न   करण्यासाठी पोलीस कर्मचारी  नारायण वाघमोडे 25 हजार रुपयाची लाच मागितली. हि रक्कम  जास्त असल्यामुळे तक्रारदाराला ही रक्कम देणे शक्य नव्हते त्यामुळे १५००० रुपयावर हा मसला फीट झाला. व तत्काळ ७००० रुपये देण्यात आले ,व उर्वरित रक्कम दुसऱ्या दिवशी देण्याचे ठरविले दुसरा दिवस मिळताच चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत दुसऱ्या दिवशी उर्वरित ८००० रुपये देताना पोलीस कर्मचारी नारायण वाघमोडे बक्कल नंबर.२१४० याला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष रंगेहात अटक केली.या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

सदर कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे,  ला.प्र.वि.चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात मनोहर एकोणकर,अजय बागेसर, महेश मांढरे, मनोज पिदूरकर,यांनी पार पडली.

    अधिक  ताज्या घळामोडी  वाचण्यासाठी  या लिंकवर  क्लिक करा
    https://kavyashilpnews.blogspot.in/

रविवार, फेब्रुवारी ११, २०१८

 शंकरदेव यात्रेत हाणामारी

शंकरदेव यात्रेत हाणामारी


गडचांदूर/प्रतिनिधी: 
गडचांदूर येथील अमलनाला जवळील नौकारी खुर्द येथे शंकरदेव यात्रा येथे शिवरात्री पाळणा निमित्त 3 ते 4 दिवसीय यात्रा भरते यावर्षी सुद्धा येथे मोठ्या उत्साहात या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.मात्र या यात्रेत काही अज्ञात हल्ले खोरांनी यात्रेकरूवर प्राण घातक हल्ला केला येत देवस्थान समितीचे अध्यक्ष मोतीलाल शांताराम बतकी.वय ४८ वर्षे हे गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  हल्ला करून  ते हल्लेखोर फारार झाले असून या हल्लेखोराच्या विरोधात नोकरी(खु) येथील नागरिकांनी पोलीस स्टेशन गडचांदूर येथे भव्य मोर्चा काढत पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनोद रोकडे यांना सदर प्रकरणाचे निवेदन देऊन हल्ले खोरांना त्वरित अटक करून त्यावर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे देण्यात आली. यावेळी ठाणेदार विनोद रोकडे यांनी हल्लेखोराना पकडण्या चे आश्वासन दिले नंतर मोर्चेकरी फॉरेस्टऑफिस वर धडकले तिथे सुद्धा सदर प्रकारणाचे निवेदन देण्यात आले.यावेळी या मोर्चामध्ये मोठ्या संख्याने नागरिक उपस्तिथ होते वृत्त लिहिपर्यंत हल्लेखोर हे फरारच होते.
 


बुधवार, जानेवारी १७, २०१८

महिलांनी घेतली स्वच्छतेची शपथ

महिलांनी घेतली स्वच्छतेची शपथ

मकरसंक्रांतीनिमित्य हळदी-कुंकू व विविध स्पर्धा
बिबी ग्रामपंचायतचे आयोजन

गडचांदूर/ प्रतिनिधी:- 
नजीकच्या बिबी ग्रामपंचायतच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्य हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन पार पडले असून महिलांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
                        कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. स्मिता चिताडे यांच्या हस्ते पार पडले असून अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्या सविता काळे उपस्थित होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे समन्वयक सोपान नागरगोजे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेकच्या सोनाली गवारगुर, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, ग्रा.पं. सदस्या संगीता ठाकरे उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी महिलांना स्वच्छतेवर व शौचालय वापरावर मार्गदर्शन करून स्वच्छतेची शपथ दिली.
                  उपस्थित महिलांसाठी उखाणे स्पर्धा, स्ट्राँ-बॉल, बकेट-बॉल व इतर स्पर्धा घेण्यात आल्या. अतिथींच्या हस्ते महिलांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन भारती पिंपळकर हिने केले. प्रास्ताविक उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी केले तर आभार स्वाती देरकर हिने मानले. यशस्वितेसाठी सुलोचना टोंगे, अनिता ढवस, कविता कुमरे, निर्मला गिरडकर, अल्का पिंगे, प्रतिभा पावडे, पूजा खोके, विजया मिलमिले, शीतल पावडे, कोमल अतकारे, गुड्डी अतकारे व गावातील महिलांनी सहकार्य केले.

 


मंगळवार, नोव्हेंबर २८, २०१७

"मुत्रीघरासमोर प्रवासी बसतात बसच्या प्रतीक्षेत"

"मुत्रीघरासमोर प्रवासी बसतात बसच्या प्रतीक्षेत"

बसस्थानकनसलेल्या गडचांदूरची दुर्दैवी कथा...
गडचांदुर/ प्रतिनिधी:-
औद्योगिकशहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहर सद्या अतिशयबिकट स्थितीतुन समोर जात आहे.कोरपना तालुक्यातील गडचांदुर शहराची ओळख हि औद्योगिकशहर म्हणून आहे. गडचांदूर जरीऔद्यागिक शहर असले तरीमात्र शहरांतील स्थानिकांना याठिकाणी जीवन जगण्यासाठी रोजविविध 
समस्यांनातोंड द्यावे लागत आहे. प्रदूषण, शुद्ध पाणी,वाहतुक व्यवस्था,आरोग्य व्यवस्था, हे तर याअसतात समस्या आहेतच मात्र "असून नसल्या"सारख्यासोयीत प्रकल्प असून बेरोजगारीचे संकट, धरणे असून पाण्याचे संकट, सुसाट बाईकर्सवर नियंत्रण नसल्याने जीवाचे संकट,यासारख्या अश्याकित्येक लहान मोठ्या संकटांना समस्याना सध्या गडचांदूरकर निमुटपणे सहन करीत आहे. यावर पुन्हा बस स्थानकच्या समस्येचीभर पडली असून हिसमस्या गडचांदूरच्या नागरिकांसाठी सध्या डोकेदुखी ठरत आहे .

गेल्याकाही महिन्यानपुर्वी येथील मुख्य मार्गाचे काम सुरू होते. हे बांधकाम सुरु असतांना याठिकाणी पूर्वी असलेला जुना प्रवासी निवारातोडण्यात आला. तेव्हा पासुनअनेक प्रवासी अक्षरश: प्रसाधनगृहा समोर तसेच इतरठिकाणी बसुन बसची वाटबघत आल्याचे विदारक दृश्य गडचांदूरकर अनुभवत आहे  
स्थानिकनगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या पदग्रहण समारंभात क्षेत्राच्या आमदार महोदयांनी  लवकरचभव्य सर्व सुविधायुक्त बस स्थानकची निर्मीतीकरण्यात येणार असल्याचे वक्तव्य भर कार्यक्रमात  केले होते.मात्र चारमहिने उलटून गेल्या नंतरही गडचांदूरकरांना मुत्रालयसमोरच प्रवासी बसची वाट बघतराहावे लागत आहे.
गेल्याकाही दिवसात या बसस्थानकासाठी  दोन जागेची पाहणी करण्यात आली . या पैकी एकजागा निश्चित करण्यात येत आहे .अंदाजेचार महिन्यांच्या कालखंडा नंतर ही बसस्थानकाचा मुहूर्त काही निघत नसल्याने  "आमदारसाहेब गडचांदुर बस स्थानकाचा मुहूर्तनिघणार तरी केव्हा? असाप्रश्न गडचांदूरकर  विचारातआहेत


सध्यामोठ्या बस स्थानकची निर्मितीहोईपर्यंत या मार्गाच्या दोन्हीबाजुला आधूनिक पद्धतीचा लहान प्रवासी निवारातरी उभारा,अशी मागणी नागरिकांचीहोती मात्र संबंधितांनी याकडे कानाडोळा करत प्रसाधनगृहाच्या बाजूलाचटिनाचे वाहतूक कार्यालय बनविले मात्र प्रवासीनीवाऱ्याला इतके महत्व दिलेनाही.याच मुत्रीघराच्या जवळवाहतूक नियंत्रक यांचे कार्यालय आहे मात्र ईथलीपरिस्थिती बघता बस स्थानाकनसल्याने  शाळकरीमूले सर्व प्रवासीउन्हाचे चटके सहन करतइकडे -तीकडे उभी दिसतात. यामूळेअनेक वृद्धांना विशेषत: लहान मुलं सोबतअसलेल्या महिलांना कमालीचा शारीरिक मानसिक त्राससहन करावा लागत आहे.त्यामुळेप्रवाश्यांची धडपड संबंधितांनी लक्षातघेऊन उद्धभवलेली बस स्थानकची समस्यात्वरित मार्गी लावावी अशी एकमुखी मागणीनागरिकांनी केली आहे.लवकरातलवकर असे झाल्यासगडचांदूरकर संबंधितांना त्यांची जागा दाखविल्या शिवायराहणार नाही असा सूरऐकायला मिळत आहे .