Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

खासदार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खासदार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, नोव्हेंबर ११, २०१७

जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना भाजयुमोद्वारा फळवितरण

जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना भाजयुमोद्वारा फळवितरण

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या जन्मदिवसानिमित्त
चंद्रपूर:  ‘‘रूग्णसेवा हिच नारायण सेवा’’ या ध्यासाने सदैव रूग्णसेवेस विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध आजारावर शिबीरे आयोजित करून रूग्णांना दिलासा देणारे केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या जन्मदिवसानिमित्त युवा नेते मोहन चैधरी यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या  माध्यमातून जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांना फळ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करून संपूर्ण वार्डामध्ये भरती असलेल्या रूग्णांना फळांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत केले. 
दि. 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमास नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे पदाधिकारी आमिन शेख, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव डाहुले, पं.स. सदस्य प्रेम चिवंडे, नगरसेविका सौ. शीला चैहान, शितल इटनकर, शोभा पारीख, विनोद शेरकी, मनोज गौरकार, राहूल बोरकर, तुकूम भाजप मंडळ अध्यक्ष प्रमोद शास्त्राकार, इंजि. श्रीकांत भोयर, भाजप रूग्णालय प्रमुख अशोक सोनी, तेजा सिंह, मुकेश यादव, राहूल बोरकर, जगदिश दंडेले, बलवंत मून, अरविंद जामूनकर जितू शर्मा, धवल चावरे, ललीत गुलानी, अक्षय खनके, निलेश खोलापुरे, राजेश कोमल्ला, नरेश पुजारी यांचेसह भाजयुमोचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यक्रमात सहभागी झाले होते. 
यावेळी वार्डातील परिचारीका, वाॅर्डबाॅय, सुरक्षारक्षक व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी ना. हंसराज अहीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून त्यांच्या हातून सदोदीत रूग्णसेवा घडत रहावी अशी भावना व्यक्त केली. वाॅर्ड नं. 1 ते 6 मधील रूग्णांना मोहन चैधरी यांच्या नेतृत्वात फळ वितरण करून  ना. अहीर यांचा वाढदिवस रूग्णसेवेत घालवीत साजरा करण्यात आला. 

गुरुवार, नोव्हेंबर ०९, २०१७

राहुल गांधींना पटोले भेटणार

राहुल गांधींना पटोले भेटणार

नागपूर :  शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडून पक्ष प्रवेशाच्या आॅफर आहेत. पण भाजपाला माझे महत्व समजत नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील आपल्याला चर्चेसाठी फोन केला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आपण दिल्ली येथे राहुल गांधी यांची भेट घेणार आहोत. शेतकऱ्यांसाठी राबवायच्या धोरणांबाबत त्यांची चर्चा करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

आपण पक्षाच्या व्यासपीठावर तसेच पक्ष नेत्यांकडे शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी मांडले. त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. जनतेसाठी भांडणे ही माझी आदत आहे. ती मला मान्य आहे. माझ्या वैयक्तिक भानगडित पडू नका. माझ्या वाट्याला जावू नका. अंगावर याल तर शिंगावर घेईल, असा इशारा भाजपाचे नाराज खासदार नाना पटोले यांनी भाजपाला दिला.
पटोले हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका करीत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला लक्ष करीत आहेत. आता भाजपनेही त्यांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत घेत पटोले हे ‘आदत से मजबूर’ असल्याची टीका करीत त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर म्हणणे मांडावे, असा सल्ला दिला होता. त्यावर पटोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. पटोले म्हणाले, पक्षाच्या पुणे येथील कार्यकारिणीच्या बैठकीत मी शेतकºयांचे प्रश्न उघडपणे मांडले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीतही तेच मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वळोवेळी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यामुळे भंडारी यांनी मला नाहक सल्ले देऊ नयेत. भंडारी यांची स्वत:ची अवस्था बिकट आहे. विधान परिषदेत संधी न मिळाल्याने मधल्या काळात ते गायब होते, असा चिमटा त्यांनी काढला. माझे घर काचेचे नाही. पण कुणाची घरे काचेची आहेत हे मला माहीत आहे. तुम्ही प्रामाणिकपणा पाळा. शेतकºयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन नंतर परत घेतले. हे तुमच्या अप्रामाणिकपणाचे प्रमाणपत्रच असल्याची टीका त्यांनी भाजपावर केली.
भंडाऱ्याच भाजपचा पत्ता साफ होता, त्या काळात आपण पक्ष उभा केला. मला जनतेने निवडून दिले आहे. मी पक्षाच्या किंवा नेत्यांच्या भरवशावर नाही. फेब्रुवारीनंतर राजकीय दिशा स्पष्ट करीत, असे त्यांनी एकाप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. नोटाबंदीनंतर किती काळे धन परत आले, किती नकली नोटा जमा झाल्या ते आधी जाहीर करा. लाखो लोकांना त्रास झाला. तीनशे नागरिकांचा बँकेच्या रांगेत मृत्य झाला. आपण कशाचा जल्लोष साजरा करीत आहोत, असा सवाल त्यांनी केला. या वेळी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार उपस्थित होते.



यशवंत व शत्रुघ्न सिन्हांसोबत अकोल्यात एका मंचावर
- १ डिसेंबर रोजी अकोला येथे सोयाबीन, कापूस व धान परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत आपण उपस्थित राहणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. यापूर्वी पटोले यांनी यशवंत सिन्हा यांची नागपूर विमानतळावर भेट घेतली होती.

सोमवार, नोव्हेंबर ०६, २०१७

सरकार आंधळं आणि बहिरं’ - नाना पटोलेंची घणाघाती टीका

सरकार आंधळं आणि बहिरं’ - नाना पटोलेंची घणाघाती टीका


कोल्हापूर / प्रतिनिधी : ‘भाजपा सरकार आंधळं आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच प्रश्न मांडतो. पक्षानं काय कारवाई करायची ती करु दे.’ असं म्हणत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले हे आज (सोमवार) कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात भूमिका घेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. ‘राज्यातील मंत्र्यांमध्ये सुसूत्रता नाही. राज्यात मुख्यमंत्री फडणवीस आहेत की चंद्रकांत पाटील? हे देखील आता समजतं नाही.’ अशी बोचरी टीका पटोले यांनी केली आहे. शेतकरी आणि महिलांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत आणि गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी लगाम घालावा. असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला आहे. *शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. असं म्हणत सरकारचं कर्जमाफीचं काम बरोबर नसल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.* ‘भाजपा सरकार आंधळे आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच बोलणार. पक्षाने कारवाई केली तर करू देत.’ असं थेट टीका यावेळी पटोलेंनी केली.