Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

अवैध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अवैध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, फेब्रुवारी १३, २०१८

चंद्रपुरात ब्रॅण्डेड विदेशी दारूसाठा जप्त

चंद्रपुरात ब्रॅण्डेड विदेशी दारूसाठा जप्त

चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यात दारूबंदी असतांना देखील विविध छुप्या मार्गाने दारूची तस्करी केल्या जात आहे,अश्याच पद्धतीने दारू आणणाऱ्या एका स्वीफ्ट डिझायर गाडीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली आहे
नागपूरहून एम.एच.०२ बी.आर.१२६७ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने ब्रॅण्डेड कंपनीच्या विदेशी दारू चंद्रपुरात आणली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक वैरागडे यांच्या नेतृत्त्वातील चमूने जगन्नाथबाबा नगर परिसरात नाकाबंदी करून नागपूरहून येणाऱ्या एम.एच.०२.बी.आर.१२६७ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची झडती घेतली असता तपासणीत वाहनात अ‍ॅन्टीक्युटी, मॅकडॉल, पोर्ट वाईन या ब्रॅण्डेड कंपनीसह व अन्य कंपन्यांचा दारूसाठा आढळून आला.
यात १७ बॉक्समध्ये १२० बॉटल्स होत्या.पोलिसांनी दारूसाठा आणि चारचाकी वाहन असा एकूण आठ लाख ५८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन चालकाविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असुन दोघे फरार आहेत.






 


गुरुवार, जानेवारी २५, २०१८

15 हजाराची लाच घेतांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास रंगेहात अटक

15 हजाराची लाच घेतांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास रंगेहात अटक

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
अवैध दारू विक्री प्रकरणात चंद्रपूर शहरातील  दुर्गापूर पोलिस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौखाजी मारोती पिपरे  बक्कल नंबर. 280 
यांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत  15 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली .पिपरे हे दुर्गापूर पोलिस स्टेशनचे विद्यमान ठानेदार यादव यांचे रायटर म्हणुन सम्पूर्ण काम सांभाळत असल्याची माहिती आहे.

दारू विक्रीचा खोटा पंचनामा करत दुचाकी व मोबाइल जप्त केला यात गुन्ह्यात जप्त झालेला मुद्देमाल परत करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौखाजी मारोती पिपरे यांनी आरोपिस 25000 रूपयाची  मागणी केली.मात्र तितकी रक्कम शक्य नसल्याने शेवटी 15 हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली व ते पोलिस स्टेशनमध्येच देण्याचे ठरविले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती दारू विक्रेत्याने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे दिली होती.  त्यानुसार  बुधवारी  सापळा रचून  15 हजार रुपये रोख स्वीकारताना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस स्टेशनमध्येच पिपरे यांना अटक केली.

 जिल्ह्यात दारूबंदी असतांनादेखील विविध प्रकारे जिल्ह्याभरात दारूचा अवैध साठा येतो व तो शहरातील विविध भागातील विकला देखील जातो त्याला पोलिस विभागाचे पाठबळ असल्याचे या प्रकरणातून विश्वासीत समोर येत आहे.आरोपी पिपरे यांचे अवैध धंदेवाल्यांसोबत गोड संबंध असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे,  ला.प्र.वि.चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व पो.हवालदार मनोहर एकोणकर , ना.पो.का संतोष येलपुलवार महेश मांढरे,सुभाष गोहोकर,भास्कर चिंचवलकर, मनोज पिदूरकर, समीक्षा भोंगडे,राहुल ठाकरे  यांनी पार पडली  

मंगळवार, जानेवारी १६, २०१८

पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून पकडली 48 पेटया अवैध दारू.

पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून पकडली 48 पेटया अवैध दारू.

वरोरा/प्रतिनिधी:
वरोरा उपविभागीय पोलीस पथकाने आज (मंगळवारी) सकाळी अवैधरित्या दारू पुरवठा करणाऱ्यांचा सिनेस्टाइल पाठलाग करून तब्ब्ल 48 पेट्या दारू जप्त केली आहे. यात एका आरोपीस अटक करण्यात आली असून एक फरार झाला आहे.
वरोरा उपविभागीय पोलीस विशेष पथकाला शहरात एका लक्झरी वाहनातून अवैध दारू आणली जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीवरून सापळा रचला गेला. शहरातून नागपुर चंद्रपूर मार्ग जातो. पोलिसांणी इशारा देऊनही गाड़ी न थांबवता भरधाव वेगाने पुढे या वाहनाचा विशेष पथकाने पाठलाग केला. दरम्यान गाड़ी शेतशिवारातून टाकली मात्र पुढे निघने अशक्य झाल्याने तितक्याच तिसऱ्या पोलिस पथकाने आरोपिस पकड़ले यात  महिंद्रा  x u v mh.20.cs.7194 गाड़ीतुन 48 पेटया देशी विदेशी दारू जप्त केली. 

सदरची कारवाई वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रताप पवार यांच्या मार्गदर्शनात प्रदीप पाटील ,अनिल बैठा, सचिन थेरे, संतोष निषाद, निखिल कौरासे यांनी केली असून पुढील कारवाई वरोरा पोलिस करत आहेत .