Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०२, २०२३

चंद्रपुरातील आनंद वाईन शॉपचा परवाना रद्द License of Anand Wine Shop in Chandrapur cancelled



चंद्रपूर दि. 1 : अनुज्ञप्ती नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूरच्या सराई वार्ड, जटपुरा गेटजवळील आनंद वाईन शॉपची अनुज्ञप्ती 15 दिवसांकरिता निलंबित केली असल्याचे आदेश काल (दि.31 मे) निर्गमित केले. जिल्ह्यातील अवैध दारु विक्री व हातभट्टीदारु निर्मीती, विक्री, वाहतुक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत माहे मे महिन्यात विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती. यात भद्रावती, वरोरा, चिमुर, चंद्रपुर, सिंदेवाही, राजुरा, मुल, बल्लारपुर, ब्रम्हपुरी, नागभीड या तालुक्यात धाडी टाकुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत एकुण 91 गुन्हे नोंदविण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये एकुण 68 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवुन संपुर्ण कार्यवाहीमध्ये चार वाहनांसह एकुण रुपये पाच लाख 70 हजार 60 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वरोरा भागात दोन देशी दारु किरकोळ विक्री दुकानांवर नियमभंग प्रकरणे नोंदविण्यात आले आणि मुंबई दारुबंदी कायद्याचे कलम ९३ अंतर्गत एकुण १३ इसमांवर प्रतीबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आले. सदर कामगिरी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाद्वारे पार पाडली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.